घरलाईफस्टाईलजेवणात करा दह्याचा समावेश

जेवणात करा दह्याचा समावेश

Subscribe

कडक उन्हाळ्यात अंगातून घामाच्या धारा वाहून शरीरातील पाण्याचे प्रमाण घटते. त्यामुळे या दिवसात हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे. योग्य निरोगी आहार घेतल्यास तुम्ही कडक उन्हाळ्याचा सामना सहज करू शकता. भारतीय जेवण संस्कृतीत विशेषतः महाराष्ट्रात दह्याचा नियमित समावेश करण्यात येतो. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसात आहारात दह्याचा समावेश जरुर करावा. दह्याचा पांढरा रंग, त्याची शीतलता आपल्या आरोग्याला बहुपयोगी ठरते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते – दह्यात प्रोबायोटिक्स तसेच चांगल्या प्रतीचे सूक्ष्मजंतू असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. दह्याच्या नियमित सेवनाने विविध आजारांचा संसर्ग तसेच सूक्ष्मजंतूंपासून आपले संरक्षण होते.

- Advertisement -

मजबूत हाडांसाठी दही आवश्यक – दह्यातील कॅल्शिअम आपली हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. कॅल्शिअम प्रमाणेच दह्यात फॉस्फरसही आढळते. दह्यातील फॉस्फरसमुळे हाडांची योग्य वाढ होते. तसेच संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिसवर मात करण्यास दही उपयुक्त ठरते.

वजन कमी करते – पोटाची चरबी कमी करण्यात दही फायदेशीर ठरते. परिणामी वाढत्या वजनावर नियंत्रण येऊन वजन कमी करण्यास जेवणात दह्याचा समावेश करावा.

- Advertisement -

आरोग्यदायी त्वचेसाठी – उन्हाळ्याच्या दिवसात सतत येणार्‍या घामामुळे घामोळे येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे अनेक त्वचाविकारांना सामोरे जावे लागते. दह्यातील व्हिटॅमिन इ, फॉस्फरस आणि झिंक सारख्या खनिजांमुळे त्वचेला ग्लो मिळून त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

हायड्रेटेड राहण्यास दही उपयोगी – उन्हाळ्याच्या दिवसात दररोज ८ ते ९ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर्सकडून देण्यात येतो. कडक उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण घटते. अनेकांना सतत पाणी पिणे कंटाळवाणे वाटते. तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसात आहारात दह्याचा समावेश अवश्य करावा. या दिवसात दह्यापासून बनविलेले ताक, लस्सी आदींचा पर्याय आरोग्यदायी ठरतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -