घरलाईफस्टाईलहिवाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यावी?

हिवाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यावी?

Subscribe

हिवाळ्यात अशी घ्यावी बाळाची काळजी

जसा ऋृतमध्ये बदल होतो, तसा त्याचा शरिरावर देखील परिणाम होतो. विशेष म्हणजे अशावेळी बाळांची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. खास करुन हिवाळ्यात त्वचा संवेदनशील असते. त्यामुळे बदलत्या ऋृतुमुळे बाळाच्या नाजूक त्वचेवर लगेच परिणाम होतो. संसर्ग झाल्यास तापही येऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात लहान बाळांची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते.

एरंडेल तेलाचे मालिश

बाळाला आंघोळ घालण्यापूर्वी सूर्यफूल आणि एरंडेल तेल यांचे मिश्रण असलेल्या तेलाने बाळाला मालिश करावे. तसेच ज्या ठिकाणी बाळाला आंघोळ घालणार ती जागा थंड नाही ना याची खात्री करुन घ्यावी. तसेच त्या ठिकाणाची खिडकी उघडी नाही ना, हे पहावे. यामुळे बाळाला थंडी लागत नाही. तसेच तेल लावून झाल्यानंतर थोडावेळ तेल बाळाच्या शरीरात मुरु द्यावे आणि नंतर आंघोळ घालावी यामुळे बाळाची त्वचा मुलायम होते.

- Advertisement -

बाळाच्या टाळूची कोरडी त्वचा झाल्यास

हिवाळ्यात बाळाच्या टाळूची त्वचा कोरडी पडते. त्यामुळे टाळूवर खपल्या दिसतात. त्यामुळे आंघोळीच्या वेळी एक मुलायम पंचा पाण्यात प्रथम बुडवून पिळून घ्यावा. या पंचाने बाळाची टाळून थोडावेळ झाकून ठेवावी, असे दररोज केल्याने त्या खपल्या आपोआप पडायला सुरुवात होते.

सर्दी होऊ नये याकरता

बाळाला आंघोळ घालून झाली का सर्वप्रथम त्याचे डोकं पुसून घ्यावे. त्यानंतर बाळाचे संपूर्ण शरीर पुसून घेऊन त्यावर पावडर लावाली. त्यानंतर बाळाला उबदार कपडे घालावे. यामुळे बाळाला सर्दीचा त्रास होत नाही.

- Advertisement -

बाळाला उन्हात बसवावे

हिवाळ्यात घरात देखील थंडावा जाणवतो. अशावेळी बाळाला कोवरळ्या उन्हात बसवावे किंवा बाहेर फिरायला घेऊन जावे. यामुळे सकाळच्या उन्हातून बाळाला ‘डी’ जीवनसत्त्व मिळते. त्यामुळे बाळाची हाडे मजबूत होण्यास मदत होते.

बाळाला ऊब मिळण्यासाठी

नवजात शिशूला आईचे दूध पाजावे. त्यामुळे बाळाच्या शरीराला ऊब मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -