रविवार २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२०

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष : कुंभेत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसवता येईल. तुमचा उत्साह वाढेल. ओळखीतून मोठे काम मिळवता येईल. मागिल पैसे वसूल करा. नोकरीत मनाप्रमाणे बदल करता येईल. घरातील समस्या कमी होईल. कर्जाचे काम करून घ्या. घर, जमीन घेता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा वचक कायम ठेवा. प्रतिष्ठा वाढेल. प्रवासात घाई करू नका. औषध वेळेवर घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवे काम मिळेल. कोर्टाच्या बाबतीत यश मिळेल. शिक्षणात मागे राहण्याची गरज नाही. शुभ दि. २६, २७

वृषभ : या सप्ताहात कुंभेत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यातील अडचणी दूर करून पुढे जाता येईल. संसारात शुभ समाचार मिळेल. वाटाघाटीची चर्चा करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात ठरविलेले काम पूर्ण करा. योजना मार्गी लावा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी व पैसा मिळेल. ओळखी वाढतील. कोर्टाच्या कामात यश मिळवता येईल. शिक्षणात आळस करू नका. घरच्या लोकांना फसवून वागू नका. शोध मोहीम यशस्वी होईल. शुभ दि. २६, २८

मिथुन : या सप्ताहात कुंभ राशीत बुध प्रवेश चंद्र शुक्र युती होत आहे. रविवार रागाचा पारा वाढेल. संयम ठेवा. धंद्यात सहनशीलता ठेवल्यास यश मिळेल. वसुली करण्याचा विचार करा. दादागिरी करू नका. नोकरीत तडजोडीचे धोरण ठेवा. वाद वाढू देऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात हेकेखोरपणा उपयोगी येणार नाही. तुमच्यावर आरोप येईल. मुले प्रगती करतील. आनंद देतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धीचा विचार न करता मेहनत घ्या. ओळखी होतील. शिक्षणात चालढकलपणा करू नका. वेळेला महत्त्व द्या. शुभ दि. ३०, १

कर्क : या सप्ताहात कुंभ राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. नोकरीत चांगले काम करून वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला घरात तणाव होईल. प्रकृतीची काळजी घ्या. पोटाचा त्रास होऊ शकतो. धंद्यात लवकर नवे काम मिळवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव पडेल. लोकांची मर्जी राखा. कुणालाही कमी समजू नका. गुप्त कारवायांचा त्रास होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. मैत्रीत क्षुल्लक वाद होईल. शिक्षणात मेहनत घ्या. अपयश टाळा. शोध मोहिमेत यश मिळेल. शुभ दि. २६, ३०

सिंह : या सप्ताहात कुंभ राशीत बुध प्रवेश, शुक्र नेपच्यून युती होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर दगदग होईल. प्रकृतीची काळजी घ्या. धंद्यात समस्या येईल. घाईघाईत निर्णय पक्का करू नका. चांगल्या संधी वाट पहा. नोकरीत कामाचा ताण राहील. वरिष्ठांचा दबाव राहील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या कामात अडचणी येतील. टीका होईल. प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न होईल. कला-क्रीडा करण्याचा प्रयत्न होईल. कला-क्रीडा स्पर्धेत कष्ट घ्या. प्रसिद्धीचा विचार न करता. शिक्षणात नम्रपणे बोला. शोध मोहीम कठीण वाटेल. कोर्टाच्या कामात तणाव होईल. शुभ दि. २७, १

कन्या : या सप्ताहात कुंभ राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. विरोधकांचा डाव ओळखून राजकीय सामाजिक कार्यात वागावे लागेल. बोलण्यात सावध रहा. धंद्यात काम मिळवण्यासाठी प्रयत्न करा. मैत्रीत तणाव होऊ शकतो. घरातील माणसाची चिंता वाटेल. पोटाची काळजी घ्या. व्यसनाने नुकसान होईल. नोकरीत विरुद्धलिंगी व्यक्तीकडून मनस्ताप होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. शोध मोहीम यशस्वी होईल. शिक्षणात, अभ्यासात आळस करू नका. चांगली संगत ठेवा. शुभ दि. २६, २९

तूळ : या सप्ताहात कुंभ राशीत बुध प्रवेश, शुक्र नेपच्यून युती होत आहे. धंद्यात छोट्या समस्या येतील. युक्तीने त्याचे निवारण करू शकाल. मागिल येणे वसूल करा. खर्च वाढणार आहे. योग्य ठिकाणी पैसे गुंतवा. नोकरीत किरकोळ तणाव होईल. गैरसमज होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला कमी लेखण्याचा कट रचला जाईल. तुम्ही खंबीर रहा. मुलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात परिचय वाढेल. कोर्टाच्या कामात स्वतः लक्ष द्या. विद्यार्थी वर्गाला योग्य मार्गाने जाऊन यश मिळेल. शोध मोहिमेत अडथळे येतील. शुभ दि. २७, २८

वृश्चिक : या सप्ताहात कुंभ राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. महत्त्वाचा निर्णय धंद्यात घेता येईल. नवीन जागा शोधता येईल. कर्जाचे करा करून घ्या. नवे काम मिळेल. नोकरीत तुमच्या कामाचा प्रभाव पडेल. क्षुल्लक वाद जवळचे लोक करतील. राजकीय-सामाजिक कार्यात लोकांच्या विश्वासाकडे लक्ष द्यावे लागेल. रागावर ताबा ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. घरातील कामे वाढतील. ठरविलेले काम करण्यात इतरांची ढवळाढवळ असल्याने विलंब होऊ शकतो. विद्यार्थी वर्गाने अभ्यास लक्ष केंद्रीत करावे. मोेठे यश मिळवता येईल. परदेशात जाल. शुभ दि. २६, २९

धनु : या सप्ताहात कुंभ राशीत बुध प्रवेश, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात राहून गेलेले कार्य पुढे नेता येईल. मोठ्या लोकांची मदत घेता येईल. कर्ज मिळेल. नवीन काम मिळेल. नोकरीत फायदेशीर बदल करण्याची संधी शोधा. घर, जमीन संबंधी काम होईल. तंटा मिटवता येईल. वाटाघाटीत यश मिळेल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. संतती प्राप्तीचा प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक कार्यात वेगाने योजना तयार करा. मार्गी लागा. प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक सहाय्य मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकदार यश मिळेल. ओळखी वाढतील. परदेशात पर्यटनासाठी जाता येईल. शिक्षणात कठीण यश प्रयत्न व नशिबाच्या साथीने मिळेल. शुभ दि. २६, २८

मकर : या सप्ताहात कुंभ राशीत बुध प्रवेश, शुक्र नेपच्यून युती होत आहे. धंद्यात चांगली बातमी मिळेल. सप्ताहाच्या शेवटी योग्य निर्णय घेता येईल. प्रामाणिक व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीत टिकाव लागेल. वरिष्ठांना खूश करता येईल. मुले आनंद देतील. खूशखबर मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रयत्नाने पुढे जावे लागेल. लोकसंग्रह वाढवा. टीकेला उत्तर देण्यात वेळ न घालवता कार्यावर भर द्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती कराल. ओळखी वाढतील. गुप्त कारवायांचा अभ्यास करत रहा. कोर्टाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने स्वतःच्या प्रगतीचा मार्ग सोडू नये. व्यसन करू नये.

कुंभ : या सप्ताहात तुमच्याच राशीत बुध प्रवेश, शुक्र नेपच्यून युती होत आहे. रविवारी कोणतेही वाद वाढवू नका. बोलताना काळजी घ्या. गैरसमज होईल. धंद्यात नवा विचार आठवड्याच्या शेवटी करता येईल. वसुली करा. नोकरीत परिस्थितीचा नीट अंदाज घ्या. कामात गडबड होऊ देऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला दूर ठेवण्याचा प्रकारच घडू शकतो. मत व्यक्त करताना तारतम्य ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्यावी लागेल. नवीन ओळखी होतील. कोर्टाच्या कामात दुर्लक्ष होईल. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. शिक्षणात चंचलपणा करू नका. शुभ दि. ३१, १

मीन : या सप्ताहात कुंभ राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात सप्ताहाच्या सुरुवातीला काम मिळेल. क्षुल्लक वाद करू नका. भागीदाराच्या बरोबर मतभेद होतील. नोकरांची बाजू ऐकून घ्या. घरातील व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. वस्तू नीट सांभाळा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा विचार प्रभावी ठरेल. लोकांना मात्र दुखवू नका. त्यांची कामे करा. स्वतःच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. कला-क्रीडा-क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने आळस सोडून नीटपणे शिक्षण घ्यावे. शुभ दि. २६, १