Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य रविवार १४ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२०

राशीभविष्य रविवार १४ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२०

Related Story

- Advertisement -

मेष ः– रविवार धावपळ होईल. दुपारपर्यंत तुमचे मन अस्थिर राहील. घरातील व्यक्ती तुमची मदत करतील. प्रकृतीची काळजी घ्या. मेष राशीच्या सप्ताहात सूर्य प्रवेश, बुध, शुक्र युती होत आहे. घरात आनंदाची बातमी मिळेल. तुमचे डावपेच यशस्वी होतील. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून मदत मिळेल. धंद्यात वाढ होईल. मोठे काम मिळवा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. मनासारखे काम मिळेल. कोर्टकेस जिंकता येईल. जिद्दीने काम पूर्ण करा. संशोधन कार्यात यश येईल. वरिष्ठ खूश होतील. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात आळस करू नये. घर, जमीन, दुकान खरेदी-विक्री होऊ शकेल. शुभ दि. 15, 16

वृषभ ः- रविवार संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. घरातील कामे न केल्याने जीवनसाथी, मुले यांची नाराजी होऊ शकते. घरात वाद होईल. तुला राशीत सूर्य प्रवेश, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात वाद होईल. खर्च वाढेल. नातलगांना मदत करावी लागेल. धावपळ होईल. राजकीय-सामाजिक कार्यात लोक तुमच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. नवरात्रीच्या कामात तुमच्यावर दबाव राहील. आरोप होईल. नोकरीत कामात चूक करू नका. खाण्याची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात तणाव होऊ शकतो. कोर्ट केसमध्ये शांतपणे दुसर्याचे विचार ऐकून घ्या. नंतर विचारपूर्वक बोला. संशोधन कार्यात अडचणी येतील. परीक्षेसाठी तयारी करा. शुभ दि. 18, 19

- Advertisement -

मिथुन ः तुला राशीत सूर्य प्रवेश, बुध, शुक्र युति होत आहे. रविवार सकाळी किरकोळ अडचणी येतील. वाढ होईल. मूड येण्यास वेळ लागेल. धंद्यात चांगली प्रगति होईल. नवीन लोकांची ओळख होईल. आप्तेष्ठ मित्र यांचा सहवास मिळेल. दूरच्या प्रवासाचा बेत तयार कराल. नोकरीत तुमचा प्रभाव राहील. राजकीय-सामाजिक कार्यात योजना मार्गी लावा. वरिष्ठांच्या समवेत चर्चा सफल होईल. लोकांच्या जमावात गेल्यावरच तुम्हाला त्यांच्या गरजा समजतील. त्यावर उपाय करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवे काम मनासारखे असेल. संगितात चांगली धून मिळेल. विद्यार्थी वर्गाने आळस न करता अभ्यासात लक्ष द्यावे. शुभ दि. 15, 16

कर्क ः- रविवार सकाळी महत्त्वाचे काम करून घ्या. जीवनसाथीची मर्जी राखा. दुपारनंतर दगदग होईल. खरेदी करण्यास जावे लागेल. तुला राशीत सूर्य प्रवेश, बुध, शुक्र युति होत आहे. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील असाच विचार करू नका. नोकरवर्गाकडून गोड बोलून काम करून घ्या. चातुर्य वापरा. वाद टाळा. संताप टाळा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. जवळचे लोक मदत करण्यास येणे कठीण होईल. कला-क्रीडा क्षेत्रात तुमचे कौतुक होईल. कामाचे आश्वासन मिळेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. कोर्टाच्या सर्व गोष्टी जमून येतील. तरी एखादी त्रुटी राहील. विद्यार्थी वर्गाने उद्धटपणे वागू नये. शुभ दि. 17, 19

- Advertisement -

सिंह ः– रविवार तुम्हाला कंटाळा येईल. उदास वाटेल. आळस केल्यास कामे रेंगाळतील. लंच नंतर दिलासा देणारी घटना घडेल. तुलेत सूर्य प्रवेश व चंद्र शुक्र लाभ योग होत आहे. कला क्षेत्रात रमाल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. संसारात शुभ समाचार मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची लोकप्रियता वाढेल. योजनांना गती देता येईल. दसर्याच्या दिवशी विरोधक तुम्हाला खचण्याचा प्रयत्न करतील. धंद्यात मोठे काम मिळेल. मौल्यवान वस्तू खरेदी करताना सावध रहा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवे मित्र मिळतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कोर्ट केसमध्ये यश मिळेल. संशोधन कार्याला योग्य दिशा मिळेल. महत्त्वाचे काम लवकर करून घ्या. विद्यार्थी वर्गाने नियमितपणा ठेवावा. शुभ दि. 15, १८

कन्या ः– रविवार ठरविलेला कार्यक्रम पूर्ण करू शकाल. नवरात्रीत देवीचे दर्शन घेता येईल. धंद्यात चांगली वाढ होईल. आप्तेष्टांची भेट होईल. तुलेत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. रेंगाळत राहिलेले धंद्यातील काम पूर्ण करू शकाल. मोठे कंत्राट घेता येईल. घरातील समस्या सोडवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा उत्साह वाढेल. योजनांना पूर्ण करता येईल. सप्ताहाच्या शेवटी किरकोळ वाद संभवतो. कला-क्रीडा क्षेत्रात पुुरस्कार व लाभ मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. अविवाहितांनी लग्नासाठी प्रयत्न करावेत. संतती प्राप्तीचा प्रयत्न करू शकाल. कोर्ट केस संपवता येईल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळेल. शुभ दि. 17, 18

तुला ः– राहून गेलेली कामे रविवारी पूर्ण करता येतील. कामाचा उत्साह राहील. श्री अंबेची आराधना यथासांग होईल. धंद्यात जम बसेल. तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश, बुध, शुक्र युति होत आहे. तुमच्या मनातील मनोरथ महालक्ष्मीस सांगा. तुमचे स्वप्न पूर्ण होईल. प्रयत्न करा. धंद्यात जास्त मेहनत घ्या. नोकरी मिळेल. प्रकृतीत सुधारणा होईल. राजकीय-सामाजिक कार्यात दसर्यापासून दिशा मिळेल. वरिष्ठ तुम्हास जबाबदारी देतील. कला-क्रीडा क्षेत्रात तुम्ही स्पर्धा जिंकाल. प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे शिक्षणात प्राविण्य मिळेल. कोर्ट केस संपवण्याचा मुद्दा हाती येईल. गैरसमज दूर होईल. संशोधनासाठी प्रयत्नांचा वेग वाढवता येईल. वरिष्ठ मदत करतील. शुभ दि. 1७, १९

वृश्चिक ः- रविवार तुमचा अंदाज बरोबर येईल. खरेदी करण्याचा मूड राहील. भेट घेण्यात यश मिळेल. धंद्यात फायदा होईल. तुला राशीत सूर्य प्रवेश व चंद्र मंगळ युति होत आहे. व्यवसायात कुणाच्याही बरोबर बोलताना रागावर नियंत्रण ठेवा. वरिष्ठांची नाराजी होऊ शकते. नोकरीत काम वेळेत पूर्ण करा. खाण्याची काळजी घ्या. मनावर एखाद्या प्रसंगाचे दडपण येईल. राजकीय-सामाजिक कार्यात मेहनत घ्यावी लागेल. जनतेची नाराजी होईल. घरातील व्यक्तीच्या बरोबर तडजोड करा. धावपळ होईल. कला-क्रीडा स्पर्धेत मागे रहाल. संशोधनाच्या कामात अडचणी येतील. शुभ दि. 14, 15

धनु ः रविवार कामाचा व्याप वाढेल. चूक महागात पडेल. अचानक कामात बदल करावा लागेल. महत्त्वाची वस्तू नीट ठेवा. तुला राशीत सूर्य प्रवेश व बुध नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. महत्त्वाचा धंद्यातील निर्णय घेता येईल. मोठे काम मिळवा. आळस केल्यास संधी जाईल. राजकीय-सामाजिक कार्यात योजना पूर्ण करण्याच्या मागे लागा. सहकार्य मिळेल. घरातील अडचणी दूर करता येतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्ट केस संपवता येईल. नोकरीत वरिष्ठ खूश राहतील. विद्यार्थी वर्गाला परीक्षेत यश मिळेल. संशोधन कार्य मार्गी लावता येईल. शुभ दि. 18, 19

मकर ः– रविवार सकाळी महत्त्वाची भेट घ्या. निर्णय घ्या. जेवणानंतर अडचणी येतील. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन जपून चालवा. तुला राशीत सूर्य प्रवेश, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. लोकांना आकर्षित करू शकाल. दसर्याच्या दिवशी तुमचा प्रभाव पडेल. धंद्यात जम बसेल. भागिदार मिळेल. कोर्ट केस संपवता येईल. जोरदार प्रयत्न करा. किरकोळ कारणाकडे दुर्लक्ष करा. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कौतुक वाढेल. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे पुढे जाता येईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. संशोधनाच्या कामात सरशी होईल. शुभ दि. 1३,१९

कुंभ ः– रविवार तुमचा ठरलेला कार्यक्रम होईल. पाहुणे येतील. श्री अंबे मातेची प्रार्थना मनाप्रमाणे होईल. धंद्याला चांगली बाजारपेठ मिळेल. तुला राशीत सूर्य प्रवेश सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप येईल. तरीही तुमच्या प्रगतीवर त्याच्या विपरित परिणाम होणार नाही. दसर्याच्या दिवशी सावध रहा. दुखापत संभवतो. अपमानास्पद घटना घडण्याची शक्यता आहे. जवळचे मित्र तुमच्या बाजूने असतील. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धेत संमिश्र परिस्थिती असेल. वाहन जपून चालवा. सप्ताहाच्या शेवटी तणाव कमी होईल. नवा विषय समोर येईल. विद्यार्थी वर्गाची प्रगती होईल. संशोधनाच्या कामात धागा हाती लागेल. शुभ दि. १५, १७

मीन ः- रविवार महत्त्वाची भेट घेऊन समस्या सोडवता येईल. चर्चा सफल होईल. धंद्यात यश येईल. फायदा वाढेल. तुला राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात आपसात तणाव होऊ शकतो. जवळचे व्यक्ती नाराज होतील. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. मौल्यवान वस्तू सांभाळा. नोकरीत मोठी चूक होऊ शकते. सावध रहा. फसगत होईल. हिशोब नीट करा. कला-क्रीडा क्षेत्रात भावूक व्हाल. सहनशीलता सर्वच ठिकाणी ठेवा. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. धावपळ होईल. खर्च वाढेल. संशोधन कार्यात अस्थिरता येईल. परीक्षेसाठी नीट लक्ष द्या. शुभ दि. 15, 16

- Advertisement -