स्वास्थ्यासाठी लाभदायक किवी

Mumbai

किवी फळाचे उत्पादन सर्वप्रथम चीनमध्ये घेण्यात येते. हे फळ व्हिटॅमिन्सने परिपूर्ण असून यामध्ये व्हिटॉमिन C आणि B, मिनरल्स आणि ओमेगा-३ अॅसिड सारखे पोषकघटक आहेत. न्यूझीलंड, फ्रान्स, इटली, जपान आणि अमेरिका येथे या फळाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही किवीचा फायदा होतो. तसेच किवीचा उपयोग शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी होतो. दिसायला तपकिरी रंगाचे असलेले हे फळ आतून हिरव्या रंगाचे असते. यामध्ये काळ्या रंगाच्या लहान लहान आकाराच्या बियाही असतात. या फळाची चव थोडीशी गोड, आंबट लागते. तसेच याचे आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे असतात. जाणून घेऊयात किवीचे आरोग्यदायी फायदे…

रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत

लिंबू आणि संत्र सर्वाधिक व्हिटामीन C देणारी फळं आहेत. व्हिटॅमिन C आपल्या शरीरात अॅंटीआॅक्सीडेंटच्या रूपात काम करते आणि आपल्या शरीराला कॅंसर सारख्या भयावह रोगापासून वाचवते तसेच यातील व्हिटॅमिन B शरीराच्या रोग प्रतिकाराक क्षमतेला देखील वाढवण्यास मदत करते.

पचनक्रिया सुधारण्यास उत्तम

पचनक्रिया सुधारण्यासही किवी गुणकारी ठरते. किवी फायबरचा एक उत्तम स्त्रोत आहे. यामुळे तुम्हाला अपचनाच्या समस्या कधीच उद्भवत नाही. तसेत किवीचे प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी फायदेशीर ठरते.

मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त

किवी फळ खाल्ल्याने ब्लड शुगर कमी होते. तसेच दिवसभरातील थकवा दूर होतो. फळाचा आतला भाग जितका गुणकारी आहे तितकीच या फळाची साल सुद्धा गुणकारी आहे. हे फळ मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त असल्याचे सांगितले जाते.

निरोगी त्वचेकरिता किवी

त्वचा निरोगी आणि मुलायम ठेवण्यासाठी किवी लाभदायक फळ आहे. तसेच त्यात अॅंटी एजिंग गुणधर्मही आहेत. त्यामुळे किवीचा फेसपॅक त्वचेसाठी फार उपयुक्त ठरतो. नैसर्गिकरित्या किवी क्षारयुक्त आहे. या फळातील PH घटकामुळे त्वची तरूण राहण्यास मदत मिळते.


किवी स्मूदी रेसिपी

कोणत्याही फळांची स्मूदी रेसिपी ही आरोग्याकरिता उत्तम मानले जाते. कारण कोणत्याही प्रकारची स्मूदी रेसिपी बनविण्यासाठी फळांचा आणि डायफ्रूटचा वापर केला जातो. उन्हाळ्यात किंवा इतर कोणत्याही हंगामात किवी स्मूदी हे आरोग्यास फायद्याचे मानले जाते. लहान मुलं किवी किंवा कोणत्याही प्रकारतचे फळ खाण्यास नाक मुरडत असतात अशावेळी मुलांना स्मूदी ज्यूस हा चांगला पर्याय ठरू शकतो. किवी फळात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन असल्याने लहान मुलांच्या आरोग्यास लाभदायक ठरू शकते. किवी स्मूदी तसेच किवी रेसिपी सकाळी नाश्तासोबत देखील खाऊ शकतात.

किवी स्मूदी रेसिपीचे साहित्य

१ किवी फळाचे तुकडे, २ ते ३ पपई फळाचे तुकडे, २ खरबूजचे तुकडे, द्राक्षं, १ ग्लास दूध, १ चमचा मध आणि अर्धा कप ओट्स

कृती

स्मूदी रेसिपीचे सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंडरमध्ये ब्लेंड करून घ्या. नंतर एका बाऊलमध्ये हे सर्व मिश्रण काढून ठंड करून पिण्यास सर्व्ह करा.