घरलाईफस्टाईलस्तनपान संदर्भात 'या' महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

स्तनपान संदर्भात ‘या’ महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

Subscribe

बाळ जन्मल्यानंतर स्तनपानाचे मुख्य महत्व असते. स्तनपान न झाल्यास बाळाला पोशक आहार मिळत नाही. यामुळे बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. स्तनपानाबाबत अजूनही काही गोष्टींचे ज्ञान लोकांना नसल्याने अनेकदा बाळाला धोका निर्माण होण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

स्तनपान ही आईला बाळासाठी मिळालेली दैवी देणगी आहे आणि या दूधाची विशिष्ट प्रकारची संरचना असते आणि बाळाला वयाच्या सहा महिन्यांपर्यंत केवळ हाच आहार देण्यात येतो. पण बाळाला योग्य तंत्राने स्तनपान देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण चुकीच्या पद्धतीने/तंत्रामुळे मातेला पाठदुखी, स्तनांना सूज येऊन त्यात रक्त किंवा पाणी साठणे, ताप येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. आणि बाळांना कुपोषण होऊ शकते, परिणामी अनेकदा संसर्ग होणे, वजन वाढण्याचे प्रमाण फार कमी असणे, मातेशी जिव्हाळा कमी असणे असे प्रकार होतात. त्यामुळे मातेला जी स्थिती आरामदायी वाटत असेल त्या स्थितीत तिने स्तनपान द्यावे. त्यावेळी तिच्या पाठीला आधार असणे महत्त्वाचे आहे. स्तनपान देण्यासाठी भारतीय पद्धत, क्रेडल पद्धत, मॉडिफाइड क्रेडल पद्धत, साइड लाइंग पद्धत (आडवे पडून बाळाला स्तनपान देऊ नये हा एक गैरसमज आहे). या सर्व पद्धतींमध्ये उत्तम अटॅचमेंटचे (जोडणी) नियम पाळले गेले पाहिजेत.

काय काळजी घ्याल

१. बाळाचे तोंड पूर्ण उघडले पाहिजे.

- Advertisement -

२. बाळाच्या हनुवटीचा स्पर्श स्तनाला व्हावा

३. स्तनमंडल आधी तोंडाच्या वर आणि नंतर खालून दिसावे.

- Advertisement -

४. खालचा ओठ बाहेरच्या बाजूला वळलेला असावा.

सर्व स्थितींमध्ये बाळाचे पूर्ण शरीर आईच्यासमोर असावे. बाळाचे डोके, मान यांना शरीराच्या एका रेषेत आधार मिळावा आणि ते स्तनांच्या समोर असावे.

स्तनाचा योग्य प्रकारे स्पर्श होत असेल तर दूध पुरेसे येते, ते बाहेरही सुरळीत निघते आणि बाळापर्यंत त्याचा प्रवाहही योग्य असतो. परिणामकारक स्तनपानासाठी बाळ जन्मापासून आईजवळ दिवसरात्र असणे अपेक्षित आहे.

स्तनपानामध्ये अडथळे निर्माण होणे

१. आईला स्तनपानात स्वारस्य नसणे, अति अस्वस्थता वाटणे, स्तनाग्रांना भेगा पडणे, सूज येऊन त्यात पाणी साजणे आणि मास्टिसिस सारख्या स्तनांच्या समस्या.

२. प्रमाणापेक्षा कमी वजन असलेली बाळे (मुदतपूर्व प्रसूती झालेली बाळे), संसर्ग, तोंड येणे, नाक चोंदणे इत्यादी तात्पुरत्या समस्या, हवा पोटात गेल्यामुळे आलेला अति दाब, दुभंगलेले ओठ किंवा जबड्यांसारखे जन्मजात व्यंग.

या समस्या आवश्यकतेनुसार हाताळल्या पाहिजेत असा सल्ला मदरहूड हॉस्पिटलचे पीडियाट्रिक्स आणि निओनॅटोलॉजीचे  सल्लागार डॉ. पियुष रणखांब यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -