घरलाईफस्टाईलहिरवे चणे खाण्याचे फायदे आणि घनदाट केसांसाठी वापरा बटाटा

हिरवे चणे खाण्याचे फायदे आणि घनदाट केसांसाठी वापरा बटाटा

Subscribe

हिरवे चणे खाण्यासाठी अतिशय चविष्ट असतात; पण हे चणे फक्त जिभेचे चोचले पुरवत नाहीत तर ते आरोग्यासाठी देखील खूप पौष्टीक घटक असतात.

*या हिरव्या चण्यात फायबर, कॅल्शिअम, आयर्न आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

- Advertisement -

*हिरव्या चण्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतात. सकाळच्या नाश्त्यात हिरव्या चण्याचा वापर केल्यास हाडे मजबूत होतात. हाडांशी निगडीत समस्या कमी होतात.

*हिरव्या चण्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात.

- Advertisement -

*या चण्यांचा आहारात समावेश केल्यास शरीराची कमजोरी दूर होते.

*नियमित या चण्यांचा वापर केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.

*या चण्यांमुळे हृदयाचे आरोग्यदेखील सुधारायला मदत होते.

*मधुमेहींसाठी देखील हिरवे चणे फायदेशीर आहे.

*नियमित वाटीभर हिरवे चणे खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

*हिरव्या चण्यात मुबलक प्रमाणात आयर्न असतात. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघण्यास मदत होते.

 

 

घनदाट केसांसाठी वापरा बटाटा 

केसात कोंडा होणं हे सौंदर्याच्या समस्या वाढण्यासही कारणीभूत ठरतं. म्हणून त्यावर वेळीच मात करणे आवश्यक आहे. केसांमधील कोंडा दूर करण्यासोबतच त्यांना चमकदार, मजबूत करण्यासाठी बटाटा फायदेशीर आहे.

असा करा बटाट्याचा वापर-

*घनदाट आणि मुलायम केसांसाठी 2-3 बटाटे किसा. यामध्ये मध आणि अंड्याचा पिवळा भाग मिसळा. नंतर हे मिश्रण केसांना लावा. हा पॅक सुकल्यानंतर केस शाम्पूने स्वच्छ करा.

*कोंड्याचा त्रास दूर करण्यासाठी बटाट्याच्या रसात दही आणि लिंबाचा रस मिसळा. हा पॅक केसांना मुळासकट लावा. 2 तासांनी सौम्य शाम्पूने केस धुवा.आठवड्यातून 2-3 वेळा हा प्रयोग केल्यास कोंड्याचा त्रास कमी होतो.

*केस लांब वाढवण्यासाठी बटाट्याच्या रसात कोरफडीचा गर मिसळा. हा पॅक केसांना लावा. सुकल्यानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे दिर्घकाळ केसांचे सौंदर्य टिकण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -