साजूक तुपाचे फायदे

Mumbai
Ghee

खाण्याच्या काही पदार्थांबद्दल आपल्या मनात समज-गैरसमज असल्याने त्यांच्या अनेक फायद्यांपासून आपण दूर राहतो. साजूक तूप हा असाच एक पदार्थ! पण यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते तसेच त्वचा सुधारते.

*त्वचा चमकदार होते 

शुद्ध तुपामुळे चेहरा अधिक चमकदार होतो. त्यामुळे डाळ-भातावर थोडी साजूक तुपाची धार घालून जेवायला सुरुवात करा आणि हा बदल पहा.

*डार्क सर्कल्सची समस्या कमी होते

वाढता ताण आणि अपुरी झोप यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं वाढतात. त्यामुळे यापासून सुटका मिळवण्यासाठी झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली तुपाचा हलका मसाज करा. सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ धुवा.

*केसांचे आरोग्य सुधारते

केस मजबूत आणि चमकदार होण्यासाठी साजूक तूप मदत करते. त्यामुळे आहारात साजूक तुपाचा नक्कीच समावेश करा.

*ओठांना मुलायम करतात 

सतत ओठांना जीभ लावल्याने किंवा थंडीच्या दिवसात ओठ फाटण्याची समस्या सर्रास आढळते. मग यावर उपाय म्हणून रोज काही थेंब तूप लावल्याने ते मुलायम राहतात.

*त्वचा मॉईश्चराईज करतात

त्वचेची शुष्कता फारच वाढत असल्यास नियमित पाण्यात तुपाचे काही थेंब मिसळून प्यावे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here