उष्माघातापासून सावधान

Mumbai
Heat stroke

वातावरणातील जास्त तापमान किंवा जोरदार गतिविधिंमुळे शरीर ते सहन करू शकले नाही, तर असा उष्माघात होतो. जास्त तापमानामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होतात. उष्माघात हा ऊष्णतेने होणारा सर्वात घातक प्रकार आहे. अति व्यायामाने किंवा जास्त जड काम केल्याने आणि प्रमाणबद्ध तरल पदार्थांचे सेवन न केल्यामुळे हा होतो.

उष्माघाताची लक्षणे
हृदयाची धडधड / ठोके वाढणे, भरभर आणि दीर्घ श्वास, रक्तचाप दर वाढणे किंवा खाली होणे, घाम थांबणे, चिडचिड, बेशुद्धी किंवा भ्रम, चंचलता येणे किंवा ठोके हलके होणे, डोकेदुखी, मळमळ (उलट्या), बेशुद्धी आदी लक्षणे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये आढळून येतात.

अशी घ्या काळजी
उष्माघातापासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त पेय प्या. तसेच जर कोणी ऊन्हात काम करत असाल तर शरीरातील द्रव्याचे प्रमाण राखत शरीर सर्वसाधारण तापमानावर राहील याची काळजी घ्यावी. या दिवसात कॅफीन आणि मद्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा कारण त्यामुळे शरीरात कोरड पडते. सौम्य रंग आणि ढिले कपडे वापरा आणि शारीरातील पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी कामामधून पाणी पिण्यासाठी सुट्टी घ्या.

प्राथमिक उपचार
*उष्माघात झालेल्या व्यक्तीला सूर्यापासून दूर करून थंडाव्याच्या किंवा सावलीच्या ठिकाणी आणावे.
*व्यक्तीला खाली झोपवावे आणि त्याचे पाय व हात सरळ करावे.
*कपडे सैल करावे किंवा काढून टाकावे.
*व्यक्तीला थंड पाणी पाजावे किंवा काही कॅफेन वा मद्य विरहीत पेय प्यावयास द्यावे.
*व्यक्तीचे शरीर थंड पाण्याचे शिबके मारून किंवा थंड पाण्याच्या बोळ्याने अंग पुसून काढून किंवा पंख्याखाली ठेवून थंड करावे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here