घरलाईफस्टाईलबुद्धिवर्धक बदामाचं आरोग्य आणि सौंदर्यवर्धक तेल

बुद्धिवर्धक बदामाचं आरोग्य आणि सौंदर्यवर्धक तेल

Subscribe

आपली बुद्धी तल्लग व्हावी यासाठी बदाम खातो. मात्र, बदामाचं तेलही सौंदर्य आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

बदाम तेल हे सौंदर्य आणि आरोग्य दोघांसाठीही चांगलं आहे. अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये बदाम तेलाचा वापर केला जातो. बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई, प्रोटिन, झिंक, मोनोसॅच्युरेडेट फॅट, पोटॅशिअम आणि आरोग्यासाठी आवश्यक चांगले पोषक घटक असतात. बदाम तेलाचे काय फायदे आहेत जाणून घेऊया.

केसातील कोंडा दूर होतो

डोक्याची त्वचा कोरडी झाली की केसात कोंडा होतो. यामुळे केसांमध्ये खूप खाज येते. केसातील कोंडा खांद्यावरही पडतो. अशा त्रासदायक कोंड्यापासून मुक्ती हवी असेल तर बदाम तेल फायदेशीर आहे. बदाम तेलाने केसांच्या मुळाशी मसाज करा यामुळे डोक्याच्या त्वचेतील कोरडेपणा दूर होईल. अर्ध्या तासाने केस धुवा.

- Advertisement -

त्वचा मुलायम होते

बदाम तेल हे सौम्य असतं ज्यामुळे लहान मुलांना मालिश करण्यासाठी देखील वापरलं जातं. बदाम तेलाने त्वचेवर मसाज केल्यानं ते त्वचेत शोषलं जाऊन त्वचेला एक चमक मिळते, त्वचा मुलायम होते.

त्वचेच्या समस्या दूर करतं

वाढत्या वयानुसार त्वचा सैल होत जाते, त्वचेवर फाईन लाईन्स, रिंकल्स आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात. बदाम तेलामुळे या सर्व समस्या दूर होऊ शकतात. चेहऱ्यावर बदाम तेलानं मसाज करून रात्रभर ठेवा, सकाळी धुऊन टाका. याशिवाय लहान मुलांना डायपर रॅशेस झाल्यास त्यावर बदाम तेल चोळावं कारण यात कोणतंही केमिकल नसतं.

- Advertisement -

फुटलेल्या ओठांवर फायदेशीर

ओठ फुटल्यानंतर ओठांचं सौंदर्यही जातं आणि वेदनाही होतात. अशा ओठांवर बदाम तेल लावल्यानं ओठ मुलायम राहतात.

स्नायूच्या वेदना आणि थकवा दूर होतो

स्नायूंमध्ये वेदना होत असतील किंवा थकवा जाणवत असेल तर बदाम तेलानं मसाज करा तुम्हाला आराम मिळेल. तेल थोडंस कोमट करून लावल्यास त्याचा फायदा अधिक होईल.


हेही वाचा – मक्याचे सेवन करणे फायदेशीर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -