तुळस घालून दुधाचे सेवन केल्यास होतात ‘हे’ फायदे

Benefit Of Milk With Basil
तुळस घालून दुधाचे सेवन केल्यास होतात 'हे' फायदे

तुळस ही औषधी म्हणून ओळखली जाते. तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील अनेकजण तुळशीच्या पानाचे सेवन करतात. मात्र, ही तुळस जर तुम्ही दुधात घालून त्याचे सेवन केल्यास त्याचा आरोग्याला चांगला फायदा होतो.

दम्याच्या रुग्णांकरता

दम्याच्या रुग्णांसाठी तुळस फारच फायदेशीर ठरते. बऱ्याचदा हवामानात होण्याऱ्या बदलामुळे श्वास संबंधी त्रासापासून वाचण्यासाठी दूध आणि तुळशीचे हे मिश्रण खूप उपयुक्त ठरते.

मायग्रेनचा त्रास

डोके दुखी किंवा मायग्रेनचा त्रास होत असल्यास दुधात तुळशीची पाने घालून त्याचे सेवन करावे. यामुळे मायग्रेनचा त्रास दूर होतो.

ताण होईल दूर

बऱ्याच जणांना ताण येतो, अशावेळी नेमके काय करावे, असा प्रश्न उपस्थित होतो. जर का असा ताण आल्यास त्यावेळी तुम्ही दुधामध्ये तुळशीची पानं उकळून त्याचे सेवन करावे. यामुळे आपला तणाव दूर होऊन तणावाची समस्याच नाहीशी होईल.

हृदयाशी निगडित आजारा होतील दूर

दुधात तुळस घालून त्याचे सेवन केल्यास हृदयाशी निगडित आजार दूर होण्यास मदत होते. हृदयाच्या समस्येसाठी देखील तुळस घातलेले दूध फायदेशीर ठरते. सकाळी अनाश्यापोटी या दुधाचे सेवन केल्याने हृदयाशी निगडित आजारांमध्ये फायदा होतो.

मुतखड्यावर फायदेशीर

मुतखड्याचा त्रास होत असल्यास दूध आणि तुळशीच्या पानाचे सेवन करावे. यामुळे मुतखड्याचा त्रास कमी होतो.