साप्ताहिक राशीभविष्य रविवार 24 नोव्हेंबर ते शनिवार 30 नोव्हेंबर २०१९

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- शुक्र गुरु युति, बुध नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. धंद्यात लक्ष दिल्यास चांगला जम बसेल. नवे कंत्राट मिळवता येईल. संसारात मनावरील ताण कमी होईल. मुलांकडून प्रगतीची बातमी कळेल. राजकीय-सामाजिक कार्यात विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमच्यावर आरोप टाकला जाईल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. नोकरीत क्षुल्लक चूक कामामध्ये होऊ शकते. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढतील. नव्या कामाचे आश्वासन मिळेल. जुने मित्र भेटतील. शोध मोहीम पूर्ण करताना अडचणीतून जावे लागेल. कोर्ट केसमध्ये नम्रता ठेवा. शिक्षणात प्रगती करता येईल. शुभ दि. २४, २५

वृषभ :- मंगळ हर्षल प्रतियुती, सूर्य चंद्र युति होत आहे. धंद्यात थंड डोक्याने काम करा. चर्चा वादग्रस्त ठरू शकते. वाहनाचा वेग कमी ठेवा. भागिदारीत एकमत होणार नाही. नोकरीत वरिष्ठांचे सहाय्य मिळाले तरी सहकारी मदत करण्यात काचकुच करतील. मौल्यवान वस्तू सांभाळा. संसारात नाराजी होईल. खर्च वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहील. पद मिळण्याची आशा वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. प्रकृतीची काळजी घ्या. खाण्या-पिण्याचे तंत्र सांभाळा. कोर्टाच्या कामात जिद्द ठेवा. शिक्षणात चांगले मित्र ठेवा. वेळ फुकट घालवू नका. शुभ दि. २६, २७

मिथुन : या सप्ताहात शुक्र गुरु युति, चंद्र बुध लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसवता येईल. वादविवादात जास्त आवाज चढवू नका. मागिल येणे वसूल करा. मागिल येणे वसूल करा. नोकरीत परिस्थिती पाहून निर्णय घ्या. कायदा मोडू नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न होईल. तुम्ही चांगल्या कामाकडे लक्ष ठेवा. संसारात मुले आनंद देतील. जीवनसाथीच्या नोकरीत प्रगती होईल. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक घटना घडेल. नवे परिचय होतील. कोर्टाच्या कामात चातुर्य वापरा. शोध मोहिमेत वरिष्ठांना कमी लेखू नका. शिक्षणात मोठ्या व्यक्तींचा अवमान करू नका. शुभ दि. २४, २९

कर्क :- मंगळ हर्षल प्रतियुती, शुक्र गुरु युती तुमचे मन अस्थिर करेल. राग वाढेल. भावना व व्यवहार यामध्ये गोंधळ होईल. धंद्यात हलगर्जीपणा नको. नवीन ओळख झालेल्या माणसावर एकदम विश्वास टाकू नका. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. जवळचे लोक गैरसमज पसरवतील. प्रवासात सावध रहा. अडचण येऊ शकते. कोर्टाच्या कामात गुप्त कारवायांचा त्रास होऊ शकतो. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शोध मोहीम तुमच्या हिमतीवर पुढे न्याल. विद्यार्थी वर्गाने व्यसनाच्या नादी लागू नये. ध्येय समोर ठेवा. शुभ दि. २६, २७

सिंह :- शुक्र गुरु युती, बुध नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात नवे काम मिळवा. जुने काम वेळच्यावेळी पूर्ण करा. भ्रमात राहू नका. जुनी वसुली करता येईल. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या विरोधात चर्चा होऊ शकते. तुमच्यावर आरोप, टीका होईल. कोर्टाच्या कामात तत्पर रहा. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवे काम मिळेल. दिग्गज लोकांचा परिचय होईल. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. शोध मोहिमेत कुणालाही कमी समजू नका. शिक्षण होईल. शुभ दि. २८, २९

कन्या :- चंद्र मंगळ लाभ योग, बुध नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. या सप्ताहात धंद्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. नवे काम मिळवता येईल. ओळखीतून मोठे काम मिळेल. नोकरीत वर्चस्व राहील. परदेशात जाण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात अधिकार प्राप्तीची शक्यता निर्माण होईल. संसारात क्षुल्लक अडचणी येतील. नाराजी होईल. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवीन ओळख झालेला माणूस तुम्हाला प्रलोभ दाखवेल. तुम्ही योग्य सल्ला घ्या. शिक्षणात आळस नको. शोध मोहीम पूर्ण कराल. शुभ दि. २४, २५

तूळ :- शुक्र गुरु युती, बुध नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. धंद्यात जम बसेल. नवे काम मिळल्याने उत्साह वाढेल. रागावर ताबा ठेवा. तुमची महत्त्वाची कामे करा. नोकरीत चांगला बदल करा. बेकारांनी काम करावे. ग्रहांची साथ आहे. आळस करू नका. व्यसनातून बाहेर पडता येईल. चूक सुधारता येईल. विवाहासाठी स्थळे मिळतील. संततीप्राप्तीचा योग फुकट घालवू नका. राजकीय-सामजिक कार्यात वर्चस्व राहील. कोर्ट केस संपवा. परदेशात जाण्याची संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. शोध मोहीम फत्ते होईल. शुभ दि. २७, २८

वृश्चिक :- शुक्र गुरु युती, चंद्र मंगळ युती होत आहे. धंद्यात समस्या वाढू देऊ नका. चर्चा करताना ताळमेळ ठेवा. प्रवासात घाई करू नका. कायदा पाळा. राग वाढवणारी घटना राजकीय-सामाजिक कार्यात घडेल. प्रतिष्ठा राहील. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. चांगला बदल करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढतील. प्रतिष्ठा मिळेल. कोर्ट केस यशस्वी होईल. संसारात आप्तेष्ठांच्या समारंभास हजर रहावे लागेल. धावपळ होईल. शोध मोहीम फत्ते कराल. शिक्षणात पुढे जाल. आळस करू नका. शुभ दि. २९, ३०

धनु :- या सप्ताहात शुक्र गुरु युती, बुध नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात प्रश्न सोडवा. वेळकाढू धोरण ठेऊ नका. अधिकाराचा वापर करण्यापेक्षा सलोख्याने बोला चर्चा करा. नोकरीत कामाचा, वरिष्ठांचा दबाव राहील. ताण वाढू शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. कला-क्रीडा क्षेत्रात मैत्री वाढेल. मार्गदर्शन मिळेल. कोर्टाच्या कामात अरेरावी करू नका. शोध मोहीम पूर्ण करण्यात मनस्ताप होऊ शकतो. संसारात आप्तेष्ठ भेटतील. उत्साह वाढेल. शुभ दि. २९, ३०

मकर :- चंद्र मंगळ युती, बुध नेपच्यून त्रिकोणयोग या सप्ताहात होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात दुर्लक्ष करू नका. समस्या वाढू देऊ नका. काट्याचा नायटा होण्यास फारसा वेळ लागत नाही. मोठे काम मिळवता येईल. मैत्रीत तणाव होऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा राहील. महत्त्वाचा निर्णय घेता येईल. संसारात सप्ताहाच्या शेवटी गैरसमज होईल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. शोध मोहीम यशस्वी करताना कुणाला कमी समजू नका. दुखवू नका. शिक्षणात चांगली संगत ठेवा. शुभ दि. २४, २५

कुंभ :- या सप्ताहात शुक्र, गुरु युती, बुध नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात फायदा होईल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. लाभ वाढेल. मोठे काम मिळेल. वसुली करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा मुद्दा प्रभावी पडेल. तुमच्या कष्टाचे चीज होण्याची सर्वांना आशा निर्माण होईल. घर, वाहन, जमीन-खरेदी-व्रिकी करता येईल. संसारात आनंदी रहाल. नोकरीत बदल करता येईल. परदेशात जाल. शोध मोहीम गाजेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शिक्षणात पुढे जाल. तुमचे स्वप्न पूर्ण कराल. शुभ दि. २४, २५

मीन :- चंद्र गुरु लाभयोग, मंगळ हर्षल प्रतियुती होत आहे. धंद्यात चर्चा करताना तुमचा आवाज चढू शकतो. कठोर शब्द वापरू नका. प्रेमानेच माणसे जोडता येतात. वसुली करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिमा उजळेल. अधिकाराची अपेक्षा पूर्ण होईल. संसारात भेटी-गाठी होतील. प्रगती कराल. स्पर्धा जिंकाल. प्रवासात घाई करू नका. नोकरीत प्रभाव वाढेल. शोध मोहिमेत धाडस कराल. शिक्षणात चिंता न करता एकाग्र मनाने अभ्यास करा. शुभ दि. 2७, 2८