घरलाईफस्टाईलफर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन -ड्रेसिंग टिप्स

फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन -ड्रेसिंग टिप्स

Subscribe

आपण कितीही म्हणालो की I dress for myself तरी आपण जेव्हा नीट तयार होऊन जातो तेव्हा कोणीतरी आपल्याला बघावं असं आपल्याला वाटत असत आणि त्यात मुलं तर जे कपडे घालतात ते तर मुलींनी आपल्याकडे बघावं त्यामुळे प्रत्येक मुलगा स्वतःच्या ड्रेसिंगकडे निट लक्ष देतच असतो.

आपण प्रत्येकजण समोरच्याला इम्प्रेस करायला ड्रेसिंग करत असतो. आपण कितीही म्हणालो की I dress for myself तरी आपण जेव्हा नीट तयार होऊन जातो तेव्हा कोणीतरी आपल्याला बघावं असं आपल्याला वाटत असत आणि त्यात मुलं तर जे कपडे घालतात ते तर मुलींनी आपल्याकडे बघावं त्यामुळे प्रत्येक मुलगा स्वतःच्या ड्रेसिंगकडे निट लक्ष देतच असतो. कारण आपण कितीही हँडसम असलो तरी आपण जे कपडे घालतो त्यावरूनच आपण मुलींना इम्प्रेस करू शकतो. कारण शेवटी फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन.

चला तर बघूया अशा काही ड्रेसिंग टिप्स ज्यामुळे मुली नक्कीच तुमच्यावर इम्प्रेस होतील.

- Advertisement -

वेल फिटेड सूट

well-fitted-suits

सूट्स घालणं हे नेहमीच हाय स्टॅण्डर्डच मानलं जात.बिजनेसच्या मिटींग्स असतील तेव्हा सूट घातला जातो.पहिल्या डेट वर सूट घालून जाण्याची फॅशन अजून तरी आपल्याकडे आली नाहीए.पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की परफेक्ट फिटिंग असलेला सूट घालणं हे मुलींना इम्प्रेस करण्याचं पहिलं पाऊल असत.नीट मेंटेन केलेली बॉडी असेल, ब्रॉड शोल्डर असेल तर सूट घातल्यावर मुली नक्कीच तुमच्यावर फिदा होतील ह्यात शंकाच नाही

- Advertisement -

घड्याळ

wrist-watch

प्रत्येक पुरुषाला एका चांगल्या घडाळ्याची गरज असतेच. प्रत्येकाची वेळ सांगणं एवढंच काम घड्याळ करत असाल तरी हल्ली स्मार्टवॉच मुळे लेदर बेल्ट किंवा स्टील बेल्टची घड्याळ, मोठं डायल असलेलं घड्याळ हे ओल्ड फॅशन वाटतं असलेलं तरी एका वेल फिट सूटवर एखाद सुंदर घड्याळ असेल तर अजूनच भारी दिसत. मनगटात एखाद चांगलं घड्याळ असं याचा अर्थ तुम्ही ड्रेसिंगमधले डिटेल्स तुम्ही नीट बघितले आहेत.

परफ्युम्स

हा पुरुष असो किंवा स्त्री प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि तेवढाच जवळचा विषय आहे.आपण जाहिरातीमध्ये बघतो त्या प्रमाणे परफ्युममुळे मुली अगदीच तुमच्या जवळ नाही आल्या तरी तुमच्या पर्सनॅलिटीला अजून एक पॉईंट अ‍ॅड करतात हे नक्की. कारण मुलींना स्ट्राँग परफ्युमपेक्षा लाईट वासाचे परफ्युम आवडतात. त्यामुळे परफ्युम शॉपिंग करताना काळजीपूर्वक परफ्युम निवड कारण लाईट परफ्युम नेहमीच मुलींना आकर्षित करतात. परफ्युम मारताना मान,खांदा,मनगट,छाती ह्या ठिकाणी मारावा. शर्टवर कधीच मारू नये कारण शर्टवर डाग पडायची शक्य असते. शॉवर घेतल्यानंतर परफ्युम मारावा.

पिंक कलर

हा रंग फक्त मुलींसाठीच आहे. असा आपल्याकडे खूप मोठा गैरसमज करण्यात आलेला आहे. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की पिंक रंग हा मुलांवर खूप चांगला दिसतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की पिंक कलर घालायला खूप कॉन्फिडन्स असावा लागतो. मग तो पोलो टीशर्ट असेल किंवा फॉर्मल्स असतील. नीट फिटिंग असलेले घातले तर मुली नक्कीच इम्प्रेस होतील. एका फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार पिंक कलर घालणारी माणसं जास्त पॉसिटीव्ह असतात आणि ती माणसं अजून जास्त ब्राईट दिसतात.

वेल फिटेड जीन्स

wel-fitted-jeans

जीन्स हा सर्वात जुना पॅन्टचा प्रकार आहे आणि तुमच्याकडे ३ चांगल्या जीन्स असं हे नेहमीच चांगलं असत. Any guy regardless of age or body type needs a good pair of jeans in his closet” अशी एक म्हण आहे. वेल फिटेड जीन्स आणि त्यावर कॅज्युअल शर्ट किंवा पोलो शर्ट असेल तर मुली नक्कीच इम्प्रेस होतात. हॉलिवूडचे हिरो जीन्समध्ये नेहमीच हँडसम दिसतात. एखादी डेनिम ब्लू जीन्स,एखादी ब्लॅक जीन्स तुमच्याकडे ठेवाच. कारण या दोन जीन्सवर कोणत्याही रंगाचे शर्ट किंवा टी शर्ट चांगले दिसतात.

स्टायलिश बूट

चांगल्या प्रकारचे बूट असणं हे खूप महत्वाचं असत. फॉर्मल शूज,स्नीकर्स,कॅज्युअल शुज,लोफर्स, एवढ्या प्रकारचे बूट्स तुम्ही वापरू शकता.एखाद्या फॉर्मल्स वर चांगले ब्राऊन कलरचे किंवा काळ्या कलरचे फॉर्मल शूज खूप भारी वाटतात. हे फॉर्मल शूज नेहमीच पॉलीश केलेले असावेत. हल्ली फॉर्मल्स वर लोफर्स घालायची फॅशन आली आहे. जीन्स वर स्पोर्ट्स शूज, कॅज्युअल शूज चांगले दिसतात.

प्लेन व्हाईट शर्ट

white-color-shirt

जीन्सवर पंधरा कॅज्युअल शर्ट घातलात तर अजून भारी दिसेल.एखाद्या विकेंड पार्टीला गेट टुगेदरला घालून गेलात तर मुलींना इम्प्रेस नक्की करू शकाल. पांढरा फॉर्मल शर्ट किंवा प्लेन व्हाईट शर्ट हे नक्कीच उठून दिसतात.

केसरचना आणि दाढी

bear-and-hair-style

चांगल्या प्रकारचे कपडे घालून सुद्धा तुमची हेअरस्टाईल जर नीट नसेल तर तुम्हाला एक कमी पॉईंट मिळू शकतो.कारण चांगल्या प्रकारे कापलेले केस हे नेहमीच इम्प्रेशन मारण्यात महत्वाचे असतात.चांगल्या ट्रीम केलेल्या केसांमुळे चेहरा अजून चांगला आणि फ्रेश दिसतो.त्याचप्रमाणे चांगली ट्रीम केलेली दाढी ह्यामुळे सुद्धा चेहरा फ्रेश दिसतो.तुमची दाढी भरमसाठ वाढली असली तरी नीट मेन्टेन केलेली असावी.

रंगसंगती

तुम्ही काय कॉम्बिनेशन घालताय यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. भडक रंग वगैरे अजिबात घालू नका त्यामुळे लोकांच्या डोळ्याला त्रास होईलच, त्याच बरोबर तुम्हाला स्वतःला सुद्धा आपण काय घातलाय याबद्दल प्रश्न पडू शकतो.तुमचं कॉम्बिनेशन हे नेहमीच विरुद्ध असावं. म्हणजे ग्रे पॅन्ट असेल तर त्यावर पांढरा फॉर्मल शर्ट घाला त्यामुळे तुमचा लूक अजूनच चांगला दिसतो.

चेकचे कॅज्युअल शर्ट

पार्टीला जाताना एखादा चांगला चेक्सचा शर्ट आणि त्याच्या आतमध्ये प्लेन शर्ट आणि त्यावर ब्ल्यू जीन्स आणि त्यावर चांगले बूट्स घातलेत फार बात बन गयी.कारण आपण जे घालतो त्यातून तुमची पर्सनॅलिटी दिसत असते. every man must have good pair of check shirts.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -