Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य रविवार २७ डिसेंबर २०२० ते शनिवार ०२ जानेवारी २०२१

राशीभविष्य रविवार २७ डिसेंबर २०२० ते शनिवार ०२ जानेवारी २०२१

Related Story

- Advertisement -

मेष ः– रविवार धंद्यातील तणाव कमी होईल. घरातील व्यक्तींच्या मर्जीनुसार निर्णय घ्याल. तुमच्या कार्यातील अडचणींवर उपाय शोधता येईल. सूर्य चंद्र त्रिकोण योग, चंद्र मंगळ प्रतियुती होत आहे. उत्साह व आत्मविश्वास राजकीय-सामाजिक कार्यात वाढेल. लोकप्रियता मिळेल. व्यवसायाला चांगली बाजारपेठ मिळेल. गिर्‍हाईकाच्या बरोबर वाद करू नका. संसारात शुभ समाचार मिळेल. संततीकडून एखादी अपेक्षा पूर्ण होईल. कला क्रीडा क्षेत्रात पुढे जाल. कोर्ट केसमध्ये मदत मिळेल. यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. संशोधनात प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाला सप्ताह चांगला असेल. शुभ दि. २७, ३०

वृषभ ः– रविवार मनाची द्विधा अवस्था होईल. प्रेमाने जीवनसाथी बरोबरचा वाद वाढू शकतो. बुध, गुरु, युति, चंद्र मंगळ प्रतियुती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांच्या मर्जीनुसार तुम्हाला वागावे लागेल. नोकरीत संयमाने वागा. कामात चूक करू नका. संसारात खर्चाचे प्रमाण वाढेल. आप्तेष्ठांसाठी धावपळ करावी लागेल. स्वतःच्या खाण्या-पिण्याची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात यश मिळणे सोपे नाही. संशोधनाच्या कामात अडचणी येतील. सरकारी वर्गाबरोबर नम्रतेने वागा. परीक्षेसाठी मुलांनी अभ्यासाचा आळस करू नका. शुभ दि. २९, ३१

- Advertisement -

मिथुन ः- रविवार तुम्ही ठरविलेले काम करण्यात अडचणी येऊ शकतात. वाहन जपून चालवा. कोणताही वाद धंद्यात करू नका. सूर्य चंद्र त्रिकोण योग, शुक्र, हर्षल प्रतियुती होत आहे. सोमवार तुमच्या कार्यात वेग येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या योजनांना गति द्या. लक्ष देऊन काम पूर्ण करा. धंद्यात काम मिळेल. गोड बोला. संसारात चांगली बातमी मिळेल. नातलगांचा सहवास मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवीन ओळख होईल. कोर्ट केस संपवा. बोलण्यात कठोरपणा ठेऊ नका. संशोधनात यश येईल. नवा अनुभव घ्याल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात लक्ष ठेवा. मौज-मजेत वेळ जाईल. शुभ दि. ३१, १

कर्क ः– रविवार तुमचा उत्साह वाढेल. नातलगांची भेट होईल. खरेदी करता येईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. सूर्य, चंद्र, लाभ योग, बुध, गुरु युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात चांगली योजना पूर्ण करू शकाल. प्रतिष्ठा मिळेल. किरकोळ तणाव वाढवू नका. धंद्यात काम मिळेल. नवीन ओळखीने मोठे कंत्राट मिळवा. जीवनसाथी, मुले यांच्याशी प्रेमाने संवाद साधता येईल. शुभ कार्याचा विचार होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. कोर्ट केसमध्ये सोमवार, मंगळवार सावध रहा. संशोधनात प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाला योग्य दिशेने जाता येईल. शुभ दि. ३१,२

- Advertisement -

सिंह ः– रविवार महत्त्वाचा निर्णय घेता येईल. घरात आनंदी वातावरण राहील. मौज-मजा खरेदी करण्याचा विचार कराल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. चंद्र शुक्र त्रिकोण योग, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात क्षुल्लक व्यक्तीकडून तणाव निर्माण होऊ शकतो. वरिष्ठ तुमची प्रतिष्ठा राखतील. लोकांची कामे करा. त्यांचे मन जिंका. घरातील व्यक्तीचे सहकार्य मिळेल. वाटाघाटीचा प्रश्न निघेल. धंद्यात काम मिळेल. कामगार वर्गाशी मिळते धोरण ठेवा. संशोधनात यश येईल. विद्यार्थी वर्गाला उत्साह राहील. जिद्द ठेवा. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. २९, ३०

कन्या ः- महत्त्वाच्या विचारावर चर्चा करता येईल. भेट घेण्यात यश येईल. घरातील व्यक्तींना खूश करता येईल. खरेदी कराल. चंद्र शुक्र त्रिकोण योग, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. पेच प्रसंग सोडवा. महिलांनी दिवाळीचे पदार्थ करताना शुक्रवार, शनिवार अंदाज घेताना काळजी घ्यावी. धंद्यात वाढ होईल. मैत्री वाढेल. घर, जमीन, वाहन खरेदीचा विचार कराल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. कोर्ट केसमध्ये प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाला यश येईल. संशोधन कार्यात वरिष्ठ कौतुक करतील. प्रेमाला चालना मिळेल. शुभ दि. २९, ३०

तूळ ः– रविवार अचानक ठरविलेला कार्यक्रम बदलावा लागण्याची शक्यता आहे. मनाची द्विधा अवस्था होईल. काम सावधपणे करा. दुखापत संभवते. वाहन जपून चालवा. चंद्र मंगळ त्रिकोण योग, बुध, गुरु युति होत आहे. सोमवारपासून तुमच्या प्रत्येक कामात यश येईल. राजकीय-सामाजिक कार्यात दिशा मिळेल. उत्साह वाढेल. धंदा वाढेल. थकबाकी मिळवा. खर्च वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळखी होतील. मैत्री वाढेल. अविवाहितांना स्थळे येतील. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टकेस यशस्वी होईल. संशोधनात चूक सुधारून पुढे जाता येईल. मौल्यवान वस्तू घ्याल. शुभ दि. २९, ३०

वृश्चिक ः- रविवार तुमचा उत्साह राहील. ठरविलेले काम करून घेता येईल. घरातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करता येईल. खरेदी करताना हिशोब नीट करा. बुध, गुरु, युति, चंद्र मंगळ प्रतियुती होत आहे. तुमचा आत्मविश्वास खचवण्याचा प्रयत्न राजकीय-सामाजिक कार्यात केला जाईल. लोकांची नाराजी होईल. महिलांनी दीपावलीची तयारी करताना काळजी घ्यावी. धंद्यात गोड बोलून काम मिळवा. कामगारांना समजून घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात जास्त कष्ट पडतील. मैत्रीत दुरावा संभवतो. कोर्टकेस फारच अडचणींचा असू शकतो. संशोधनात वरिष्ठांना नाराज करू नका. कामात चूक होऊ शकते. खिसा-पाकीट सांभाळा. विद्यार्थ्यांनी खाण्याची काळजी घ्यावी. शुभ दि. ३१, १

धनु ः- रविवार कामाचा ताण वाढेल. तुम्ही ठरविलेले काम वेळेवर पूर्ण होणे कठीण होईल. तुमचे स्पष्ट बोलणे सत्य असते तरी इतरांना पटणे कठीण होईल. चंद्र शुक्र त्रिकोण योग, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात संयमाने बोला. प्रसंग वेळ पाहून तुम्ही वागा. धंद्यात गोड बोलून कामगारांकडून काम करून घ्या. खर्च वाढेल. मोठे कंत्राट मिळवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. पैसा मिळेल. कोर्ट केसमध्ये अडचणींवर मात करावी लागेल. विद्यार्थी वर्गाने नियमितपणाने अभ्यास करावा. संशोधनाच्या कामात यश येईल. किरकोळ वाद होईल. शुभ दि. ०१,०२

मकर ः– रविवार मनाप्रमाणे कामे करता येतील. आनंदी रहाल. प्रवासाचा आनंद घेता येईल. धंद्यात फायदा होईल. थकबाकी मिळवा. चंद्र शुभ त्रिकोण योग, चंद्र मंगळ प्रतियुती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. वादाचे प्रसंग येतील. घरात वाटाघाटीचा प्रश्न निघेल. राग वाढेल. धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळखी होतील. जुने स्नेही मदत करतील. कोर्टाच्या कामात सावध रहा. यश खेचता येईल. संशोधनात प्रगती होईल; पण कष्ट पडतील. विद्यार्थी वर्गाने नम्र रहावे. मनातील शंकांचे निरसन होऊ शकेल. वाहन जपून चालवा. शुभ दि. ३१, १

कुंभ ः– रविवार घरगुती समस्या सोडवताना किरकोळ मतभेद होतील. धावपळ होईल. गैरसमज निर्माण होईल. भावना व कर्तव्य यांचा मेळ नीट घाला. चंद्र शुक्र त्रिकोण योग, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला पुढाकार घेऊन समस्या सोडवावी लागेल. तुमचे कौतुक होईल. जनहिताची योजना मार्गी लावता येईल. धंद्यात मोठे काम मिळेल. शेअर्समध्ये फायदा होईल. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नाव मिळेल. कल्पना सुचतील. कोर्ट केसमध्ये गुरुवार, शुक्रवार किरकोळ अडचणी येतील. संशोधनाच्या कामात यश येईल. विद्यार्थी वर्गाला पुढे जाण्याचा मार्ग मिळेल. शुभ दि. २९, २

मीन ः– रविवार मजेत घालवता येईल. वाद कमी होईल. खाण्याची काळजी घ्या. धंद्यात फायदा होईल. मैत्रीत मात्र पैसा टाकू नका. बुध, गुरु, युती, चंद्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तत्परता ठेवा. धंद्यात प्रगतीची नवी संधी येईल. घरातील तणाव प्रेमाने संपवा. मनावर दडपण येईल. प्रकृतीची काळजी घ्या. सर्व तात्पुरते असेल. कला-क्रीडा क्षेत्रात आपसात मतभेद होतील. कोर्ट केसमध्ये सावध रहा. सप्ताहाच्या शेवटी संताप वाढू शकतो. संशोधनात जास्त मेहनत घ्यावी लागेल. महिलांनी दिवाळीची तयारी करताना घाई करू नये. पदार्थ करताना नीट अंदाज घ्यावा. शुभ दि. ३०, ३१

- Advertisement -