घरलाईफस्टाईलबहुगुणी भेंडी ,घरगुती ब्युटी टिप्स

बहुगुणी भेंडी ,घरगुती ब्युटी टिप्स

Subscribe

बहुगुणी भेंडी

  

भेंडी

बटाट्यानंतर भेंडी हीच एक अशी भाजी आहे जी अनेक जणांना मनापासून आवडते.
या भेंडीचे देखील अनेक सौंदर्यवर्धक आणि आरोग्यास लाभ देणारे फायदे आहेत. चला तर मग पाहूयात किती गुणकारी आहे भेंडी ते.

* वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता.

- Advertisement -

* मधुमेही व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.

* भेंडीमुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी भेंडी उपयुक्त आहे.

- Advertisement -

* भेंडीचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहर्‍यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.

घरगुती ब्युटी टिप्स      

ओठ काळे पडले तर-
रोज ओठांवर बीटचा रस लावावा आणि अर्ध्या तासांनंतर थंड पाण्याने धुवावे.

नखे ठिसूळ झाली तर-
रोज नखांवर ऑलिव्ह ऑईल लावून नखांचा हलकासा मसाज करावा.
नेलपेंटचा कमीत-कमी वापर करावा.कारण त्याच्या वापराने नखांना पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे नखांवर पिवळटपणा येतो व नखे लवकर तुटतात.

हाताच्या सौंदर्यासाठी –
ग्लिसरिन, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस समप्रमाणात घ्या. त्यात एक टी-स्पून साखर मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आठवड्यातून २ वेळा हातांवर चोळल्यास हातांचे सौंदर्य वाढवण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -