जास्वंदीच्या फुलांनी केस करा कलर

Mumbai
benefits of hibiscus flower for chemical free hair colour natural colour
जास्वंदीच्या फुलांनी केस करा कलर

आजकाल वय कमी असलं तरी केस पांढरे होण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. पुर्वीच्या काळात एक ठराविक वयोमर्यादा ठरलेली असायची त्या वयातच केस पांढरे व्हायचे. परंतु, सध्याच्या जीवनशैलीमुळे लहान मुलांचे केस देखील पांढरे होतात. केस पांढरे होण्यासाठी खराब पाणी, अति ताण, अनियमित जीवनशैली आणि इतर अनेक कारणं असतात. विशेष म्हणजे हे पांढरे केस लपवण्यासाठी छोट्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच जण केसाला कलर करतात. केमिकलयुक्त कलरमुळे पांढरे केस लपवण्यासाठी मदत होते, पण कालांतराने याचे गंभीर परिणाम, इतर समस्या होण्याचीही शक्यता असते. मात्र, केमिकल कलरशिवायही केस नैसर्गिकरित्या कलर करता येऊ शकतात.

जास्वंदीची फूलं केसांना केवळ नैसर्गिक रंगच देत नाहीत, तर केस चमकदार होण्यासही मदत होते. केसांच्या वाढीसाठी, कोंडा कमी करण्यासाठी देखील फायदा होऊ शकतो.

असा तयार करा कलर

  • जास्वंदीच्या फुलांचा कलर बनवण्यासाठी एका भांड्यात दोन कप पाणी गरम करा.
  • गरम पाण्यात एक कप जास्वंदीच्या फूलांच्या पाकळ्या टाका. १५ ते २० मिनिटांपर्यंत पाणी गरम करा.
  • त्यानंतर पाणी थंड करुन, गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा.
  • स्प्रे बॉटलमधील कलर केसांना लावण्याआधी केस धुवून घ्या.

त्यानंतर कंगव्याच्या मदतीने कलर संपूर्ण केसांवर लावा. एक तासापर्यंत हा कलर सुकू द्या. त्यानंतर पाण्याने केस धुवा. केसांना नैसर्गिक कलर करण्यासाठी हा चांगला उपाय ठरु शकतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here