घरलाईफस्टाईलनाष्ट्यात हे पदार्थ खाण्याचे टाळा.

नाष्ट्यात हे पदार्थ खाण्याचे टाळा.

Subscribe

सकाळी नाष्टा करणे शरीरासाठी आवश्यक असते. दिवसभर एनर्जेटिक आणि स्वस्थ राहण्यासाठी नाष्टा करा. परंतु नाष्ट्यात काय खावे आणि काय खाऊ नये, याचे योग्य ज्ञान असणे गरजेचे असते.

फळांचा ज्यूस

फळांचा ज्यूस पिऊ नका. यामध्ये शुगरचे प्रमाण खूप जास्त असते. तुम्ही फळे खाऊ शकता. फक्त आंबट फळांचे सेवन ब्रेकफास्टमध्ये करु नका. एका संशोधनात सिध्द झाले आहे की, संत्रे किंवा दुसर्‍या कोणत्याही आंबट फळ आणि त्यांच्या रसामुळे त्वचेचा कॅन्सर मेलेनोमा होण्याची शक्यता असते.

टोस्ट

सकाळी सकाळी टोस्ट आणि जॅमसुध्दा खाऊ नका. यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट असते. यापेक्षा तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थ खा.

- Advertisement -

पेस्ट्री, डोनट

रक्तातील शुगर वाढवणारे पदार्थ सकाळी खाऊ नका. जसे की, पेस्ट्री किंवा डोनट. हे ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्याने शुगर वाढू शकते.

पॅनकेक, चॉकलेट

पॅनकेक, चॉकलेट असे पदार्थ खाण्यापासून दूर राहा. हे पदार्थ सकाळी खाणे म्हणजेच आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.

- Advertisement -

बर्गर

सकाळच्या नाष्ट्यात बर्गर पॅटीस यांचे सेवन करु नका. तेलकट खाद्यापासून दूर राहा. यामुळे तुमच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -