नितळ त्वचेसाठी टिप्स

beauty benefits of wheat flour based face packs for skin
फेसपॅक

अनेक तरुणींना आपला चेहरा नितळ हवा असतो. याकरता या तरुणींची काहीही करण्याची तयारी असते. अशाच काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • चार चमचे उकडलेले तांदूळ, १ चमचा दूध आणि १ चमचा मध मिसळून चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका. यामुळे त्वचा तरुण आणि मुलायम होण्यासाठी मदत होते. तसेच डागही नाहीसे होतात.
  • मसुर डालीच्या पिठात थोडेसे दूध घालून ही तयार पेस्ट चेहऱ्याला लावा. चेहऱ्याला लावल्यानंतर २० मिनिटांनी स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे टॅनिंग दूर होऊन त्वचा मुलायम होते. तसेच सुरकुत्याही जातात.
  • बटाट्याचा १ चमचा लगदा आणि १ चमचा दही मिसळून चेहऱ्यावर त्याची पेस्ट लावा. १५ मिनिटांनी चेहरा सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे नॅचरल ब्लीच होते.
  • गाजर किसून त्यात मध मिसळावे. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा, यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांपासून सुटका होते.
  • १ केळ, पाव चमचा दही आणि २ चमचे मध मिसळून बनवलेली पेस्ट चेहऱ्यावर लावावी. यामुळे त्वचा मॉश्चराईज होते.