घरलाईफस्टाईल'किचन' मधील ७ सोप्या टीप्स !

‘किचन’ मधील ७ सोप्या टीप्स !

Subscribe
स्वयंपाकघर म्हटलं की कामाचा पसारा हा आलाच. स्वयंपाक करणं, त्यानंतरची आवराआवरी, दूध तापवणं, विरझण लावणं, उरलेलं जेवण भांड्यामध्ये काढणं… अशी असंख्य कामं स्वयंपाकघरात राबणाऱ्या व्यक्तीला करायची असतात. बहुतांशी घरातील महिलांसाठी ही कामं नित्याचीच असतात. स्वयंपाकघरातील अशीच काही कामं सोप्या पद्धतीने करता यावीत यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत. या छोट्या छोट्या टीप्सची तुम्हाला नक्कीच मदत होईल.
१.  बटाटे उकडत असताना त्यामध्ये चिमूटभर हळद घाला. यामुळे बटाटे कमी कालावधीत उकडले जातात.
२. पुऱ्या करत असाल तर कणकेत चिमूटभर साखर घाला. त्यामुळे तळतेवेळी पुऱ्या छान फुगतात आणि बऱ्याचवेळ तशाच राहतात.

३. ज्या भांड्यात विरझण लावणार अाहात त्या भांड्याच्या आतल्या बाजूने तुरटी फिरवा. त्यामुळे दही घट्ट लागते.

- Advertisement -
४. पालकाचा हिरवा रंग टिकवून ठेवण्यासाठी पालक शिजवण्याआधीच मिक्सरमधून वाटून घ्यावा आणि त्यानंतर फोडणीला टाकावा.

५. पावसाळ्याच्या दिवसांत मिठाला हमखास पाणी सुटते. मिठाच्या बरणीवर टिपकागद ठेवून मग झाकण लावण्यास मीठ सुस्थितीत राहील.

- Advertisement -
६. पावसाळी वातावरणात कांदे लवकर खराब होतात. कांदे चांगले राहावेत यासाठी कापडी किंवा कागदी पिशवीत ठेवा.

७. कोबीचा स्वच्छ पांढरा रंग तसाच राहावा यासाठी त्यामध्ये थोडसं व्हिनेगर घाला. मात्र व्हिनेगर थोडं जरी जास्त झालं तरी चव खराब होऊ शकते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -