घरलाईफस्टाईलजाणून घ्या आंबा खाण्याचे फायदे

जाणून घ्या आंबा खाण्याचे फायदे

Subscribe

आंबा खाण्याचे फायदे

मे महिना आला म्हटलं का आंबा हा आलाच. कारणा सर्व फळांचा राजा असलेला आंबा फक्त वर्षातून उन्हाळ्याच्या दिवसातच येतो. त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटते. हा आंबा जितका दिसायला चांगला आहे तितकेच त्याचे फायदे देखील आहेत. कारण आंबा हा आरोग्यासाठीही अतिशय चांगला आहे. चला तर जाणून घेऊया आंबा खाण्याचे फायदे.

वजन कमी होते

- Advertisement -

खरं तरं अनेक जण म्हणतात की, आंबा गोड आहे. त्यामुळे आंबा खाल्ल्याने वजन वाढते. मात्र, समज चुकीचा आहे. कारण आंबा खाल्ल्याने वजन कमी होते. कारण आंब्यामध्ये ए, बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे पुरेशा प्रमाणात असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला हवे.

शरीराला ऊर्जा मिळते

- Advertisement -

आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते. कारण आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.

प्रतिकारशक्ती वाढते

आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.

पोट साफ होते

आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते.

कोलेस्ट्रॉल कमी होतो

आंब्यात भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. सोबतच हृदयाशी निगडीत अनेक रोगांपासून सुटका होते.

रक्त वाढते

आंब्यामध्ये आयर्न असते. त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये आंब्याचा समावेश केल्यास तुमच्यातील आयर्नची कमतरता भरुन निघेल. त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्त वाढते.

डोळ्यांची दृष्टी वाढते

आंब्यामध्ये अधिक प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. जे डोळ्यांची दृष्टी वाढण्यासाठी मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -