WorldFoodDay : अभिनेता चिराग पाटीलने दिला ‘Eat Healthy, Stay Healthy’ चा सल्ला

आज, १६ ऑक्टोबर रोजी जागितक आहार दिवस असून या निमित्ताने अभिनेता चिराग पाटील यांनी एक हेल्थी रेसिपीसोबत फोटो शेअर केला आहे. सोबतच त्याने ईट हेल्थी, स्टे हेल्थीचा सल्लाही आपल्या चाहत्यांना दिला आहे. सध्या जागतिक महामारीने लोकांना ग्रासले असताना उत्तम आहार हाच आपल्या निरोगी आयुष्याचा मूलभूत पाया बनला आहे. अशा काळात चांगले आणि सकस आहार आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने चांगला आहार घेणे गरजेचे असल्याचे चिराग पाटील यांनी सुचवले आहे. या फोटोमध्येही चिराग हातात दोन पदार्थांची प्लेट घेऊन असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातील एक पौष्टिक लाडू असून दुसरा पदार्थ ब्राऊन ब्रेडवरील सॅलेड असल्याचे पाहायला मिळत आहे. या निमित्ताने त्याने सर्वांना जागितक आहार दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता चिराग पाटील