Thursday, April 25, 2024
घरमानिनीBeautyसौंदर्य खुलवण्यासाठी खोबरे तेलाचे 7 फायदे

सौंदर्य खुलवण्यासाठी खोबरे तेलाचे 7 फायदे

Subscribe

स्वस्तात मस्त अशा खोबरेल तेलाचे एक नाही तर अनेक सौंदर्य खुलवणारे फायदे आहेत. ज्यांनी घरातल्या घरात आपण आपले सौंदर्य चांगल्या प्रकारे टिकवून ठेऊ शकतो. चला तर जाणून घेऊया खोबरेल तेलाचे सौंदर्य खुलवणारे फायदे.

खोबरेल तेलाचा जेवणापासून ते औषधापर्यंत सर्व गोष्टींकरता वापर केला जातो. मात्र हे तेलाचा तेवढ्यापूर्तेच मर्यादीत नसून त्याचा सौंदर्य खुलवण्यासाठी देखील वापर केला जातो. अशाच काही खास टीप्स ज्याने तुमचे सौंदर्य खुलवण्यास मदत होईल.

खोबरेल तेलाचे 7 फायदे

7 Uses and Benefits of Coconut Oil for Hair and Skin | Coroli Life

- Advertisement -
  • मेकअप रिमूव्हर

अनेक तरुणी आणि महिला मेकअप रिमूव्हर म्हणून बाजारामधील महागड्या उत्पादनांचा वापर करतात. ज्यांनी चेहऱ्याला हानी होण्याची शक्यता असते. मात्र खोबरेल तेलाचा मेकअप काढण्यासाठी देखील चांगला वापर केला जातो. खोबरेल तेलाचा मेकअप रिमूव्हर म्हणून वापर केल्याने चेहऱ्याला हानी पोहोचत नाही.

  •  मुलायम त्वचा

खोबरेल तेल कोणत्याही त्वचेसाठी वापरले जाते. हात, पाय आणि चेहऱ्याला नियमित तेल लावून मसाज केल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

- Advertisement -
  • डोळ्याखालील काळी वर्तुळे

डोळ्याखाली खोबरेल तेलाने दररोज मसाज केल्यास डोळ्याखाली असलेली काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.

7 Creative Ways to Use Coconut Oil in Your Health and Beauty Regimen

  • चेहऱ्यावरील पुरळ

चेहऱ्यावर पुरळ आला असल्यास खोबरेल तेलाचा वापर करावा. खोबरेल तेल चेहऱ्याला लावल्याने पुरळ कमी होतात.

  • चेहरा उजळतो

खोबरेल तेलाने चेहरा उजळतो. यासाठी खोबरेल तेलामध्ये समप्रमाणात मध घेऊन त्याचा फेसपॅक तयार करावा हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने चेहरा उजळतो.

  • अंगावर लाल चट्टे

अंगावर लाल चट्टे किंवा अंगाला खाज येत असल्यास खोबरेल तेलाचा वापर करावा यामुळे आराम मिळतो.

  • स्कीन टोन

खोबरेल तेल अंगाला लावून त्यानंतर थोड्या वेळाने गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्कीन टोन सुधारतो.

 


हेही वाचा :

उन्हामुळे ओठांचे नुकसान होत असेल तर ‘या’ टीप्स वापरा

- Advertisment -

Manini