Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य - रविवार ३ जानेवारी २०२१ ते शनिवार ०९ जानेवारी २०२१

राशीभविष्य – रविवार ३ जानेवारी २०२१ ते शनिवार ०९ जानेवारी २०२१

Related Story

- Advertisement -

मेष ः-
चंद्र मंगळ त्रिकोण योग, सूर्य बुध युति होत आहे. धंधात संधी मिळेल. पैसा गुंतवतांना मात्र चौकशी करा. फसगत टाळा. संसारात जीवनसाथी, मुले यांची तुमच्यावर नाराजी होऊ शकते. खर्च वाढेल. नातलगांसाठी वेळ, पैसा खर्च होईल. राजकीय-सामाजिक कार्याला तुमचा उत्साह नेहमीच असला तरी लोकांचे, नेत्यांचे मत घेऊनच पुढे जावे लागेल. विलंबाने सर्व घटना घडत आहेत असे तुम्हाला वाढेल. कोर्ट केसमध्ये सावध रहा. मनाचे सामर्थ्य टिकून राहील. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत तुमची लागेल. शुभ दि. ६,४

वृषभ ः-
शुक्र मंगळ, त्रिकोण योग, सूर्य बुध युती होत आहे. कटकटी, अडचणी असल्या तरी धंद्यात लक्ष द्या. कष्ट घ्या. फायदा होईल. संसारातील वाद मिटवण्याची संधी सोडू नका. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घ्या. कायदा मोडू नका. नोकरीत स्थिरता आणता येईल. कोर्ट केसमध्ये योग्य सल्ल्याने बोला. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. कल्पना शक्ती वाढेल. संशोधन कार्याला दिशा मिळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर जास्त लक्ष द्यावे. मोठी खरेदी सावधपणे करा. शुभ दि. ८,९

- Advertisement -

मिथुन ः
चंद्र मंगळ त्रिकोण योग, सूर्य बुध युती होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुमचा राग वाढेल अशी घटना घडू शकते. वाहन जपून चालवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा, अधिकार वाढण्याची संधी मिळेल. धंद्यात मोठी ऑफर समोरून येईल. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरीत चांगला बदल करू शकाल. कंपनीद्वारा परदेशात जाण्याचा योग येईल. कला-क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व लाभ मिळेल. कोर्ट केस कशा पद्धतीने लवकर संपवता येईल याचा विचार करा. संशोधन कार्यात मोठे यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने बुद्धिचा वापर करून उत्तम यश मिळवावे असे ग्रह आहेत. शुभ दि. ८, ९

कर्क ः-
सूर्य बुध युती, शुक्र शनि केंद्र योग होत आहे. घरातील ताणतणाव कमी होऊन, आनंदाचा प्रसंग अनुभवाल. मनावरील दडपण कमी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व वाढवता येईल. बुधवार, गुरुवार संयमाने तुमची भूमिका मांडा, वाहन जपून चालवा. नोकरीतील कामात सुसह्यता येईल. धंद्यात सुधारणा होईल. कंत्राट मिळेल. थकबाकी वसूल करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नविन ओळख फायद्याची ठरेल. संशोधन कार्यातील अडचणीवर मात करता येईल. जमिनीसंबंधी कामे करता येईल. विद्यार्थ्यांनी चांगली संगत ठेऊन अभ्यास पूर्ण लक्ष द्यावे. शुभ दि. ५, ६

- Advertisement -

सिंह ः-
बुध, प्लुटो षडाष्टक योग, चंद्र मंगळ त्रिकोणयोग होत आहे. राजकीय सामाजिक कार्यात तुमचे वाढलेले प्रस्थ इतरांना सहन होणार नाही. गुप्त कारवायांचा त्रास शुक्रवार, शनिवार होईल. घरातील मतभेद आर्थिक करारातून होऊ शकतात. धंद्यात समस्या येईल. कामगार कमी पडतील. वाटाघाटीत नाराजी होऊ शकते. कोर्ट केसमध्ये मुद्याचे न बोलल्यामुळे अडचणी येऊ शकतात. कला-क्रीडा क्षेत्रात मतभेद, वाद होऊ शकतो. तुमचे महत्व टिकवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. नोकरीत, संशोधन कार्यात वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. तुमची जिद्द व नम्रता यामुळे प्रतिष्ठा राखता येईल. शुभ दि. ५, ८

कन्या ः-
शुक्र मंगळ त्रिकोण योग, सूर्य, बुध युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात अत्यंत मोठा निर्णय याच सप्ताहात घ्या. लोकप्रियता टिकवून ठेवा. धंद्यात कंत्राट मिळेल. थकबाकी वसूल करा. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरीत बदल होऊ शकेल. घरात शुभ समाचार मिळेल. संमतीची प्रगती कौतुकास्पद ठरेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकदार यश मिळेल. नविन मोठ्या लोकांची ओळख तुम्हाला उन्नती करून देणारी असेल. कोर्ट केसमध्ये सरशी होईल. संशोधन कार्याला वेग येईल. मनाप्रमाणे यश मिळवता येईल. धाडस करा परंतु कायदा पाळा. विद्यार्थी वर्गाला योग्य दिशेने परदेशात जाता येईल. शुभ दि. ७, ८

तूळ ः-
शुक्र मंगळ त्रिकोण योग, सूर्य बुध युति होत आहे. संसारात ओढाताण होईल. मानसिक दडपण येईल. खाण्यापिण्यामध्ये चंगळ केल्यास प्रकृती बिघडू शकते. राजकीय-सामाजिक कार्यात नियमितपणा ठेवा. वरिष्ठांच्या संपर्कात रहा. जवळचे लोक तुमचा हेवा करतील. नोकरीत दुसर्‍यावर जास्त विश्वास ठेऊ नका. धंद्यात कामगार किंवा अतिविश्वासातला माणूस यावर आर्थिक जबाबदारी टाकू नये. कला-क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. परंतु आपसात मतभेद होऊ शकतात. कोर्ट केसमध्ये खर्च वाढू शकतो. संशोधन कार्यात आळस नको. बुद्धिचातुर्य वापरा. व्यसन व विरुद्धलिंगी व्यक्तीचा मोह यात वेळ फुकट जाईल. शुभ दि. ८, ९

वृश्चिक ः-
सूर्य चंद्र लाभयोग, शुक्र मंगळ त्रिकोण योग होत आहे. तणावाखाली राहिल्यास धंद्यात योग्य निर्णय घेता येणे कठीण होईल. घरात अस्थिरता वाटेल. राजकीय-सामाजिक कार्यात बुधवार, गुरुवार वाद विकोपाला जाऊ शकतो. साडेसाती सुरू आहे. विचारविनियम करूनच कोणताही निर्णय घेणे योग्य ठरेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीत वर्चस्व राहील. कामांना गती मिळेल. कोर्ट केसमध्ये प्रसंगानुरूप वागा. अडचणींवर मात करता येईल. संशोधन कार्यात स्वतःचे विचार पटकन व्यक्त न करता काम करा. विद्यार्थी वर्गाने चालढकलपणा करू नये. सातत्याने अभ्यास करावा. शुभ दि. ६, ८

धनु ः-
बुध प्लुटो षडाष्टक योग. चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला वेगळ्याच प्रकारचे अनुभव येतील. स्वतःच्या स्थानाबद्दल अस्थिरता निर्माण होऊ शकते. तुमचे स्पष्ट बोलणे वादग्रस्त ठरू शकते. धंद्यात समस्या येईल. कायदा समजून त्यानुसार करार करा. तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला दूर करण्याचा प्रयास मोठे लोक करू शकतात. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा वाढेल. जिद्द ठेवा. नोकरीत वाकड्या वाटेने कोणताही निर्णय घेऊ नका. कोर्टाच्या कामात अडचणी वाढतील. विद्यार्थी वर्गाने ध्येय महत्वाचे मानून अभ्यास करावा. शुभ दि. 8,9

मकर ः-
साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. शुक्र मंगळ, त्रिकोण योग, सूर्य बुध युती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्व वाढेल. लोकांच्या नजरेत तुमचे कार्य भरेल असेच काम करा. धंद्यात वाढ होईल. भागीदार मिळतील. नोकरीतील तणाव कमी होईल. कुटुंबातील समस्या सोडवता येईल. कोर्ट केसमध्ये बुधवार, गुरुवार सावध रहा. योग्य मुद्दे मांडता येतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रभाव दिसेल. घर, वाहन, जमीन खरेदी होऊ शकेल. संशोधन कार्याला गती मिळेल. कोणतेही महत्वाचे काम लवकर पूर्ण करा. परीक्षेत पुढे जाता येईल. शुभ दि. 6,7

कुंभ ः-
सूर्य नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. चंद्र मंगळ प्रतियुती होत आहे. नोकरीच्या ठिकाणी दबावाखाली येऊन भलताच निर्णय घेऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही घेतलेला पुढाकार काही लोकांच्या पोटात दुखेल. नाराजी तुमच्यावर होईल. गुप्त कारवायांचा त्रास होईल. धंद्यात घात होण्याची शक्यता असल्याने उतावळेपणा नको. कोर्टाच्या केसमध्ये चिंताजनक वातावरण होईल. कला-क्रीडा क्षेत्रात कष्ट घ्या. प्रगतीची संधी त्यामुळेच पुढे मिळू शकेल. संशोधन कार्यात दिशाभूल होऊ शकते. घरात दडपण राहील. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. परीक्षेसाठी संपूर्ण तयारी करा. शुभ दि. ५, ९

मीन ः-
सूर्य चंद्र लाभयोग, शुक्र, मंगळ त्रिकोणयोग होत आहे. या सप्ताहात धंधात जम बसेल. मागील येणे वसूल करा. पैसे योग्य ठिकाणी गुंतवा. राजकीय-सामाजिक कार्यात मिळेल ती संधी घेऊन कार्याचा विस्तार करा. लोकांचे सहकार्य मिळेल. नोकरी लागण्याची शक्यता आहे. श्री साईनाथांचा जप करा. प्रयत्न व जिद्द यामुळेच कोणतेही कार्य करण्याची शक्ती मिळते. कला-क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. जीवन परिचय होईल. संशोधन कार्याला योग्य वळण मिळेल. याच सप्ताहात मोठे काम करून घ्या. कोर्टाच्या कामात सहाय्य मिळेल. परीक्षेसाठी मेहनत घेतल्यास चांगले यश मिळेल. शुभ दि. ६, १०

- Advertisement -