घरलाईफस्टाईलजेवणाचा सुगंध वाढवणाऱ्या तमालपत्राचे आरोग्यदायी फायदे

जेवणाचा सुगंध वाढवणाऱ्या तमालपत्राचे आरोग्यदायी फायदे

Subscribe

तमालपत्र हा मसाल्यामधील एक प्रकार आहे. याचा उपयोग जेवणातील सुगंध वाढवण्यासाठी केला जातो. पण, हे एक केवळ पान जेवणातील सुगंध तर वाढवतोच. पण, त्याव्यतिरिक्त त्याचे आरोग्यासाठी देखील बहुगुणी असे फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया तमालपत्राचे आरोग्यदायी फायदे.

सर्दीवर उपयोगी

सर्दी झाल्यास तमालपत्राचा वापर करावा. सर्वप्रथम तमालपत्र पाण्यात उकळवा आणि त्यानंतर उकळलेल्या पाण्यात स्वच्छ कापड भिजवून त्या कापडाने डोके आणि छाती शेकवा. यामुळे चांगला फायदा होतो.

- Advertisement -

सांधेदुखी

हिवाळ्याच्या दिवसात अनेकांना गुडघे दुखीचा त्रास असतो. अशावेळी तमालपत्राचे तेल हातावर घेऊन त्या तेलाने अलगद मसाज करा. यामुळे आराम पडतो.

अन्नपचनाला मदत

दररोज जेवणात तमालपत्राचा वापर केल्यास अन्न पचण्यास मदत होते. अपचनचा त्रास असल्यास आहारात तमालपत्राचा उपयोग अवश्य करावा.

- Advertisement -

मधुमेह

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आहारात तमालपत्राचा वापर करावा. यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात येण्यास मदत होते.

डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते

तमावपत्रामध्ये व्हिटॅमिन ए असते. आहारात तमालपत्राचा वापर केल्याने डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -