मुंबईची बत्ती गुल होणार, जोफ्रा आर्चरने आधीच केलं होतं भाकीत

jofra archers three old tweets are going viral after mumbais power outage

मुंबईत सकाळी वीज खंडीत झाल्याने मंबईकर हैराण झाले होते. मात्र, मुंबईच्या बत्ती गुलवरुन इंग्लंडचा जलदगतीचा गोलंदाज जोफ्रा आर्चर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जोफ्रा आर्चरचं ७ वर्षांपूर्वीचं मुंबईच्या वीजेसंदर्भातील ट्विट आता व्हायरल होत आहे. आर्चरचे एकूण तीन ट्विट व्हायरल होत आहेत.

जोफ्रा आर्चर सध्या यूएईमध्ये राजस्थानमधून खेळत आहे. मुंबईत अचानक वीज गेल्याने जोफ्रा आर्चर चर्चेत आला आहे. हे काही पहिल्यांदा घडत आहे. याआधी देखील जोफ्रा आर्चरचे ट्विट व्हायरल झाले होते. सध्या तो मुंबईची वीज खंडित होण्यावरुन चर्चेत आहे. जोफ्रा आर्चरने २२ मार्च २०१३ साली ‘लाईट आऊट’ असं ट्विट केलं होतं. याशिवाय, २५ मार्च २०१४ रोजी एक मुंबई यासाठी पात्र आहे असं ट्विट केलं होतं. तर तीसरं ट्विट मुंबई गेली, असं केलं होतं. हे ट्विट त्याने १६ सप्टेंबर २०१४ साली केली होती.