घरलाईफस्टाईलनैसर्गिकरित्या मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी करा 'हे' उपाय

नैसर्गिकरित्या मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Subscribe

बऱ्याचदा स्त्रियांना सणवार, एखादा कार्यक्रम किंवा पिकनिकला जायचे असल्यास मासिक पाळीचे फार टेन्शन असते. त्यामुळे त्यांचे अनेक कार्यक्रमाला जाणे देखील रद्द होते. तर अनेक महिला गोळ्या घेऊन आपली मासिक पाळी पुढे ढकलतात. परंतु, ते फार हानिकारक असते. मात्र, असे काही उपाय आहेत. ज्यामुळे तुम्ही नैसर्गिकरित्या मासिक पाळी पुढे ढकलू शकता.

चणा आणि मसूर डाळीचे सूप

- Advertisement -

एक कप चणा आणि मसूरची डाळ वाटून घ्यावी. हे मिश्रण एक चमचा घेऊन ग्लासभर कोमट पाण्यात मिसळा. या मिश्रणाचे सूप तयार करून मासिक पाळीच्या एक आठवडा अगोदर प्या.

मोहरी

- Advertisement -

कोमट दुधात २ चमचे मोहरी पावडर घालावी. हे पेय चांगले हलवून मासिक पाळीच्या ५ ते ६ दिवस अगोदर प्यावे. याने मासिक पाळी पुढे जाईल.

लिंबू सरबत

२ चमचे लिंबू सरबत कोमट पाण्यात मिसळावे. यामुळे मासिक पाळी पुढे सरकेल.

फरसबी

कपभर फरसबी १०० मिली पाण्यात ३ ते ४ वेळा उकळून घ्यावे. त्यानंतर यामध्ये लिंबाचा रस घालावा. मासिक पाळीच्या ५ दिवस अगोदर हे मिश्रण प्यावे. मासिक पाळी पुढे जाण्यास मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -