राशीभविष्य रविवार, ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर 2020

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : या सप्ताहात मीन राशीत बुध प्रवेश करीत आहे. चंद्र गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात चर्चा करताना क्षुल्लक मतभेद होतील. गिर्हाईकांबरोबर गोड बोला. धंदा वाढेल. नोकरीत कामात दुर्लक्ष नको. काम वाढेल. घरातील लोकांच्या मनाप्रमाणे वागता येईल. मौज मजा करण्यात वेळ घालवाल. राजकीय कार्यात तुम्हाला मागे टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. अपमानास्पद घटना घडू शकते. सामाजिक कार्यात लोकांचे सहकार्य मिळेल. धावपळ होईल. प्रकृती सांभाळा. शोध मोहिमेत चिडचिड होईल. परीक्षेसाठी मेहनत घ्या. मोठ्यांचा सल्ला ऐका. शुभ दि. 5, 9

वृषभ : या सप्ताहात मीन राशीत बुध प्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात तुम्हाला सुधारणा करण्याची गरज पडेल. नोकरीत तुमच्या कामावर वरिष्ठ खुश होतील. बदल करण्यात यश मिळू शकते. संसारातील तणाव कमी करता येईल. राजकीय कार्यात तुम्ही ठरविलेली कामे करून घ्या. वेळेला महत्त्व द्या. सामाजिक कार्यात लोकांच्या समस्येवर उपाय शोधता येईल. शोध मोहिमेत पुढे जाल. शिक्षणात जिद्द ठेवा. ध्येय गाठता येईल. खाण्याचे तंत्र सांभाळा. कायदा पाळा. शुभ दि. 7, 8

मिथुन : या सप्ताहात मीन राशीत बुध प्रवेश. बुध प्लुटो लाभ योग होत आहे. धंद्यात काम मिळवा. मोहात जास्त पडू नका. शेअर्समध्ये गुंतवणूक करताना योग्य सल्ला घ्या. नोकरीत वर्चस्व राहील. गोड बोलून तुम्हाला कुणी एखाद्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करू शकतो. घरात गैरसमज होईल. राजकीय कार्यात प्रतीक्षा राहील. अहंपणाने रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. सामाजिक कार्यात, दौर्यात सावध रहा. प्रवासात घाई करू नका. मोहात अडकू नका. पोटाची काळजी घ्या. वाहन हळू चालवा. शुभ दि. 5, 6

कर्क : या सप्ताहात मीन राशीत बुध प्रवेश करीत आहे. बुध, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात मोठे कंत्राट मिळवता येईल. फायदा वाढेल. तात्पुरत्या स्वरुपाची गुंतवणूक शेअर्समध्ये लाभ देऊ शकते. नोकरीत कौतुकास्पद काम कराल. कठीण काम पूर्ण करता येईल. घरातील वातावरण आनंदी राहील. राजकीय क्षेत्रात योजना पूर्ण करा. दौर्यात यश मिळेल. रागावर ताबा ठेवा. वाहन वेगाने चालवू नका. सामाजिक कार्यात लोकप्रियता मिळेल. परीक्षेसाठी चांगली तयारी करून ठेवा. शुभ दि. 5, 6

सिंह : या सप्ताहात मीन राशीत बुध प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात स्थिर मनाने लक्ष द्या. हिशोब चुकेल. नोकरीत वरिष्ठांच्या बरोबर चर्चा करताना संयम ठेवा. तुमचा मुद्दा पटवून देणे सोपे नाही. शेअर्समध्ये तुमचा अंदाज चुकेल. सावध रहा. संसारात काम वाढले तरी तुम्ही आनंदी रहाल. वृद्ध व्यक्तीची सेवा करावी लागेल. राजकीय क्षेत्रात मतभेद होईल. तुमच्यावर आरोप येईल. सामाजिक कार्यात लोकांचे प्रेम उपयोगी येईल. लोकांसाठी कार्य करा. यश सोपे नाही. राग आवरा. अभ्यासात आळस नको. मेहनतीने यश मिळवा. शुभ दि. 5,6

कन्या : या सप्ताहात मीन राशीत बुध प्रवेश होत आहे. बुध गुरु लाभयोग होत आहे. धंद्यातील तणाव, समस्या कमी करता येईल. उतावळेपणा करू नका. मैत्रीतून मोठे कंत्राट मिळवता येईल. नोकरीत प्रभाव वाढेल. घरातील प्रश्नावर उत्तम मार्ग शोधता येईल. राजकीय कार्याला गती देता येईल. पोटाची काळजी घ्या. उष्णता वाढेल. सामाजिक कार्यात लोकांच्या बाजूने उभे राहता येईल. वेळेला महत्त्व द्या, म्हणजे तुमचे महत्त्व टिकून राहील. अभ्यासात लक्ष द्या. यश मिळेल. कायद्याचे पालन करा. व्यसन टाळा. शुभ दि. 8,9

तूळ : या सप्ताहात मीन राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र षडाष्टग योग होत आहे. धंद्यात समोरची व्यक्ती विश्वासघात करू शकते. सावध रहा. राग वाढेल. संयम ठेवा. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. जवळची माणसे तुम्हाला फारसे महत्त्व देणार नाहीत. नोकरीत कामात चुका करू नका. मोहाचे क्षण टाळावे लागतील. आर्थिक व्यवहारात नुकसान होईल. राजकीय कार्यात तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न होईल. प्रवासात धोका केला जाऊ शकतो. सामाजिक कार्यात विरोधक हल्लाबोल करतील. तटस्थ रहा. नम्र रहा. वातावरणाचे मतावर दडपण येईल. विद्यार्थ्यांनी जिद्दीने पुढे जावे. अस्थिर व्हाल. राग आवरा. शुभ दि. 5,1०

वृश्चिक : या सप्ताहात मीन राशीत बुध प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात उत्साहवर्धक घटना घडेल. नवे काम मिळवा. मित्र मदत करतील. जुना व्यवहार पूर्ण करता येईल. नोकरीत प्र भाव वाढेल. चांगला बदल करता येईल. नवीन ओळखी होतील. संसारात शुभ समाचार मिळेल. इतरांना प्रेरणा देता येईल. राजकीय कार्यात तुम्हाला वेगाने पुढे जाता येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही लोकप्रिय व्हाल. शोधमोहीम यशस्वी कराल. विद्यार्थी वर्गाने स्थिर रहावे. कठीण प्रसंगावर मात करता येईल. शुभ दि. 7,९

धनु : या सप्ताहात मीन राशीत बुध प्रवेेश होत आहे. चंद्र गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात नमते धोरण ठेवा. काम मिळवा. भागिदार त्याचा शब्द बदलण्याचा प्रयत्न करेल. बोलताना नोकरीत काळजी घ्या. राजकीय क्षेत्रात जवळचे लोक गैरसमज वाढवतील. तुम्ही योजनेवर लक्ष द्या. काम करा. सामाजिक काम करताना आरोप येऊ शकतो. संसारात तुमच्यावर एखादा ठपका ठेवला जाईल. धावपळ होईल. प्रकृतीची काळजी घ्या. शोधमोहीम प्रगतीची असेल. अभ्यासात लक्ष द्या. चंचल होऊ नका. चांगली संगत ठेवा. शुभ दि. 5, 6

मकर : या सप्ताहात मीन राशीत बुध प्रवेश, बुध गुरु लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. गुरुबलाचा फायदा तुम्हाला मिळेल. धंद्यातील वाद मिटवा. सुधारणा करा. नोकरीत वर्चस्व वाढेल. वरिष्ठांना खूश करता येईल. संसारात शुभ समाचार मिळेल. कोणतीही कठीण समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. राजकारणात प्रगती करता येईल. टीकेला उत्तर देण्यापेक्षा कार्य करा. समाजकार्यात रागावर ताबा ठेवा. जनतेचे प्रेम मिळेल. वाहन हळू चालवा. शोध मोहिमेत यश मिळेल. अभ्यास करा. दूर दृष्टीकोन ठेवा. कायदा सोडू नका. शुभ दि. 7, 8

कुंभ : या सप्ताहात मीन राशीत बुध प्रवेश करीत आहे. चंद्र बुध लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ करता आली नाही तरी स्थिरता ठेवता येईल. क्षुल्लक कारणाने संसारात वाद होईल. आपसात नाराजी होईल. नोकरीत कामाचा प्रभाव पडेल. सहकारी वर्गाकडून जिद्दीने काम करून घ्यावे लागेल. राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा राहील. कामाचा व्याप नीटपणे सांभाळा. निर्णयात चूक होऊ नये याची काळजी घ्या. सामाजिक कार्यात इतरांचा सल्ला घ्या. मते जाणून घ्या. परंतु प्रश्न सोडवताना सावधपणे उपाय शोधा. रागावर ताबा ठेवा. आरोग्यात बेसावधपणा नको. वाहन जपून चालवा. शोधमोहीम यशस्वी कराल. शुभ दि. 5, 6

मीन : या सप्ताहात तुमच्याच राशीत बुध प्रवेश करीत आहे. शुक्र गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करता येईल. संयमाने प्रकरण हाताळा. चर्चा जोमाने कराल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. जिद्दीने यश मिळवता येईल. संसारातील तणाव कमी होईल. राजकीय कार्यात तुमचे डावपेच यशस्वी होतील. सामाजिक कार्यात जनहिताचा निर्णय घेता येईल. सर्व सोपे आहे असे समजू नका. उतावळेपणा करू नका. मदतकार्याला पैसा मिळेल. शोधमोहीम यशस्वी कराल. इतरांना आधार देता येईल. शुभचिंतन करा. शुभ दि. 5, 8