घरलाईफस्टाईलसुंदर दिसण्यासाठी घ्या चेहऱ्यावर वाफ

सुंदर दिसण्यासाठी घ्या चेहऱ्यावर वाफ

Subscribe

चेहऱ्यावर वाफ घ्या आणि चेहरा चमकदार करा.

बऱ्याचदा सर्दी, खोकला किंवा सर्दीमुळे डोकेदुखी होत असल्यास हळद घालून वाफ घेतली जाते. यामुळे आराम मिळतो. मात्र, जर तुम्हाला सुंदर दिसायचे असेल तरी देखील चेहऱ्यावर वाफ घेणे फार फायद्याचे ठरते.

तरुण दिसाल

- Advertisement -

वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील त्वचेच्या रक्त परिसंचरणात सुधार होतो. याने त्वचा रक्त वाहिनींना पसरण्यात मदत मिळते आणि पेशींमध्ये रक्त प्रवाह वाढतो. तसेच त्वचेला पोषक तत्व आणि ऑक्सिजन अधिक प्रमाणात मिळते आणि त्वचा तरुण दिसू लागते.

डेड स्कीन निघण्यास मदत

- Advertisement -

वाफ घेतल्यामुळे चेहऱ्यावरली डेड स्कीन निघण्यास मदत होते. यामुळे चेहरा नैसर्गिकरित्या चमकतो आणि स्किन ग्लोइंग होते.

टॉक्सिन दूर होते

चेहऱ्यावर वाफ घेतल्याने त्वचेत आढळणारे टॉक्सिन दूर होते आणि चेहरा चमकतो.

मृत त्वचा दूर होते

वाफ घेतल्यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा दूर होते आणि त्यासोबतच सुरकुत्या देखील कमी होतात. यामुळे चेहरा ताजातवाना राहतो. तसेच चेहऱ्याच ओलावा राहण्यास देखील मदत होते.

चेहऱ्यावरील घाण दूर होते

चेहऱ्यावर मुरुम असणाऱ्यांनी वाफ घेणे फायद्याचे ठरते. बऱ्याचदा चेहऱ्यावरील मुरुममध्ये असलेली घाण, बॅक्टेरिया सहज बाहेर पडतात. यामुळे मुरुम असणाऱ्यांनी वाफ घेणे फायद्याचे ठरते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -