घरलाईफस्टाईलबटाट्याचे ५ सौंदर्यवर्धक फायदे!

बटाट्याचे ५ सौंदर्यवर्धक फायदे!

Subscribe

आपल्या स्वयंपाकघरामध्ये बटाटा नेहमीच आढळून येतो. मात्र, हा बटाटा तेवढ्यापुरता मर्यादित नसून त्याचा सौंदर्याकरिता देखील वापर होऊ शकतो. बटाटा हा नैसर्गिकरित्या चेहरा उजळवतो. चला तर जाणून घेऊया बटाट्याच्या सौंदयवर्धक टीप्स!

चेहर्‍यावरील काळे डाग

चेहर्‍यावर काळे डाग असल्यास बटाट्याचा वापर करावा. चेहर्‍यावरील काळे डाग कमी करण्यासाठी बटाट्याचा रस काढून त्याने चेहर्‍यावर मसाज करावे आणि अर्ध्या तासाने चेहरा धुवून घ्यावा. यामुळे चेहर्‍यावरील काळे डाग जाण्यास मदत होईल.

डोळ्यांखालील काळी वर्तुळे

डोळ्यांखालील काळी वर्तुळे सौंदर्यामध्ये बाधा आणतात. ही डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे दूर करण्यासाठी बटाट्याच्या चकत्या काढून डोळ्यावर ठेवाव्यात. यामुळे ही काळी वर्तुळे कमी होतात.

- Advertisement -

चेहर्‍यावरील सुरकुत्या

काही तरुण – तरुणींच्या चेहर्‍यावर वयस्कर व्यक्तीसारख्या सुरकुत्या दिसतात. त्या दूर करण्यासाठी बटाट्याच्या रसात कापूस बुडवून तो कापूस फ्रिजमध्ये ठेऊन तो चेहर्‍यावर फिरवावा. यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

नैसर्गिकरित्या ब्लीच

बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहर्‍यावर लावावा आणि हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे नैसर्गिकरित्या ब्लीच होऊन चेहरा उजळ दिसतो.

- Advertisement -

चेहरा स्वच्छ होतो

बटाट्याचा एक चमचा रस, दोन चमचे लिंबू रस आणि दोन चमचे मुलतानी माती एकत्र करून हा तयार फेसपॅक चेहर्‍याला लावावा. यामुळे चेहरा स्वच्छ होतो. तसेच चेहरा उजळण्यास मदत होते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -