साप्ताहिक राशी भविष्य १२ जानेवारी २०२० ते १८ जानेवारी २०२०

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष : या सप्ताहात मकर राशीत बुध, रवि प्रवेश, सूर्य प्लुटो युती होत आहे. धंद्यात नेटाने काम करा. शेअर्सचा अंदाज घेता येईल. थकबाकी वसूल करा. नवे कंत्राट मिळवता येईल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. अधिकारात वाढ होईल. घरातील वातावरण आनंदी राहिल. तुम्ही अस्थिर होऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे डावपेच यशस्वी करता येतील. विरोध होईल. तुम्ही खंबीर रहा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. पुरस्कार मिळेल. ओळखी वाढतील. कोर्टकेस जिंकाल. रागावर ताबा ठेवा शिक्षणात प्रगतीचा चांगला मार्ग मिळेल. शोध मोहिम यशस्वी कराल वाहन जपून चालवा. शुभ दि. १३, १४

वृषभ : या सप्ताहात मकर राशीत बुध, रवि प्रवेश करीत आहे. सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यातील अडचणी कमी होतील. नवे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. वसूल करा. नोकरीतील समस्या सोडवता येईल. चूक सुधारता येईल. घरातील. वाद कमी होईल. कामे करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. वेगाने जुनी कामे पूर्ण करा. आर्थिक व्यवहार सावधपणे करा. कला-क्रीडा क्षेत्रात आशादायक वातावरण राहिल. शोध मोहिमेत इतरांचे सहाय्य घेता येईल. विद्यार्थी वर्गाने प्रामाणिकपणे अभ्यास करावा. शुभ. १५, १६

मिथुन : या सप्ताहात मकर राशीत बुध, रवि, प्रवेश चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. तुमचा आत्मविश्वास टिकून राहिल. धंद्यात काम मिळवण्यासाठी सौम्य शब्दात बोला. दादागिरीची छटा दिसू देऊ नका. वसूली करा. नोकरीत काम वाढेल. कायद्याच्या चौकटीत राहून कोणताही निर्णय घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात जबाबदारी वाढेल. तुमच्या विचारानवर टिका होईल. प्रवासात सावध रहा. घरातील कामे करण्यात खर्च वाढू शकतो. नोकरांना सांभाळा. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे पुढे जाता येईल. शोध मोहिमत तणाव होऊ शकतो. तात्पुरत्या अडचणी शिक्षणात येतील. जिद्द ठेवा. शुभ दि. १२, १७

कर्क : या सप्ताहात मकर राशीत बुध, रवि प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील परिस्थिती सुधारता येईल. वाद मिटवा. वेळेत काम करून देता येईल. नवे काम मिळवता येईल. नोकरीत वरिष्ठांचा मान राखून काम करा. तुमचे महत्त्व वाढेल. घरातील कामे वाढतील. पाहुणे येतील. पोटाचाी काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यातील तणाव कमी करू शकाल. गैरसमज संपवा. मैत्रीत थोडा वाद राहू शकतो. कला-क्रीडा क्षेत्रात यश खेचता येईल. कोर्टाच्या कामाला दिशा मिळेल. शिक्षणात आळस नको. चांगले मित्र ठेवा. शोध मोहिमेत प्रगती कराल. शुभ दि. १४, १५

सिंह : या सप्ताहात मकर राशीत बुध, रवि प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. रविवार कामाचे दडपण येईल. प्रवासात सावध रहा. धंद्यात किरकोळ अडचण येईल. काम मिळवता व पूर्ण करता येईल. नोकरीत काम वाढेल. वरिष्ठ तुमच्याकडे जबाबदारी देण्याची शक्यता आहे. संसारातील कामे होतील. तणाव कमी होईल. अध्यात्मिक कार्यात मन रमेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला तत्परता दाखवावी लागेल. मतभेद होऊ शकतो. स्वतःचाी हट्ट जास्त करू नका. मिळते धोरण उपयोगी पडेल. कला-क्रीडा स्पर्धेत कष्ट घ्या. कोर्टाच्या कामात सावधपणे बोला. अहंकार दाखवू नका. शिक्षात पुढे जाता येईल. शुभ दि. १५, १७

कन्या : या सप्ताहात मकर राशीत बुध, रवि प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात काम मिळवता येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध काम करावे लागेल. संसारात नाराजी होईल. खर्च वाढेल. पोटाची काळजी घ्या. नोकरीतील गैरसमज दूर करण्याची संधी मिळल्यास ती घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात सहभाग वाढवता येईल. लोकांच्या विरोधात बोलू नका. सहकारी, नेते यांचा विचार ऐकून घ्या. कला-क्रीडा साहित्यात तुम्हाला प्रयत्नाने यश खेचता येईल. नवीनच ओळख झालेल्या माणसाबरोबर व्यवहार करतांना काळजी घ्या. कोर्टाच्या कामात सुधारणा होईल. शोध मोहिम यशस्वी होईल. शिक्षणात आळस करू नका. शुभ दि. १२, १८

तूळ : या सप्ताहात मकरराशीत बुध, रवि प्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यात किरकोळ समस्या येईल. तुमचे मत समोरच्या व्यक्तीला सविस्तरपणे समजावावे लागेल. गैरसमज होऊ शकतो. नोकरीत गोड बोलून काम करा व करून घ्या. संसारातील कामे होतील. वेळेला महत्व द्या. राजकीय-सामाजिक कार्यात मत भिन्नतेमुळे तणाव होऊ शकतो. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन ओळख होईल. कष्ट घ्या. कोर्टाच्या कामात विचाराने बोला. सल्ला घ्या. शोध मोहीम यशस्वी कराल. मन अस्थिर करू नका. शिक्षणात प्रगतीकडे लक्ष द्या. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. शुभ दि. १२, १३

वृश्चिक : या सप्ताहात मकर राशीत बुध, रवि प्रवेश, सूर्य प्लुटो युति होत आहे. धंद्यात नवा विचार मिळेल. ओळखीतून काम मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. मैत्रीत सावध रहा. नोकरीत प्रभाव पडेल. वरिष्ठांना खुष कराल. बदल करता येईल. संसारातील समस्या सोडवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्व वाढेल. विरोधक मात्री खंबीर राहतील. लोकांचे सहकार्य मिळवणे सोपे नसेल. राग वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात पराक्रम कराल. शोध मोहिमेत प्रगती होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. घर, जमिन घेण्याचे ठरवता येईल. विद्यार्थी वर्गाचा आत्मविश्वास वाढेल. आळस करू नका. शुभ दि. १२, १३

धनु : या सप्ताहात मकर राशीत बुध, रवि प्रवेश, बुध प्लुटो युति होत आहे. साडेसाती सुरू असलील तरी तुमच्या कार्याला गती प्राप्त होईल. धंद्यात फायदा वाढेल. नवे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. रविवार किरकोळ तणाव होईल. दुखापत होऊ शकते. घरातील कामे होतील. घर, वाहन खरेदी-विक्री करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीचे कार्य करता येईल. पदाधिकारी मिळवा. मागे राहू नका. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. कला-क्रीडा-साहित्यात चमकाल. कौतुक होईल. शोध मोहिम गाजेल. विद्यार्थी वर्गाला मागे राहण्याची गरज नाही. ध्येय गाठा. शुभ दि. १३, १४

मकर : या सप्ताहात तुमच्या राशीत बुध, रवि प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. साडेसाती सुरू आहे. उतावळेपणा कुठेही उपयोगी पडणार नाही. संयम ठेवा. खंबीर रहा. धंद्यात सुधारणा करता येईल. वसूल करता येईल. नोकरीत कायदा पाळा. वरिष्ठांची मर्जी राखवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. राजकीय-सामाजिक कार्यात अभ्यासपूर्ण चर्चा करता येईल. योग्य अनुभवी व्यक्तीचा विचार घ्या. स्वतःमध्ये असलेली कमतरता शोधा म्हणजे संधी मिळेल तेव्हा अधिक पुढे जाता येईल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती कराल. शोध मोहिमेत यश मिळेल. शिक्षणात जिद्द ठेवा. शुभ दि. १७, १८

कुंभ : या सप्ताहात मकर राशीत बुध, सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. रविवारी तुम्हाला कटकटीची कामे करावीी लागतील. शेजारी तुमच्यावर एखादा आरोप करण्याचा प्रयत्न करेल. धंद्यात करतांना घाई करू नका. व्यवहारात सावध रहा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. दुसर्‍यांच्या चूका सुधाराव्या लागतील. संसारातील कामे होतील. धावपळ होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या विचारांचा गैरअर्थ काढला जाईल. आपसांत भांडण लावण्याचा प्रयत्न विरोधक करतील. कला-क्रीडा स्पर्धेत माघार घ्यावी लागेल. तुम्ही जिद्द ठेवा. शोध मोहीम कठीण असेल. विद्यार्थी वर्गाने विचारपूर्वक निर्णय घ्यावा. शुभ दि. १४, १८

मीन : या सप्ताहात मकर राशीत बुध, रवि प्रवेश, चंद्र बुध त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात चांगला फायदा होईल. मोठे कंत्राट मिळवता येईल. थकबाकी मिळवण्याचा प्रयत्न करा. संसारात खर्च होईल. वाद होईल. गोड बोलून चर्चा करा. नोकरीत वरिष्ठांना खुष करता येईल. चांगला बदल करण्याची संधी येऊ शकते. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला अधिकार होणारे ठरेल. जनहितासाठी कार्य करत रहा. कला-क्रीडा स्पर्धेत यश मिळवाल. कोर्ट केस मध्ये जिंकाल. सौम्य शब्दात बोला. शोध मोहिम यशस्वी होईल. विद्यार्थी वर्गाने पोटाची काळजी घ्यावी, चांगली संगत ठेवावी. प्रगती होईल. शुभ दि. १२, १६