घरलाईफस्टाईलतजेलदार चेहऱ्यासाठी वापरा जीरं

तजेलदार चेहऱ्यासाठी वापरा जीरं

Subscribe

आरोग्यासह तजेलदार, चमकदार त्वचेसाठी जीरं फायदेशीर

जीरं हा मसाल्याचा महत्त्वाचा पदार्थ असून त्याचा वापर शक्यतो भारतीय जेवणात केला जातो. खाण्यासह जिऱ्याचा वापर चेहऱ्यासाठीही केला जाऊ शकतो. जिऱ्यामध्ये एन्टी-इंफ्लेमेटरी आणि एन्टीऑक्सिडेंट गुण आढळतात. जे आरोग्यासह तजेलदार, चमकदार त्वचेसाठी फायदेशीर ठरु शकते. चेहऱ्यावरील मुरमं कमी करण्यासही जीरं गुणकारी ठरते.

तजेलदार चेहऱ्यासाठी असा करा वापर –

  • जिऱ्याच्या पाण्याची वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील बॅक्टेरिया, इतर अशुद्ध घटकही बाहेर पडण्यास मदत होते.
  • ही वाफ घेतल्याने ब्लॅकहेड्स काढणंही सोपे होते. तसेच त्वचेमधील रक्तप्रवाह सुरळित होण्यास मदत होते.
  • जिऱ्यात बरेच एन्टीऑक्सिडेंट असल्याने सुरकुत्या, काळी वर्तुळे आणि त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते.
  • जीरं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास आणि सकाळी उठल्यावर या पाण्याने चेहरा धुतल्यास फायदा होऊ शकतो.
  • जिऱ्यापासून बनलेला फेसपॅकही फायदेशीर ठरु शकतो.

असा बनवा फेसपॅक

  • फेसपॅक बनवताना थोडी हळद आणि जीरं हे मिश्रण करुन घ्या.
  • त्यात मधाचे काही थेंब टाकावेत.
  • हा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा, काही वेळाने सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा.
  • यामुळे चेहरा तजेलदार होण्यास मदत होऊ शकते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -