घरलाईफस्टाईलएण्डोमेट्रिअल कॅन्सरमध्ये ९० टक्के स्त्रिया अनुभवतात अनियमित रक्तस्राव

एण्डोमेट्रिअल कॅन्सरमध्ये ९० टक्के स्त्रिया अनुभवतात अनियमित रक्तस्राव

Subscribe

शरीरातील सुक्ष्म बदलांकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. हे बदल कोणत्यातरी लपलेल्या आजाराची लक्षणे असू शकतात. एण्डोमेट्रिअल कॅन्सरचे निदान झालेल्यांपैकी ९० टक्के स्त्रियांनी या आजाराच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अनियमित रक्तस्राव/मासिक पाळीचा अनुभव घेतलेला असतो, असे अभ्यासातून पुढे आले आहे.

स्त्रिया त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात असे साधारणपणे म्हटले जाते. व्यावसायिक आयुष्याच्या सतत वाढणाऱ्या मागण्या आणि त्यासोबत कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळेच स्त्रिया त्यांच्या स्वत:च्या आरोग्याच्या तक्रारींना क्षुल्लक समजतात. बदलती जीवनशैली आणि पर्यावरणातील अन्य घटकांमुळे हार्मो्न्समधील असमतोल काही नवीन राहिलेला नाही. विशेषत: स्त्रियांमध्ये मासिकपाळीच्या संपूर्ण काळात हार्मोन्सचे बदल घडत असतात. त्यामुळे शरीरातील सुक्ष्म बदलांकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. हे बदल कोणत्यातरी लपलेल्या आजाराची लक्षणे असू शकतात. हे एण्डोमेट्रिअल (गर्भाशयाच्या अंत:स्तरासंदर्भातील) व सर्व्हायकल (गर्भाशयाच्या) कॅन्सरबाबतही विशेषत्वाने सत्य आहे, कारण, या दोन्ही प्रकारांच्या कॅन्सरची लक्षणे ही डिसमेनोऱ्हिआच्या (वेदनादायी मासिक पाळी) लक्षणांसारखीच असतात. अनियमित रक्तस्राव, पाळीच्या वेळी वेदना होणे हे स्त्रियांमध्ये सामान्य समजले जाते, त्यामुळे ही एखाद्या गंभीर आजाराची लक्षणे आहेत असा विचार सहसा कोणी करत नाही. एण्डोमेट्रिअल कॅन्सरचे निदान झालेल्यांपैकी ९० टक्के स्त्रियांनी या आजाराच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अनियमित रक्तस्राव/मासिक पाळीचा अनुभव घेतलेला असतो, असे अभ्यासातून पुढे आले आहे. प्रत्येक मासिक पाळीतील रक्तस्रावाची पद्धत (पॅटर्न) समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे (यामध्ये स्पॉटिंगचाही विचार झाला पाहिजे). दैनंदिन ताण, आहारविषयक सवयी, शारीरिक हालचाल अती होणे किंवा न होणे यांमुळे किरकोळ बदल घडू शकतात असे मत प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ मदरहूड हॉस्पिटल खारघरच्या डॉ. अनु विनोद विज यांनी व्यक्त केले.

गर्भाशयाच्या अस्तरापासून सुरू 

स्त्रियांना एण्डोमेट्रिअल कॅन्सरच्या लक्षणांविषयी माहिती देणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. कॅन्सरचा हा प्रकार गर्भाशयाच्या अस्तरापासून सुरू होतो. हा कॅन्सर सहसा रजोनिवृत्तीनंतर किंवा त्यादरम्यान होत असला, तरी तरुण स्त्रियांमध्येही त्याचे निदान होऊ शकते. मासिक पाळीशी संबंध नसलेला योनीमार्गातून होणारा रक्तस्राव हा धोक्याचा इशारा आहे. एण्डोमेट्रिअल कॅन्सरच्या ४० टक्के रुग्णांमध्ये स्थूलत्व, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असतो हे अभ्यासांत दिसून आले आहे.

- Advertisement -

निदान लवकर झाल्यास उपचार यशस्वी

यातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे लवकर निदान होणे. या कॅन्सरचे निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर झाले, तर यातून बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के आहे. हिस्टरेक्टॉमी (म्हणजेच गर्भाशय काढून टाकम्याची शस्त्रक्रिया) आणि त्याबरोबरच अंडनलिका (फेलोपिअन ट्युब्ज) व अंडाशय (ओव्हरीज) (सॅल्पिंगो-ऊफोरेक्टॉमी) काढून टाकणे हा एण्डोमेट्रिअल कॅन्सरवरील उपचारांचा प्रमुख भाग आहे. कॅन्सर पुढील टप्प्यात पोहोचून अन्य ऊती/अवयवांमध्ये पसरला असेल, तर किमोथेरपी, रेडिएशन यांसारखे उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो. विचित्र रक्तस्राव किंवा वेदनादायी मासिक पाळी हे प्रत्येकवेळी कॅन्सरचेच लक्षण असेल असे नाही, हे लक्षात घ्या. मात्र, ही लक्षणे दीर्घकाळ जाणवत राहिल्यास (२ आठवड्यांहून अधिक काळ) त्याकडे दुर्लक्ष करू नका, लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्या असे डॉ. अनु विनोद विज यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -