केळ्याचा हलवा

Mumbai
banana halwa recipe
केळ्याचा हलवा

आपण अनेकदा गाजर हलवा, बीट हलवा, दुधी हलवा यांचा आस्वाद घेतला असाल. पण आज आम्ही तुम्हाला केळ्याचा हलवा दाखवणार आहोत. चला तर पाहुया रेसिपी.

साहित्य

१ कप बदाम पावडर
३ पिकलेली केळी
२ चमचे तूप किंवा बटर
साखर
वेलची पावडर

कृती

सर्वप्रथम बदामाचे काप मंद आचेवर परतून घ्या. त्यानंतर त्यात पिकलेली तीन केळी कुसकरुन घाला. त्यानंतर वरुन तूप घालून मोठ्या आचेवर २ ते ३ मिनिटे शिजवून घ्या. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार जसे गोड हवे तशी साखर त्यात एकजीव करा आणि वरुन वेलची पूड टाकून घ्या. मिश्रणाला तेल सुटायला लागले की समजून जा की, तुमचा हलवा तयार आहे.