घरलाईफस्टाईलझणझणीत बटाट्याचं भरीत

झणझणीत बटाट्याचं भरीत

Subscribe

झटपट बटाट्याचं भरीत

बऱ्याचदा घरात भाजी नसली का काय करावे, असा प्रश्न पडतो. परंतु, प्रत्येकाच्या घरात बटाटी ही असतात. मात्र, बटाट्याची भाजी खाऊन देखील फार कंटाळा येतो, अशावेळी तुम्ही बटाट्याचे भरीत नक्की ट्राय करु शकता. चला तर जाणून घेऊया बटाट्याच्या भरीतची रेसिपी.

साहित्य

- Advertisement -
  • २ उकडलेले बटाटे
  • १ कांदा
  • अर्धी ते एक वाटी दही
  • अर्धी ते एक वाटी ओलं खोबरं
  • १ किंवा २ हिरवी मिरची
  • अर्धी वाटी कोथिंबीर
  • चिमूटभर मीठ

कृती

सर्वप्रथम मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. त्यानंतर कांदा थोडा जाडसर चिरायचा. नंतर उकडलेले बटाटे हाताने कुस्करून घ्यावे. त्यात कांदा, मिरची घालून कालवायचे. नंतर मीठ, दही, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून चमच्याने मिसळायचे. हे झटपट बटाट्याटे भरीत चपातीसोबत खूप छान लागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -