घरलाईफस्टाईललठ्ठपणा दूर करण्याचे १२ सोपे घरगुती उपाय

लठ्ठपणा दूर करण्याचे १२ सोपे घरगुती उपाय

Subscribe

लठ्ठपणा ही आजच्या जीवनपद्धतीमधील एक मोठी समस्या बनली आहे. प्रत्येक व्यक्ती हा लठ्ठपणाच्या समस्येला समोरे जात असतात. त्यामुळे लठ्ठपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय देण्यात आले आहेत.

लठ्ठपणा ही आजच्या जीवनपद्धतीमधील एक मोठी समस्या बनली आहे. प्रत्येक व्यक्ती हा लठ्ठपणाच्या समस्येला समोरे जात असतात. जास्तीत जास्त लोक ही सुरूवातीला वजन वाढीकडे लक्ष देत नाहीत. मात्र, जेव्हा इतर लोक ‘किती जाडा झाला आहेत?’ हा प्रश्न खोचकपणे विचारतात तेव्हा वजन कमी करण्यासाठी घाम गाळत बसतात. वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे खूप महत्वाचे ठरते. त्यामुळे नैसर्गिक पदार्थ खाणे कधी ही चांगले. कमी कष्ट घेऊन जर वजन कमी करायचे असल्यास काही सोप्या पद्धतीचे घरगुती उपाय आहेत.

लठ्ठपणा कमी करण्यासाठीचे उपाय

१. पत्ता कोबी सगळ्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते. दररोज एक तरी पत्ता कोबीचे ज्युस सेवन करावे. कारण पत्ता कोबीमध्ये शरीरातीस वाढती चरबी कमी करण्याचे गुण असतात. त्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म योग्य राहते.

- Advertisement -

२. गव्हाच्या पिठाची पोळी बनवली जाते. मात्र, फक्त गव्हाची पोळी खाण्यापेक्षा गव्हामध्ये सोयाबीन आणि हरभरे एकत्र असलेले मिश्रित पिठाची पोळी खाणे फायदेशीर ठरते.

३. साखर, बटाटा आणि तांदूळ यामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायेड्रेट जास्त प्रमाणात असते त्यामुळे हे पदार्थ कमीप्रमाणात खाणे कधीही योग्य आहे. हे पदार्थ न खाल्याने वजन कमी होऊ शकतो.

- Advertisement -

४. पवईचे सेवन हे नियमीत खाले पाहीजे. पपईच्या सेवनामुळे कंबरेची अतिरिक्त चरबी कमी होते.

५. दररोज दह्याचे सेवन केल्यानी अतिरिक्त चरबी कमी होते. तसेच प्रत्येक दिवशी सकाळी रिक्याम्या पोठी एक ग्लास भर घरात तयार केलेले ताक प्यावे. त्यामध्ये थोडेसे काळे मीठ आणि हिंग-जीरा पावडर टाकून ते पियावे. त्यामुळे वजन कमी होते.

६. पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरते. यामुळे कॅलरीज कमी होतील. तसेच गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून पियाल्याने वजन कमी करण्यास जास्त फायदेशीर ठरते.

७. रात्री उशीरा जेवणे हे पोटातील चरबी वाढवण्याचे प्रमुख कारण आहे. झोपण्याच्या २ तास अगोदर जेवण केले पाहीजे. तसेच लाईट आहार करणे गरजेचे आहे. त्यानंतर शतपावली करणे फायदेशीर ठरू शकते.

८. गाजऱ्याचे भरपून सेवन केल्यामुळे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे आधुनिक विज्ञानांनी मान्य केले आहे.

९. आवळा आणि हळद हे पदार्थ बारीक चूर्ण तयार करा आणि ताकामध्ये टाकून ते सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते.

१०. शरीरातील लठ्ठपणा वेगाने घटवण्यासाठी ओमेगा ३ फॅट्सचा आहारात समावेश करा. अक्रोड, बदाम आणि फ्लाक्स सीड्सचा अंतर्भाव तुमच्या जेवणात करा.

११. ओट्स, बाजरी, ज्वारी, नाचणी, गहू, सॅलड, भाज्या आणि फळे यांसारखे फायबर असलेले कॉम्प्लेक्स काबरेहायड्रेट्स खाणे वजन घटवण्याची गुरुकिल्ली आहे.

१२. सॅलड किंवा सूप, यांच्यासोबत मासे, चिकन, मलईरहित पनीर यांसारख्या प्रोटिनसमृद्ध पदार्थाचा समावेश करा. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -