जाणून घ्या हरीतालिकेचे व्रत कसे करावे

जाणून घ्या हरीतालिकेचे महत्त्व.

Mumbai
hartalika
हरीतालिका

भाद्रपद शुध्द तृतीयेचे हरीतालिका हे व्रत कूमारीकांनी मनासारखा पती मिळावा म्हणून आणि सौभाग्यवतींनी पतीराज दिर्घायूषी, आरोग्यवान व्हावे म्हणून आवर्जुन करावे असा प्रघात आहे. हरितालिका हे श्री पार्वती मातोश्रींचेच एक नाव, त्यांनी आपल्या प्रबळ इच्छेने खडतर तपश्चर्या करून श्री महादेवांना प्राप्त केले. याचीच आठवण म्हणून या व्रताचे आचरण केले जाते. मात्र, हे जूजन कसे करावे? कोणता मंत्र उच्चारायचा याविषयची जाणून घ्या माहिती.

 • या व्रताच्या दिवशी सूर्योदयाआधी उठून आवळ्याचे तेल आणि उटण्याने स्नान करावे.
 • शूभ्र वस्त्र परीधान करावे.
 • उगवत्या सूर्यनारायणांना अर्घ्य देऊन “ॐ असवादित्य ब्रह्म” म्हणत स्वतः भोवती ३ प्रदक्षिणा घालाव्या.
 • आपल्या घरातील देवपूजा आणि नित्यसेवा पूर्ण करावी.

पूजेची मांडणी

 • पूजेची जागा झाडून आणि गोमूत्राने स्वच्छ पूसून घ्यावी. सर्वत्र गोमूत्र शिंपडावे.
 • स्वच्छ केलेल्या जागेवर बेलपत्राची रांगोळी काढून त्यावर चौरंग कींवा पाट ठेवावा त्यावर पांढरे सूती किंवा रेशमी वस्त्र अंथरुन मधोमध नदीच्या वाळूची श्री महादेवांची पिंड करावी.
 • त्या पिंडीच्या पूर्वेला एक दूसरी छोटी पिंड (श्री हरितालिका किंवा श्री पार्वती मातोश्रींची) करावी.
 • छोट्या पिंडीच्या समोर दोनही बाजूंना २ शाळूंका (श्री जया व श्री विजया) कराव्यात.
 • श्री महादेवांच्या पिंडीसमोर विड्याच्या जोड पानांवर श्री गणेशांची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी.
 • श्री गणपतींसमोर एका छोट्या वाटीत गूळखोबरे ठेवावे.
 • श्री गणेशांच्या उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवावा.
 • मांडलेल्या पूजेसमोर एका छोट्या पाटावर पांढरे कापड अंथरून त्यावर श्री हरितालिका व्रत कथेची पोथी ठेवावी. पूजेभोवती रांगोळी काढावी.
 • अष्टगंध , अक्षता , भस्म , हळदी-कुंकु , पूजनाची फूले , पत्री , दूर्वा , निवडलेले बेलपत्र – १३० , धूप , शूध्द तूपाचे निरांजन , खडीसाखर , तांब्याचा तांब्या , ताम्हण , पळी , पेला , विड्याची पाने , खारीक , बदाम , सूपारी , सूटी नाणी , यथाशक्ती दक्षिणा , खण ,गळेसरी , बांगड्या इ. साहित्य पूजेच्या ठिकाणी जमवून ठेवावे.

पूजनाचा क्रम

श्री स्वामी स्तवन वाचन मंगलतिलक “ॐ भद्रं कर्णेभि:…” शांतीमंत्र म्हणत कपाळाला हळदी-कुंकू लावावे. आचमन प्रथम ३ नावांनी उजव्या तळहातावर पाणी घेऊन प्राशन करावे.

 • ॐ केशवाय नमः !
 • ॐ नारायणाय नमः !
 • ॐ माधवाय नमः !

पूढील २ मंत्र म्हणतांना पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडावे.

 • ॐ गोविंदाय नमः !
 • ॐ विष्णवे नमः !
 • ॐ मधूसूदनाय नमः !
 • ॐ त्रिविक्रमाय नमः !
 • ॐ वामनाय नमः !
 • ॐ श्री धराय नमः !
 • ॐ ऋषीकेषाय नमः !
 • ॐ पद्मनाभाय नमः !
 • ॐ दामोदराय नमः !
 • ॐ संकर्षणाय नमः !
 • ॐ वासूदेवाय नमः !
 • ॐ प्रद्यूम्नाय नमः !
 • ॐ अनिरुद्धाय नमः !
 • ॐ पूरूषोत्तमाय नमः !
 • ॐ अधोक्षजाय नमः !
 • ॐ नारसिंहाय नमः !
 • ॐ अच्यूताय नमः !
 • ॐ जनार्दनाय नमः !
 • ॐ उपेन्द्राय नमः !
 • ॐ हरये नमः !
 • ॐ श्रीकृष्ण परमात्मने नमः !

सौभाग्यवतींसाठी

मी (अमूक) मला जन्मोजन्मी अखंडीत सौभाग्य प्राप्त व्हावे, धन-धान्य-पूत्र-पौत्रादिंची अभिवृध्दी व्हावी. दिर्घायूष्यादि सकल कार्यसिध्दीसाठी.

कुमारीकांसाठी

मी (अमूक) गोत्रात मला मनेप्सित निर्व्यसनी, सच्चारीत्र्यवान, धार्मिक असा शोभन गूणमंडीत पती प्राप्त होण्यासाठी.

प्रतिवार्षिक विहीत श्री हरितालिका व्रत अंगभूत यथाशक्ती यथाज्ञानाने यथामिलीत उपचारांनी श्री उमा महेश्वर प्रीत्यर्थे श्री वालूका शिवलिंगांचे पूजन करीत आहे! निर्विघ्नता सिद्धीसाठी श्री रिध्दी सिद्धी सहीत श्री महागणपती पूजन तसेच कलश , शंख , घंटी, दिप पूजन करीत आहे!