रविवार 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी २०२०

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष : या सप्ताहात कुंभ राशीत सूर्य प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. नवे काम ओळखीतून मिळेल. प्रयत्नांचा जोर वाढवा. ग्रहांची साथ चांगली आहे. नोकरीतमनाप्रमाणे बदल करता येईल. संसारात शुभ समाचार मिळेल. मुले प्रगती करतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही वेगाने योजना तयार करून पूर्ण कराल. घर, जमिन घेता येईल. वाटाघाटीच्या प्रश्न सोडवा. कला-क्रीडा साहित्यात प्रगती होईल. कोर्टकेस यशदाई होईल. विद्यार्थी वर्गाने चांगला सोडू नये. मोठे यश मिळेल. शोध मोहिम फत्ते कराल. शुभ दि. ११, १४

वृषभ : या सप्ताहात कुंभ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध युति होत आहे. धंद्यातील समस्या सोडवा. छोट्या फायद्याचे काम सुद्धा नाकारू नका. वसूली करा. नोकरीत वादावर वाद वाढवू नका. नोकरी टिकवा. आप्तेष्ठ भेटतील. घरात आनंदी वातावरण राहिल. राजकीय-सामाजिक कार्यात मेहनत घ्यावी लागेल. लोकांची कामे वेळच्या वेळी करून घ्या. शेअर्समध्ये सल्ल्यानुसार पैसे गुंतवा फायदा होईल. सल्ल्यासाठी भेटू शकता. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. ओळखीचा उपयोग होईल. शिक्षणात आळस नको. लबाडीने घरातील लोकांच्या बरोबर वागू नका. तुमचेच नुकसान होईल. शुभ दि. ९,१०

मिथुन : या सप्ताहात कुंभ राशीत सूर्य प्रवेश चंद्र बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. प्रयत्नांना वेग वाढवा. मोठे कंत्राट मिळेल. वसूली करा. पैसे योग्य ठिकाणी गुंतवा. पुढच्या कालावधीसाठी उपयोग होईल. घरात शुभ समाचार मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्वाचा निर्णय घेता येईल. लोकप्रियता मिळेल. घर, वाहन घेता येईल. कटीण प्रश्न सोडवा. कला-क्रीडा क्षेत्रात पुरस्कार, पैसा मिळेल. केस संपवा. शिक्षणात मनाप्रमाणे प्रगती करता येईल. शोध मोहिम यशस्वी होईल. नोकरी मिळेल. नवीन ओळखी होतील. मैत्री वाढेल. शुभ दि. १२, १३

कर्क : या सप्ताहात कुंभ राशीत सूर्य प्रवेश सूर्य चंद्र षडाष्टक योग होत आहे. प्रत्येक दिवस तुमचे मन स्थिर ठेवेल. त्यामुळे कठीण प्रसंगावर मात करून समस्या सोडवता येईल. प्रकृतीकडे लक्ष ठेवा. नोकरीत वरिष्ठांचा दबाव त्रासदायक वाटेल. आप्तेष्ठ भेटतील. घरातील वृद्ध व्यक्ती संबंधी चिंता राहिल. धंद्यात गोड बोलून काम करून घ्यावे लागेल. राजकीय-सामजिक कार्यात तुम्हाला नमते धोरण ठेवावे लागेल. चर्चा करतांना वरिष्ठांना दुखवू नका. शोध मोहिम पूर्ण करू शकाल. शिक्षणात मेहनत घ्या. कला-क्रीडा स्पर्धा परिश्रमाची असेल. शुभ दि. १२, १३

सिंह : या सप्ताहात कुंभ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. रविवारी तुम्ही घेतलेला निर्णय चुकण्याची शक्यता आहे. धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न यश देईल. जुना वाद मिटवा. जमिनी संबंधी काम पूर्ण करा. घर, वाहन घेण्याचे ठरवाल. आप्तेष्ठांच्यासाठी धावपळ करावी लागेल. नोकरीत नवा विषय शिकावा लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. सावधपणे मत व्यक्त करा. प्रेमात क्षुल्लक तणाव होईल. कला-क्रीडा क्षेत्रात संधी शोधता येईल. शोध मोहिमेला दिशा मिळेल. कोर्टकेसमध्ये दुर्लक्ष नको. शिक्षणात प्रयत्नांना चांगले यश मिळेल.शुभ दि. १४, १५

कन्या : या सप्ताहात कुंभ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. घरातील वाद समस्या कमी करण्याचा प्रयत्न करा. संघर्ष आहे. वृद्ध व्यक्तीचा विरह संभवतो स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत काम करतांना चूक करू नका. योग्य निर्णय लवकर घेऊन टाका. धंद्यात गोड बोलून चर्चा करा. नोकरवर्ग कुरकुर करतील. राजकीय-सामाजिक कार्यात कोणताही प्रश्न सोडवतांना आक्रमक होेऊ नका. कायदा पाळा. सामजंस्याने प्रश्न सोडवा. कला-क्रीडा स्पर्धेत पुढे जाल. विद्यार्थी वर्गाने घ्येय सोडू नये. पुढील जीवनाचा विचार विसरू नये. शुभ दि. ९, 12

तूळ : या सप्ताहात कुंभ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात गोड बोलून गिर्‍हाईक मिळवा. तुमचा मुद्दा संयमी शब्दात पटवून द्या. सप्ताहाच्या शेवटी समस्या कमी होईल. नोकरीचा प्रयत्न करा. आपसांत क्षुल्लक गैरसमज होईल. खर्च होईल. ओळखी वाढतील. राजकीय-सामाजिक कार्यात कामांची आखणी करा. पुढील सप्ताहात चांगली संधी मिळेल. प्रतिष्ठा वाढण्यास सुरुवात होईल. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाता येईल. कोर्टाच्या कामात दिरंगाई होऊ शकते. शोध मोहिमेत कष्ट वाढतील. विद्यार्थी वर्गाने सातत्याने अभ्यास करावा. शुभ दि. १४, १५

वृश्चिक : या सप्ताहात कुंभ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे करून घ्या. धंद्यात काम मिळवा. मागिल येणे वसूल करा. नोकरीत काम वाढेल. प्रभाव राहिल. घरगुती कामे वाढण्याची शक्यता आहे. मौल्यवान खरेदी करतांना खर्च वाढू शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला चौफेर लक्ष द्यावयाचे आहे. गुप्त कारवाया चालू असतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती कराल. योग्य मार्गदर्शन मिळेल. कोर्टकेस जिंकाल. शोध मोहिम होईल. विद्यार्थीवर्गाने स्वतःच्या ध्येयाचा विचार करून अभ्यास करावा. शुभ दि. 9, 10

धनु : या सप्ताहात कुंभ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. साडेसाती सुरू आहे. तरीही प्रयत्नांना यश मिळेल. आळस करू नका. चांगली संधी पटकन निघून जाते. धंद्यात सुधारणा करा. पुढे जा. ओळखीतून काम मिळवता येईल. नोकरी मिळेल. कामाचा प्रभाव पडेल. विद्यार्थी वर्गाला जूनी चूक सुधारता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात वर्चस्व वाढवता येईल. योजना तयार करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. पुरस्कार मिळेल. कोर्टकेसमध्ये यश येइल. जीवनाला चांगली कलाटणी मिळेल. शोध मोहिम गाडेल. घर घेता येईल. सल्यासाठी भेटा. शुभ दि. १२, १४

मकर : या सप्ताहात कुंभ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. साडेसाती सुरू आहे. वेळच्या वेळी पैसे, उधारी वसूल करा. गुंतवणूक करतांना सावधपणे गुंतवा. नोकरीत प्रगती होईल. नवीन ओळखी होतील. घरातील समस्या कमी होईल. मुले प्रगती करतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्व वाढेल असे कार्य करा. प्रेमाने संघटन करा. चंचलपणा नको. रागावर ताबा ठेवा. प्रत्येक वेळी कुणच्याही बोलण्याने विचलित होऊ नका. योग्य गुरुतुल्य व्यक्ती मिळमे कठीण आहे. स्पर्धा जिंकाल. शिक्षणात चालढकलपणा करू नका. शुभ दि. 9,12

कुंभ : या सप्ताहात तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. समस्या कमी होण्यास सप्ताहाच्या शेवटी सुरुवात होईल. साडेसाती सुरू आहे. धंद्यात फायदा वाढेल. अख्खे कंत्राट मिळवता येईल. भागिदाराबरोबर गोड बोला. पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. नोकरीत काम वाढेल. नम्रपणे वागा. घरातील कामे होतील. मुले मदत करतील. त्यांची प्रगती होईल. अविवाहितांना विवाहासाठी प्रयत्न करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात गोड बोलून रहा. फायदा पाळा. आरोप त्रासदायक वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धीसाठी वाट पहा. निराश होऊ नका. शोध मोहिम मार्गाला लावता येईल. विद्यार्थी वर्गाने भ्रमात न राहता कष्ट घ्यावे यश मिळेल. शुभ दि. १४, १५

मीन : या सप्ताहात कुंभ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. मीन व्यक्ती प्रेमळ असतात. चंचल असतात त्यामुळे स्थिर मनाने धंद्यात मेहनत घ्या. वाद वाढवू नका. संघर्ष असेल. वसूली करता येईल. ओळखीतून तुम्ही कामे करून घ्या. अरेरावी करू नका. कुणालाही गृहित धरू नका. नोकरीत तणाव होईल. काम वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात जिद्दीने कष्ट घ्या. ठरविलेले काम पूर्ण करा. गुप्त कारवाया होतील. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाता येईल. कोर्टकेस मध्ये अडथळे येतील. शोध मोहिम यशस्वी करता येईल. घरातीव वृद्ध व्यक्तीला सांभाळून घ्यावे लागेल. विद्यार्थी वर्गाने हुशारीचा उपयोग करावा. आळस करून नका. शुभ दि. 9, 12