काय आहेत पावसाळ्यात दूध पिण्याचे फायदे-तोटे?

दूध हा असा पदार्थ आहे, ज्यामुळं फक्त फायदा होतो. पण दुधाचा जितका फायदा होतो, तितकंच ते पावसाळ्यात हानिकारक आहे याची तुम्हाला माहिती आहे का? याविषयीची माहिती खास तुमच्यासाठी

Mumbai
milk
प्रातिनिधिक फोटो

पावसाळा हा ऋतू सगळ्यांनाच हवासा वाटतो. मात्र, सर्वात जास्त आजारी पडण्याचं प्रमाणही याच ऋतूमध्ये असतं. त्यामुळं पावसाळ्यात काय खायला – प्यायला हवं याची जास्त काळजी घ्यावी लागते. इतकंच नाही तर, प्रत्येक खाण्यापिण्याची गोष्टीवर बारीक नजर ठेवावी लागते. आपण नेहमीच ऐकतो की, दूध हा असा पदार्थ आहे, ज्यामुळं फक्त फायदा होतो. पण दुधाचा जितका फायदा होतो, तितकंच ते पावसाळ्यात हानिकारक आहे याची तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहीत नसेल तर काय आहेत याची नक्की कारणं हे आम्ही तुम्हाला सांगतो.

दूध विषारी असण्याची शक्यता

पावसाळ्यात हिरवळ जास्त असते. त्यामुळं या हिरवळीवर पतंगासारखे कीटक जास्त प्रमाणात असतात. तर शेतकरी या किटकांपासून वाचण्यासाठी बऱ्याच प्रमाणात कीटकनाशकांचा उपयोग करतात. तर हिरवळ जास्त असल्यामुळं दूध देणाऱ्या प्राण्यांना सुक्या चाऱ्याऐवजी हिरवा चारा देण्यात येतो. ज्यामध्ये कीटकनाशक वा कीटक असण्याची संभाव्यता असते. त्यामुळं गाय अथवा म्हशीचं दूध काढल्यानंतर यामध्ये विष असण्याची शक्यताही निर्माण होते. त्यामुळंच पावसाळ्यात गायीम्हशीचं दूध हे विषारी असण्याची शक्यता जास्त असते. कीटकांमुळं दूध दूषित होतं.

मध घालून दूध प्यावं

पावसाळ्यात दूध पित असल्यास, नियमित स्वरुपात दुधामध्ये मध मिसळून ते प्यावं. दुधामध्ये साखरेचा वापर करणं टाळायला हवं. दुधात मध घातल्यास, दुधात असलेले कीटक वा विषाचा नायनाट होतो आणि शिवाय मध हा शरीरासाठी चांगला असतो. तसंच दुधात हळद घालून पिणंही चांगलं असतं. पावसाळ्यात होणारे आजार येण्यापासून हळदीमुळं सुटका होते. तर पावसाळ्यात दूध थंड पिण्यापेक्षा थोडं कोमट करून पिणं जास्त चांगलं असतं.

सकाळी नाही तर रात्री दूध प्यावं

दूध कधीही पिणं आरोग्यासाठी लाभदायी असतं. पण पावसाळ्यात मुळातच थंडावा जास्त असतो आणि आजारी जास्त होण्याची लक्षणं असतात. त्यामुळं सकाळी दूध पिण्यापेक्षा रात्री दूध पिणं सोयीस्कर असतं. रात्री कोमट दूध प्यायल्यामुळं झोप चांगली लागते. तर चुटकीभर हळद टाकल्यास, शरीराच्या आरोग्याला लाभदायी ठरतं. सकाळी दूध प्यायचं असल्यास थोडीशी दालचिनीदेखील घालू शकतात. त्यामुळं पचनक्रिया चांगली होते आणि स्वादही चांगला असतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here