राशीभविष्य : रविवार १९ जानेवारी ते शनिवार २५ जानेवारी २०२०

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- या सप्ताहात २४ जानेवारीला मकरेत शनि महाराज प्रवेश करीत आहे. सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसवा. नवे काम मिळेल. नोकरीत फायदेशिर बदल करता येईल. प्रकृतीची काळजी घ्या. धावपळ होईल. प्रवासात सावध रहा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे स्थान पक्के होईल. तुमचा कामाचा बोलबाला होईल. घरातील चिंता कमी होईल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंदी व्हाल. घर, जमीन खरेदी करता येईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल. कला-क्रीडा शिक्षणात प्रगती होईल. परदेशात जाल. शोधमोहीम फत्ते कराल. शुभ दि. १९, २०

वृषभ :- या सप्ताहात मकर राशीत शनि प्रवेश झाल्याने तुमच्या कामातील अडचणी कमी होण्यास सुरुवात होईल. चंद्र बुध लाभयोग होत आहे. धंद्यात लक्ष द्या. सुधारणा करता येईल. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. घाईत गुंतवणूक करू नका. नोकरीतील वाद कमी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात आळस न करता कामे करा तरच तुमचा निभाव लागेल. कुटुंबात वृद्ध व्यक्तीकडे लक्ष द्यावे लागेल. व्यवहार सावधपणे करा. कोर्टाच्या कामात आशादायक वातावरण निर्माण होऊ शकते. कला-क्रीडा-शिक्षण क्षेत्रात पुढे जाता येईल. शोधमोहिमेत कठीण काम करून दाखवाल. शुभ दि. २०, २५ 

मिथुन :- या सप्ताहात मोठा ग्रह शनि मकरराशीत २४ जाने. ला प्रवेश करीत आहे. चंद्र गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात अचानक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. वसुली करण्यात यश मिळेल. नवे काम जिद्दीने मिळवा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. घरात वरिष्ठ नागरिक असल्यास चिंता वाटेल. उतावळेपणाने राजकीय-सामाजिक कार्यात मत मांडू नका. तणाव होईल. प्रवासात घाई करू नका. कायद्याने पालन करा. कोर्टाच्या कामाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. कला-क्रीडा-साहित्यात प्रसिद्धी मिळण्यास वेढा लागेल. शोधमोहीम कठीण आहे. शुभ. १५, १६

कर्क :- या सप्ताहात शनि महाराज मकर राशीत प्रवेश करीत आहे. सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. घरातील व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी वाटेल. घरात वाटाघाटीवरून तणाव होऊ शकतो. धंद्यात सुधारणा करू शकाल. नवे काम मिळेल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा उपयोग करून घेता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगती करता येईल. वरिष्ठ तुमचे विचार ऐकून घेतील. कोर्टाच्या कामात सावध रहा. अनुभवी व्यक्तीला कमी लेखू नका. कला-क्रीडा -साहित्याला चालना मिळेल. मित्रत्वामध्ये वाद संभवतो. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. शुभ दि. २०, २५

सिंह :- मकर राशीत शनि प्रवेश या सप्ताहात होत आहे. चंद्र गुरु युती होत आहे. कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. धंद्यात नीट धोरण ठरवा. गोड बोलून फसवले जाईल याकडे लक्ष द्या. वसुली करता येईल. नोकरीत काम वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप येतील. तुमचे बोलणे वादग्रस्त ठरू शकते. संसारात जबाबदारी वाढेल. जवळच्या व्यक्ती सहाय्य करतील. तात्पुरत्या अडचणी सहन करा. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन संधी मिळेल असे वाटेल. शोधमोहिमेत जिद्द ठेवा. कोर्टाच्या कामात योग्य मुद्दे तयार करा. रागावर ताबा ठेवणे कठीण होईल. शुभ दि. १९, २०

कन्या :- या सप्ताहात मकरराशीत शनि ग्रह प्रवेश करीत आहे. चंद्र बुध लाभयोग होत आहे. धंद्यात लक्ष द्या. लाभ वाढेल. काम मिळेल. नोकरीतील तणाव कमी होईल. नवीन ओळखीबरोबर कोणताही व्यवहार बेधडकपणे करू नये. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला न थांबता कामे करावी लागतील. जवळच्या लोकांना नाराज करू नका. घरात कामे वाढतील. खर्च करावा लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शिक्षणात आळस करू नये. चांगली संगत ठेवावी व्यसन लागण्यास वेळ लागत नाही, पण व्यसन सोडणे कठीण वाटते. कोर्टाच्या कामात मदत मिळेल. शुभ दि. २०, २५

तुला :- या सप्ताहात मकर राशीत शनि ग्रहप्रवेश करीत आहे. चंद्र शुक्र लाभयोग. काम मिळवा. वेळेत काम पूर्ण करा. नोकरीत कामाचा व्याप वाढला तरी प्रभाव पाडता येईल. कामात नीट लक्ष द्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या कामाबरोबर इतर लोक स्पर्धा करतील. कारस्थाने करतील. तुम्ही स्थिर मनाने काम करा. घरातील कामे होतील. अपुरे संसारातील स्वप्न पूर्ण करा. शोधमोहीम पूर्ण कराल. कला-क्रीडा क्षेत्रात जिद्द ठेवावी लागेल. शिक्षणात आळस न करता ध्येय गाठा. नम्रपणे बोला. शुभ दि. १९, २०

वृश्चिक :- या सप्ताहात मकर राशीत शनि महाराज प्रवेश करीत आहे. २४ जाने रोजी हा प्रवेश होईल. त्यामुळे वृश्चिक रात्रीची साडेसाती संपणार आहे. धंद्यात जास्त मेहनत घ्या. मोठे काम मिळवा. फायदा वाढेल. अचानक प्रवास कराल. नोकरीत मनाप्रमाणे बदल करता येईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. गुप्त कारवाया होतील. रविवारी मनावर ताण येईल. वाहन जपून चालवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टकेस यशस्वी कराल. शोधमोहीम फत्ते कराल. विद्यार्थी वर्गाने जे ठरवले असेल ते करता येईल. पुढे जा. शुभ दि. २०, २५

धनु :- या सप्ताहात मकर राशीत शनि ग्रह २४ जानेवारीला प्रवेश करीत आहे. सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धनुराशीची साडेसातीची पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. धंद्यात तुम्ही मागे पडलात. परंतु आता नवीन संधी शोधा. काम मिळेल. वसुली करा. कर्जाचे काम होईल. घर, जमीन खरेदी-विक्रीत फायदा होईल. नोकरीत प्रगतीची वाटचाल सुरू होईल. कंपनी द्वारा परदेशात जाण्याचा योग येईल. राजकीय-सामाजिक कार्यात नव्याने स्थान तयार करा. लोकांच्या गरजा ओळखून कार्याची आखणी करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती कराल. शिक्षणात अधिक प्रश्न प्रतीचे यश मिळेल. शुभ दि. १९, २५

मकर :- या सप्ताहात तुमच्याच राशीत शनि महाराज प्रवेश करत आहेत. चंद्र मंगळ युती होत आहे. धंद्यात दुर्लक्ष करून चालणार नाही. अंदाज घेताना सावधगिरी बाळगा. वसुली होईल. कर्जाचे काम करण्याचा प्रयत्न करा. नोकरीतील ताण कमी होण्यास सुरुवात होईल. कायद्यात राहूनच काम करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगतीला आळा बसला आहे. वाटेल. तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा. पुढे संधी मिळू शकेल. लोकांचे प्रेम मिळवा. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाता येईल. शिक्षणात बेफिकीरीने वागू नगा. नम्रता ठेवा. शोधमोहिमेत जिद्द ठेवा. यश येईल. कोर्टाच्या कामात फसगत टाळा. शुभ दि. २०, २५

कुंभ :- या सप्ताहात २४ जानेवारी रोजी शनि ग्रह मकर राशीत प्रवेश करीत आहे. कुंभ राशीला साडेसाती शुरू होत आहे. या सप्ताहात तुमचा उत्साह व आत्मविश्वास टिकून राहील. धंद्यात काम मिळवण्यासाठी मेहनत घ्या. मागील येणे वसूल करा. नोकरीमध्ये कामात चूक होऊ शकते. उतावळेपणाने बोलू वागू नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला कमी महत्त्व मिळण्याची शक्यता आहे. तुमचा मुद्दा दुर्लक्षित केला जाईल. घरातील माणसे मदत करतील. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखी होतील. कोर्टाच्या कामात सावध रहा. मदत मिळवणे कठीण होऊ शकते. शुभ दि. १९, २०

मीन :- या सप्ताहात मकर राशीत शनी ग्रहाचा प्रवेश २४ जानेवारीला होत आहे. सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. रविवारी कामात चूक होऊ शकते. खाण्याची काळजी घ्या. धंद्यात फायदा होईल. शेअर्समध्ये योग्य सल्ल्याने गुंतवणूक करता येईल. नोकरीत लाभदायक संधी मिळेल. मनाप्रमाणे बदल करता येईल. तुम्ही सल्ल्यासाठी भेटू शकता. राजकीय-सामाजिक कार्यात पदाधिकार मिळेल. घरातील लोकांना दुखवू नका. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळखीवर जास्त विश्वास ठेऊ नका. शोधमोहीम यशस्वी कराल. शिक्षणात पुढे जाल. मोठे ध्येय गाठाल. दूरच्या प्रवासात सावध रहा. शुभ दि. २०, २५