ऑफिस बॅग्सची निवड करताना…

ऑफिसमध्ये एका ठिकाणी बसून पाठ दुखी, खांदा दुखी, मान दुखीचे आजार जडतात. एका जागी काम करण्याबरोबरच या दुखण्यांना कारणीभूत ठरते ती ऑफिसची जड बॅग. या दुखण्यांपासून दूर राहण्यासाठी कामकाजानुसार बॅगेची निवड करावी.

Mumbai
Choosing Office Bags ...

टोट बॅग्स

ऑफीसचे खूप सामान असेल तर अनेकजण टोट बॅग्सना पसंती दर्शवतात. पण तरीदेखील बॅगेतील सामानामुळे बॅग जड होऊन त्यामुळे खांदा एका बाजूला झुकतो. परिणामी खांदा किंवा मानदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे टोट बॅग घेणे शक्यतो टाळावे.

टॉप हँडल बॅग्स

सध्या बॅग्सच्या फॅशनमध्ये महिला टॉप हॅन्डल बॅग्सना पसंती देत आहेत. या बॅग एका हातात अडकवता येतात. पण यामुळे बॅग एका हातात अडकवून चालण्यामुळे हाताचे दुखणे सुरु होवू शकते. त्यामुळे जास्त वजन असल्यास या बॅग्स एका हातात कॅरी न करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

क्रॉस बॅग्स

या बॅग्स आरामदायी असतात. या बॅग्समुळे शारीरिक दुखणे कमी प्रमाणात होते. त्यामुळे क्रॉस बॅग कॅरी करताना त्यातील सामान ठेवण्यात येणारा भाग हा कंबरेच्या उंचीएवढा वर घ्यावा. यामुळे वजनाचं संतुलन योग्य प्रमाणात होतं.

बॅकपॅक

वजनाच्या ५ % पेक्षा अधिक वजनाची बॅग ऑफिसमध्ये नेत असाल तर बॅकपॅक प्रकारच्या बॅगचा पर्याय निवडावा. जास्त वजनासाठी बॅकपॅचा पर्याय उत्तम ठरतो. महत्वाचे म्हणजे वेस्टबँड असलेल्या बॅकपॅक ची निवड करावी. यामुळे वजनाचं संतुलन राखण्यास मदत होते.