Wednesday, March 3, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य रविवार २० डिसेंबर ते शनिवार २६ डिसेंबर २०२०

राशीभविष्य रविवार २० डिसेंबर ते शनिवार २६ डिसेंबर २०२०

Related Story

- Advertisement -

मेष – महत्वाची कामे करून घ्या. घरातील व्यक्तींना खूश ठेवता येईल. व्यवसायात मोठे काम मिळेल. फायदा होईल. वृश्चिक राशीत बुध प्रवेश, सूर्य हर्षल प्रतियुति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या विचार पद्धतीला दुजोरा देणारे लोक असतील. तुमचे प्रयत्न चालू ठेवा. प्रकृतीची हेळसांड करू नका. औषधाची वेळ पाळा. संतती, जीवनसाथी यांचे सहाय्य मिळेल. थकबाकी वसूल करा. मुलांच्या समस्या सोडवता येतील. नोकरीत योग्य तोच निर्णय घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात तुमच्या मनाप्रमाणे काम मिळेल. नविन ओळखीचा फायदा होईल. संशोधन कार्यात यश होईल. मदतही मिळेल. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत ठेवावी.
शुभ दि. 21, 24

वृषभ – तुम्ही ठरविलेली योजना पूर्ण करू शकाल. अडचणीतून मार्ग मिळेल. प्रेमाच्या माणसांना ओळखून ठेवा. खर्च वाढेल. वृश्चिक राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र षडाष्टक योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात नम्रता ठेवा. वरिष्ठांची नाराजी होऊ शकते. तुमच्यावर आरोप होईल. संसारात तणाव होईल. धंद्यात हिशोब नीट करा. मौल्यवान वस्तू सांभाळा. विद्यार्थी वर्गाने केलेली चूक उघडकीस येऊ शकते. कला-क्रीडा क्षेत्रात वाद होईल. कोर्ट केसमध्ये चिंता वाढेल. संशोधन कार्यात जास्त कष्ट घ्यावे लागतील. वाहन जपून चालवा.
शुभ दि. 22, 23

- Advertisement -

मिथुन – तुमचा उत्साह राहील. नातलगांच्या भेटी होतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. चांगली बातमी मिळेल. जुने मित्र तुमची आठवण काढतील. वृश्चिकेत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र, प्रतियुति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात मिळालेल्या पदासाठी कार्य करा. जनतेला उपयोगी येईल अशी योजना करा. धंद्यात मोठे काम मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. मोठी भूमिका मिळू शकेल. कोर्ट केसमध्ये सप्ताहाच्या सुरुवातीला यश मिळेल. संशोधन कार्यात पुढे जाल. वरिष्ठांची मर्जी राखता येईल. विद्यार्थी वर्गाला परीक्षेत चांगले मार्क मिळतील. शुभ दि. 22, 23

कर्क – रविवार प्रवासात अडचणी येतील. थकवा वाटेल. वाहन जपून चालवा. घरात ताण-तणाव होईल. वाटाघाटीचा प्रश्न निघेल. वृश्चिकमध्ये बुधाचे राश्यान्तर होत आहे. सोमवारपासून सर्व समस्या सोडवता येईल. लोकांच्या बरोबर चर्चा करता येईल. धंद्यात काम मिळवता येईल. नविन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात मोठ्या लोकांच्याकडून कौतुक होईल. मैत्री वाटेल. कोर्ट केसमध्ये आशादायक वातावरण राहील. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेत यश मिळेल. संशोधन कार्यात किरकोळ अडचणी येतील. नम्रता ठेवा. वरिष्ठांचा समोर तडजोड करावी लागेल.
शुभ दि. 24, 25

- Advertisement -

सिंह – रविवार चर्चा सफल होईल. भेट घेण्यात यश येईल. घरातील व्यक्तीची बाजू समजून घेता येईल. प्रेमाचा संवाद करता येईल. वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य हर्षल प्रतियुति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात ठोस योजना करून कामाला सुरुवात करा. लोकांचे प्रेम मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला धावपळ होईल. थकवा वाटेल. धंद्यात फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. थकबाकी वसूल करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मोठ्या लोकांचा परिचय तुमचा आत्मविश्वास व उत्साह वाढवणार आहे. कोर्ट केसमध्ये यश मिळेल. वेळ लावू नका. विद्यार्थ्यांना प्रगति करता येईल. संसारात सुखद समाचार मिळेल.
शुभ दि. 21, 24

कन्या – किरकोळ तणाव होईल. अचानक कामात बदल करावे लागेल. पाहुणे येतील. शेजार्‍याला मदत करावी लागेल. वृश्चिक बुध प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात धावपळ होईल. तणाव होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला ओळखीचा उपयोग करून घेता येईल व समस्या सोडवता येईल. धंद्यात चांगली प्रगति होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक व पैसा मिळेल. कोर्ट केस जिंकण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. परंतु यश मिळेल. जिद्द सोडू नका. संशोधन कार्यात धावाधाव करावी लागेल. वरिष्ठ कौतुक करतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. वाहन जपून चालवा.
शुभ दि. 23, 2६

तुला – ठरविलेले काम पूर्ण होईल. धंद्यात वाढ होईल. जुने नुकसान भरून काढण्याची संधी मिळेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. वृश्चिकेत बुध प्रवेश सूर्य शुक्र युति होत आहे. धंद्यात मोठे काम मिळवा. प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगति होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला काही लोक काड्या घालण्याचा व्यर्थ प्रयत्न करतील. तुम्ही रागावर ताबा ठेवा. वरिष्ठ मदत करतील. नोकरीचा प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्ध व पैसा मिळेल. कोर्ट केस संपवण्यासाठी किरकोळ अडथळे येऊ शकतात. संशोधन कार्यात प्रगति होईल. परीक्षेत यश मिळेल. शुभ दि. 21, 24

वृश्चिक – मनावर एखादा तणाव राहील. जवळच्या व्यक्तीची नाराजी होऊ शकते. कुठेही दादागिरी करू नका, समस्या संयमाने सोडवा. खाण्याची काळजी घ्या. तुमच्याच राशीत बुध प्रवेश, सूर्य हर्षल प्रतियुति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात हल्लाबोल होईल. तुम्ही केलेल्या चुका ठळकपणे लोकांच्या पुढे ठेवल्या जातील. लोकांची नाराजी सहन करावी लागेल. धंद्यात उतावळेपणा नको. वाद नको. हिशेब नीट करा. वस्तू सांभाळा. कला-क्रीडा क्षेत्रात तणाव होऊ शकतो. कोर्ट केसमध्ये अडथळे येतील. सभ्यता सोडू नका. परीक्षेसाठी उत्तम तयारी करा. शुभ दि. 22, 23

धनु ः– रविवार मनासाठी घालवता येईल. आनंदी रहाल. मौजमजेत वेळ जाईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. धंद्यात फायदा होईल. जुने स्नेही भेटतील. वृश्चिक राशीत बुध प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांच्या भेटीसाठी जाता येईल. योजनेसंबंधी चर्चा करू शकाल. महत्वाचे काम सप्ताहाच्या सुरुवातीपासून करा. धंद्यात कंत्राट मिळवता येईल. जुने-येणे वसूल करा. घरातील वाटाघाटीचा प्रश्न सोडवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगति होईल. नविन ओळखी वाढतील. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. संशोधनाच्या कामात पुढे जाल. शुभ दि. 22, 23

मकर – ठरविलेला कार्यक्रम मनाप्रमाणे पूर्ण करू शकाल. आप्तेष्ठांची भेट होईल. धंद्यात वाढ करता येईल. विचारांना चालना मिळेल. वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य शुक्र युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना गती देता येईल. लोकसंग्रह वाढवता येईल. मान-सन्मानाचा योग येईल. धंद्यात दुर्लक्ष करू नका. कोर्ट केसमध्ये यश येईल. नव्या दिशेने तुमचे कार्य नेता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. घरातील वातावरण सुखद राहील. संगतीची प्रगती होईल. संशोधन कार्यात वरिष्ठांना खूश कराल. विद्यार्थी चांगली प्रगति करतील. शुभ दि. 23, 2५

कुंभ – कठीण कामे पूर्ण करता येईल. शेजारी सहकार्य देतील. नविन लोकांचा परिचय उत्साहवर्धक ठरेल. वृश्चिक राशीत बुध प्रवेश, सूर्य शुक्र युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या विचारांना महत्व प्राप्त होईल. लोकांच्याकडून कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. विरोधकांना शह देता येईल. घरातील लोकांना आनंद देता येईल. मुलांच्या बरोबर वेळ मजेत जाईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्ट केस जिंकाल. नोकरीत चांगला बदल करता येईल. दूरच्या प्रवासाचा विचार कराल. संशोधनात यश येईल. परीक्षेसाठी एकाग्रता वाढेल. शुभ दि. 23, 24

मीन – ठरविलेल्या कार्यक्रमात बदल करावा लागेल. मनावर दडपण राहील. चिडचिडेपणा स्वभावात येईल. खाण्याची काळजी घ्या. वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य चंद्र षडाष्टक योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या विरोधात कट जाण्याची शक्यता आहे. तुम्ही परिस्थिती समजून घ्या. जवळचेच नेते, सहकारी विरोध करतील. धंद्यात मतभेद होतील. जास्त विश्वास कुणावर टाकू नका. कला-क्रीडा स्पर्धेत मेहनत घ्या. कोर्ट केसमध्ये चिंता वाटेल. तात्पुरत्या समस्या येतील. नोकरीत चुकीचा निर्णय घेऊ नका. सावध रहा. संशोधन कार्यात विलंब होईल. घरात मिळते-जुळते धोरण ठेवावे लागेल. परीक्षेसाठी जिद्द ठेवा. शुभ दि. 2५, 2६

- Advertisement -