मोहरीच्या तेलाचे लाभदायक फायदे

मोहरी आरोग्याच्या अनेक समस्यांवर उपयुक्त

Mumbai

मोहरी साधारण जेवणात फोडणी देण्यासाठी वापरली जाते. मात्र ही मोहरी आरोग्याच्या अनेक समस्यांवर उपयुक्त ठरते. मोहरी आणि मोहरीचे तेल अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते. मोहरीच्या बियांचे त्वचेसाठी देखील अनेक फायदे आहेत. मोहरीतील बीटाकेरोटिन, आयरन, फॅटी अॅसिड, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या घटकामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत करते.

त्वचेसाठी उपयुक्त

मोहरीच्या बियांनी त्वसेस चकाकी येते. मोहरीच्या त्वचा ग्लाईंग करता येते. मोहरीचे तेल त्वचेस तरूण राखण्यास मदत करते. ड्राय स्किन असल्यास मोहरीच्या बीया चांगला उपाय मानला जातो. मोहरीच्या बियांमध्ये सल्फर तसेच, अँटी फंगल हे घटक असल्याने चेहऱ्यावर होणाऱ्या इनफेक्शनला दूर ठेवण्यासाठी लाभदायक ठरते.

मोहरीच्या तेलात तसेच बियांमध्ये कॅरोटीन आणि ल्यूटिन हे घटक असल्याने अँटी-ऑक्सिडेंट तयार करतात. तसेच व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर असल्याने त्वचेवर अँटी-एजिंगप्रमाणे काम करतं असल्याने त्वचेस तारूण्या प्राप्त होते.

चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स दूर करण्यासाठी मोहरीचे तेल उत्तम औषध आहे. मोहरूचे तेल, बेसन, दही आणि लिंबूचा रस मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी धुवून टाका त्याने त्वचेचा रंग उजळल्यास मदत होईल.

केसांच्या वाढीसाठी लाभदायक

मोहरीच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात बीटाकेरोटिन, आयरन, फॅटी अॅसिड, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम असते. यामुळे केसांना नियमित मसाज केल्याने केस मजबूत होतात. मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ए असल्याने केसांच्या विकासासाठी फायदेशीर ठरतेच. तसेच केसांची अधिक वाढ होते.

दम्यापासून आराम

मोहरीच्या तेलामध्ये भरपूर मॅग्नेशिअम असल्याने दम्यापासून आराम मिळतो. मोहरीच्या १ चमचा तेलामध्ये १ चमचा साखर मिसळून प्यायल्याने दम्यापासून आराम मिळतो.

त्वचेची मृत त्वचा दूर करण्यास

मोहरीच्या बीया नॅचरल स्क्रबप्रमाणे काम करण्याचे काम करते. मोहरीच्या बीयांमध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब टाकून स्क्रब तयार करून चेहऱ्यावर लावा. यांमुळे हाताने मसाज केल्याने त्वचेची मृत त्वचा दूर होऊ शकते.

कर्करोग टळण्यास मदत

मोहरीच्या तेलामध्ये ग्लुकोसिनोलेट गुण असल्याने कर्करोग टळण्यास मदत होते. हे शरिरात कर्करोग सेल्स तयार होऊ देत नाही.

दातदुखीपासून सुटका

मोहरीच्या तेलामध्ये थोडेसे मीठ मिसळून दातांवर दिवसातून २ वेळा मसाज केल्यास दातदुखीपासून आराम मिळेल.