ई-सिगरेट्सबद्दलचे सत्य : धूम्रपान सोडा

सिगरेट ओढणे हे आरोग्यास घातक असल्यामुळे ई- सिगरेटचा पर्याय काढण्यात आला. हल्ली ई-सिगरेट तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. मात्र ई-सिगरेटचे परिणाम आरोग्यावर कसे होतात याबाबत अनेकांना माहिती नाही.

Mumbai
electronic-cigarette
प्रातिनिधिक फोटो

ई-सिगरेट्स ओढण्यामुळे आरोग्याला निर्माण होणारा धोका धूम्रपानाच्या तुलनेत ५ टक्क्यांहून अधिक नाही हे ई-सिगरेट्सबद्दलच्या वाढत्या सार्वमतातून स्पष्ट होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे धूम्रपानामध्ये असलेले ज्वलन ई-सिगरेट्समध्ये नाही. या ज्वलनामुळेच हानीकारण विषारी वायू व कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक निर्माण होतात. ई-सिगरेट किंवा इलेक्ट्रॉनिक सिगरेट हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. हे उपकरण तंबाखूच्या धूम्रपानामुळे येणारी भावना निर्माण करते. ई-सिगरेट्सच्या वापराला सामान्यपणे “व्हेपिंग” असे म्हटले जाते. ही सिगरेट निकोटिन, प्रॉपिलीन ग्लायकोल, ग्लिसरिन आणि फ्लेवरिंग घटक वापरून तयार केली जाते. २००३ साली चीनमधील औषधकंपनी “हॉन लिक”ने आधुनिक ई-सिगरेटचा शोध लावला.

चरस, गांजा ओढण्याची नवी पद्धत

कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या बहुसंख्य विषारी रसायनांपैकी २० हून अधिक नेहमीच्या तंबाखूयुक्त धूम्रपानात दिसून येतात. तुलनेने ई-सिगरेट्स चांगल्या आहेत. त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांबद्दल अजून माहिती नाही. लक्षात आलेला आणखी एक धोका म्हणजे चरस ओढणाऱ्यांनी ई-सिगरेट्सचा वापर सुरू केला आहे. ही चरस, गांजा वगैरे ओढण्याची नवीन पद्धत आहे. त्यामुळे तंबाखूयुक्त धूम्रपान पूर्णपणे वर्ज्य करणाऱ्यांना त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतील पण ते करू न शकणाऱ्यांसाठी मंजुरीप्राप्त, नियंत्रणाखालील निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे एसआरव्ही ममता हॉस्पिटलच्या आँकोलॉजिस्ट डॉ. जयश्री बंकिरा यांनी सांगितले आहे.

असे होतात आरोग्यावर परिणाम

यासोबत येणारे फारसे गंभीर नसलेले साइड-इफेक्ट्स म्हणजे घशात-तोंडात जळजळ होणे, उलटी होणे, मळमळ होणे, खोकला येणे. ई-सिगरेट्स वापरणे हा धूम्रपान सोडण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे. यामुळे पॅसिव्ह स्मोकिंगही टाळले जाते. अनेकजण छंद म्हणून ई-सिगरेट्स वापरत असले, तरी धूम्रपानाचा धोका करणे, खर्च कमी करणे हा यामागील हेतू आहे. आरोग्य सुधारण्यासाठी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीने धूम्रपान थांबवणे, हाच निर्णय आहे.

कसे सोडाल धूम्रपान

धूम्रपान सोडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे धूम्रपान थांबवण्यासाठी उपलब्ध सेवांच्या (उपलब्ध असल्यास) माध्यमातून तज्ज्ञांची प्रत्यक्ष भेट घेणे आणि त्या जोडीला निकोटिन रिप्लेसमेंट उपचार किंवा अन्य काही औषधांवर आधारित उपचार घेणे. यामुळे धूम्रपान सुटण्याची शक्यता कोणतीही मदत न घेता केलेल्या धूम्रपान सोडण्याच्या प्रयत्नांच्या तुलनेत चौपटीहून अधिक असू शकते. यामुळे तुमची जीवनशैली आणि आरोग्य यामध्ये लक्षणीय सुधारणा झालेली आढळून येईल. काही फायदे तत्काळ दिसून येतात, तर काही दीर्घकालीन असतात असे मत डॉ. जयश्री बंकिरा यांनी मांडले आहे.

धूम्रपान सोडल्यानंतर शरीरात होणारे बदल

 

२० मिनिटांनंतर- रक्तदाब आणि नाडीचे धोके तर सामान्य स्तरावर येतात.

८ तासांनंतर- शरीरातील कार्बन मोनोक्साइडची पातळी अर्ध्याने कमी होते आणि ऑक्सिजन सामान्य पातळीवर येतो.

४८ तासांनंतर – कार्बन मोनोक्साइड शरीरातून नाहीसे होते. फुप्फुसे धूम्रपानामुळे तयार झालेला चिकट पदार्थ आणि धूळ काढून टाकण्यास सुरुवात करतात. चव आणि गंधाचा अनुभव लक्षणीयरित्या सुधारतो.

७२ तासांनंतर – श्वसन सोपे होते. श्वासनलिका शिथिल होतात आणि शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते.

२ ते १२ आठवड्यांनंतर- रक्ताभिसरण सुधारते

३ ते ९ महिन्यांनंतर- खोकला, घरघर आणि श्वसनाच्या समस्या बऱ्याच सुधारतात, कारण, फुप्फुसांचे कार्य १० टक्क्यांपर्यंत वाढते.

१ वर्षानंतर- धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत हृदयविकाराचा धोका निम्मा होतो

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here