IPL 2020: टी-२० खेळतोयस की कसोटी…केदारच्या फलंदाजीवर नेटकरी नाराज; मिम्स शेअर करत केलं ट्रोल

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नी सुपर किंग्जला १० धावांनी पराभूत व्हावं लागलं. चेन्नईने हाततला सामना गमावला. या पराभवाचं खापर सर्वजण केदार जाधववर फोडत आहेत. जाधवच्या संथ खेळीमुळे चेन्नीला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात केदारने १२ चेंडूत ७ धावा केल्या. केदार जाधवला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. याशिवाय, त्याला संघातून वगळण्याची मागणी केली जात आहे.