घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशी भविष्य २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०१८

राशी भविष्य २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०१८

Subscribe

मेष : रविवार अनंत चर्तुदशीच्या दिवशी तुमच्या मनाप्रमाणे घटना घडवता येतील. मैत्री वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात अरेरावी केल्याने तणाव होईल. धंधावर लक्ष ठेवा. सूर्य हर्षल बडाष्टक योग, चंद्र शुक्र प्रतियुति होत आहे. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. धंधात समस्या होईल. कामगार नाराज होऊ शकतात. संसारात वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. कोर्टकेस किचकट होईल. संयम ठेवा. कमी बोला. गैरसमज वाढू देऊ नका. कला-क्रिडा क्षेत्रात अपयशाने खचू नका. प्रगति होईल. नोकरीत कायदा पाळा. काम वाढेल. संशोधन कार्यात नजर चुकीने एखादा मुद्दा राहून जाईल. विद्यार्थी वर्गाने चुकीचा मार्ग घेऊ नये. शुभ दि. २७, २८

वृषभ : बुध, मंगळ त्रिकोण योग, चंद्र बुध प्रतियुति होत आहे. रविवार तुमच्या पद्धतीने साजरा कराल. अनंत चतुर्दशीच्यादिवशी आहे. सामाजिक कार्याचा विस्तार करता येईल. धंदा वाढेल. राजकीय क्षेत्रात महत्वाची भेट घेता येईल. सप्ताहाच्या शेवटी गैरसमज झाल्याने संसारात तणाव होईल. जीवनसाथी मुळे यांच्याबरोबर मतभेद होईल. धंधात नवे काम मिळवा. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगति होईल. मोठे आश्वासन मिळेल. कोर्टकेसमध्ये समजूतदारपणे चर्चा करा. योग्य सल्ला घ्या. विद्यार्थ्यांनी खाण्याची काळजी घ्यावी. आई-वडिलांच्या बरोबर खोटे वागणे घातक ठरेल. संशोधन कार्यात मेहनत पडेल. शुभ दि. २४, २५

- Advertisement -

मिथुन : रविवार अनंत चतुर्दशी आहे. तुमच्या पद्धतीनुसार कार्यक्रम ठरवता येईल. तुम्हाला चांगल कार्य करता येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. लोकप्रियता मिळेल. राजकीय क्षेत्रात पदाधिकार आत्ताच मिळू शकतो. प्रयत्न करा. धंद्यात मोठे कंत्राट मिळवा. संसारात आनंदी बातमी मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. नविन नोकरी घेता येईल. घर, वाहन, जमिन खरेदी करू शकाल. कोर्टकेस संपवा. वरिष्ठांची मदत घेता येईल. मैत्रीत वाढ होेईल. प्रेमाला चालना मिळेल. सल्यासाठी तुम्ही भेटू शकता. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. संशोधन कार्यात नावलौकिक वाढेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धी व लाभ मिळेल. शुभ दि. २४, २५

कर्क : चंद्र बुध प्रतियुती, सूर्य मंगळ त्रिकोणयोग होत आहे. रविवार अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोणतेही धाडस करताना सावधगिरी ठेवा. वाद वाढवू नका. दुखापत संभवते. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे विचार सर्वांना पटवून देता येईल. संयमाने वागा. प्रभाव वाढणे. लोकप्रियता मिळवा. धंधात जम बसेल. मैत्रीतून मोठे काम मिळेल. संसारात प्रेमाचे वातावरण राहिल. प्रेमाला चालना मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रात चमकाल. नविन ओळख वाढेल. जुने मित्र भेटतील. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. नम्रता ठेवा. गुप्तकारवायांचा अभ्यास करून ठेवा. संशोधन कार्यात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे यश मिळेल. जेवढे प्रयत्न तेवढे यश मिळेल. घर, वाहन, दुकान इ. खरेदीचा विचार कराल. शुभ दि. २५, २६

- Advertisement -

सिंह : रविवार मनाप्रमाणे घटना घडतील. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विशेष कल्पना सुचेल. विचारांना चालना मिळेल. चंद्र, शुक्र, त्रिकोण योग, चंद्र, बुध प्रतियुति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्व वाढेल. सप्ताहाच्या मध्यावर गुप्त कारवायांचा त्रास होईल. थकवा वाढेल. प्रवासात सावध रहा. धंधात गम बसेल. मागिल येणे वसूल करा. घरात शुभ घटनांची चर्चा होईल. उत्साह वाढेल. विवाहासाठी सगळे येतील. कला-क्रिडा क्षेत्रात फायदा होईल. कला-क्रिडा क्षेत्रात फायदा होईल, पुरस्कार मिळेल कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. मोठ्या लोकांची मदत होईल. संशोधन पूर्ण होईल. परिक्षेत्र चांगले यश मिळेल. शुभ दि. २३, २७

कन्या : रविवार अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाद होऊ शकतो. कोणताही समस्या वाढवू नका. दादागिरीची भाषा त्रासदायक ठरेल. सूर्य, मंगळ त्रिकोण योग, चंद्र शुक्र प्रति युती होत आहे. या सप्ताहात कोणताही निर्णय घेता येईल. परंतू कोणलाही दुखवु नका. राजकीय-सामाजिक कार्यात नम्रता ठेवा. वरिष्ठांचा सल्ला घ्या. जवळचे लोक मदत करतील असे समजू नका. धंधा वाढेल. फायदा होईल. तुमच्या स्वभावचा फायदा घेण्याचा प्रयत्न होईल. कला-क्रिडा क्षेत्रात स्पर्धा वाढेल. कोर्टकेसमध्ये संयमाने बोला. संशोधन कार्यात मार्ग मिळेल. सहकार्य कमी पडू शकते. शेजारी त्रास करण्यासाची शक्यता आहे. शुभ दि. २५, २६

तुला : सूर्य हर्षल बडाष्टक योग, चंद्र गुरु प्रतियुती होत आहे. कठीण प्रसंगावर मात करू शकाल. अनंत चतुर्दशीच्या दिवशी उत्साह राहिल. धंधात उतावळेपणाने शब्द देऊ नका. खर्च वाढेल. कामगारांची समस्या तुम्हाला सतावेल. राजकीय-सामाजिक कार्यात सोमवार, मंगळवार अडचणी येतील. रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सावध रहा. दुखापत संभवते. कला-क्रिडा क्षेत्रात स्पर्धा फारच कठीण असेल. संसारात किरकोळ नाराजी होऊ शकते. कोर्टकेस मध्ये अडचणी येतील. थोरा-मोठ्यांचे सहकार्य मिळेलच असे कधीही समजू नका. कोणताही करार करू नका. विद्यार्थी वर्गाने चिडचिड न करता अभ्यास करावा. संशोधन कार्यात चूक होऊ शकते. शुभ दि. २७, २८

वृश्चिक : वृश्चिक साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. रविवार अनंतचतुर्दशीच्या दिवशी तुम्ही आनंदी रहाल. किरकोळ वाद वाढवू नका. मैत्रीत नाराजी होऊ शकते. चंद्र, प्रतियुती, सूर्य मंगळ त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्वाची कामे करा. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येऊ शकतात. विरोधक तुमच्या विरोधात जातील. तक्रार करणारी जनता वाढेल. धंधात लक्ष घ्या. आळस करू नका. कला-क्रिडा क्षेत्रात मेहनत घ्या. जिद्द ठेवा. कोर्टकेसमध्ये अडचणी येऊ शकतात. विद्यार्थी वर्गाने आळस न करता अभ्यास करावा तरच पास व्हाल. संशोधन कार्याला दिशा मिळेल. शुभ दि. २५, २६

धनु : धनुराशीला साडेसातीचे दुसरे पर्व सुरू आहे. चंद्र, बुध प्रतियुति, सूर्य मंगळ त्रिकोण योग होत आहे. तुमच्या कार्याला दिशा मिळेल. गुप्त कारवर्‍यांना आळा घालता येईल. धंधात सुधारणा होईल. गुंता सोडवता येील. संसारात शुभ घटना घडेल. मुलांची प्रगति होईल. राजकीय-सामाजिक कार्यातील चूका सुधारणा येतील. आरोप दूर करा. तुमची लोकप्रियता वाढेल. कला-क्रिडा क्षेत्रात चमकाल. कोर्टकेस पूर्णपणे संपवा. हेच योग्य राहिल. परदेशात जाण्याचा योग येईल. थकबाकी वसुल करा. नविन ओळखी वाढतील. विद्यार्थी वर्गाला मोठे यश मिळवता येईल. आळस करू नये. संशोधन कार्यात यश मिळेल. वरिष्ठ खुष होतील. नोकरी मिळेल. शुभ दि. २५, २६

मकर : चंद्र शुक्र त्रिकोण योग, चंद्र बुध कार्य व्यवस्थितपणे पूर्ण करता येईल. प्रत्येक दिवस प्रयत्नांना यश देणारा ठऊ शकतो. धंधात सुधारणा होईल. वाद मिटवता येईल. गुंतवणूकदार स्वतःहून येतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्व वाढेल. लोकांचा विश्वास संपादन करता येईल. सणांचे महत्व वाढणे महत्वाचे आहे. परंतू आवाजाचे प्रदुषणाबाबत सर्वांनी प्रयत्न करावयास हवे. शहरात मोठ्या बिल्डिंग असल्याने आवाज तिकडेच घुमतो. म्हणून आवाज जास्त होतो. यावर उपाय शोधायाची गरज आहे. कला-क्रिडा क्षेत्रात चमकाल. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. संशोधन कार्यात दिशा मिळेल. परिक्षेत यश मिळेल. शुभ दि. २३, २५

कुंभ : रविवार अनंतचतुर्दशीच्या दिवशी तुम्ही आनंदी रहाल. महत्वाच्या वस्तु सांभाळा. सूर्य हर्षल बडाष्टक योग होत आहे. चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे विचार योग्य असतील परंतू त्यात विरोध होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यातून गैरकार्य काढला जाईल. धंधात समस्या येऊ शकते. कामगार कार्य पडतील. कुटुंबाला शेजारी त्रस्त करण्याचा प्रयत्न करेल. मुलांचे सहकार्य मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रात यश सोपे नाही. प्रगति होईल. कोर्टकेस मध्ये किरकोळ वाद वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. शब्द जपून वापरा. विद्यार्थी वर्गाने वडिलधार्‍या व्यक्तीशी उद्धटपणे व्यवहार करू नये. नोकरीत दडपण वाढेल. शुभ दि. २७, २८

मीन : रविवार अनंतचतुर्दशीच्या दिवशी कोणतीही चूक करू नका. थट्टा-मस्करी करणे अंगाशी येऊ शकते. स्त्रियांची छेडछाड करणे महागात पडेल. सूर्य मंगळ त्रिकोण योग, चंद्र, बुध प्रतियुति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यास तुमच्याकडे अतिमहत्वाचे काम सोपवले जाईल. सण म्हटला की आवाजाचे प्रदूषण सर्व ठिकाणी प्रमाणाबाहेर असते. परंतू कोणाताही समाजसेवक यावर उपाय शोधत नाही. पैसे खर्चून आजारपण ओढावून आपण घेतो. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगति होईल. कोर्टकेसमध्ये सहाय्य मिळू शकेल. संशोधन कार्यात सुधारणा होईल. नोकरीतील तणाव कमी होईल. शुभ दि. २७, २८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -