घरलाईफस्टाईलफ्लॉवर आरोग्यासाठी लाभदायक

फ्लॉवर आरोग्यासाठी लाभदायक

Subscribe

फ्लॉवरचे काही खास असे आरोग्यदायी फायदे.

सर्वच भाज्या या आरोग्यासाठी लाभदायक असतात. पण, बरेच जण आवडीनुसार भाज्यांचे सेवन करतात. जर तुम्ही फ्लॉवर खाणे टाळत असाल तर फ्लॉवरचे काही खास असे आरोग्यदायी फायदे आहेत. ज्यामुळे तुम्ही फूलगोभी भाजी खाण्यास सुरुवात कराल. चला जाणून घेऊया फ्लॉवर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

वजन कमी होते

- Advertisement -

हिरव्या पालेभाज्यांच्या तुलनेत फ्लॉवरमध्ये कार्बोहायटड्रेट अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ही भाजी चांगलीच फायदेशीर ठरते. १०० ग्रॅममध्ये चांगल्या प्रमाणात कॅलरी आणि ३-५ ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात.

व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात मिळते

- Advertisement -

फ्लॉवरमध्ये शरीरासाठी फायदेशीर असणारे कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन आणि ऍन्टीऑक्सिडेन्ट आढळतात. १०० ग्रॅम फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन ‘सी’च्या दैनंदिन प्रमाणातील ७७ टक्के, व्हिटॅमिन के चे २० टक्के असतात. त्याशिवाय लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅगनिज, फॉस्फरस, फॉलिक आणि पँटोथिक ऍसिड, व्हिटॅमिन बी ६ असते. त्यामुळे फ्लॉवरच्या भाजीचे सेवन केल्यास अधिक फायदा होतो.

पचनक्रिया सुधारते

फ्लॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. जे पचनक्रियेच्या सुरळित कामासाठी आवश्यक ठरते.

हृदयरोगाचा धोका कमी होतो

फ्लॉवरमध्ये फायबर अधिक प्रमाणात असते. अशा भाज्यांचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्याची शक्यता असते.

पेशींचे आरोग्य चांगले राहते

फ्लॉवरसह क्रूसीफेरस भाज्यांमध्ये असलेले ग्लूकोसायनोलेट्स डीएनएला नुकसानापासून वाचवतात आणि पेशींचे आरोग्य चागंले राखण्यास मदत करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -