घरलाईफस्टाईललिंबू खाल तर निरोगी राहाल; वाचा काय आहेत फायदे!

लिंबू खाल तर निरोगी राहाल; वाचा काय आहेत फायदे!

Subscribe

आरोग्यासाठी लिंबू हे सर्वात उत्तम असे लाभदायी फळ आहे. लिंबाचा वापर हा औषध म्हणून केला जातो. नेमके लिंबाचे कोणते लाभदायी फायदे आहेत ते जाणून घेऊया.

लिंबू हे बारा महिने उपलब्ध असणारे फळ आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. लिंबामध्ये ‘क’ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. दररोज लिंबाचा रस घेतल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

  • दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा मध एकत्र करुन प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
  • नाकातून रक्त येत असल्यास लिंबू हा त्यावर एक रामबाण उपाय आहे. कापसाच्या बोळ्यावर लिंबूचा रस घेऊन तो कापसाचा बोळा नाकात ठेवल्यास लिंबामध्ये असलेल्या अँटिसेप्टिकमुळे अंतर्गत रक्तस्त्राव थांबतो.
  • डोके दुखत असल्यास लिंबू कापून त्याचे दोन भाग करावेत. त्यातील एक भाग गॅसवर गरम करुन ते लिंबू टाळूवर पिळावे. यामुळे डोके दुखीपासून त्वरीत आराम मिळतो.
    tips of lemon
  • केसात कोंडा झाल्यास लिंबाचा रस हा उत्तम पर्याय आहे. अर्ध्या लिंबाच्या रसात थोडेसे पाणी मिक्स करुन हे मिश्रण केसांना लावून मालिश केल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते. तसेच केस गळणे व इतर समस्या दूर होतात.
  • दात आणि हिरड्या दुखत असल्यास त्या ठिकाणी लिंबाचा रस लावल्यामुळे दात व हिरड्या दुखण्यापासून त्वरीत आराम मिळतो. त्याचप्रमाणे लिंबाच्या रसाने दाताला मसाज केल्यास रक्तस्त्राव होत असल्यास आराम मिळतो.benefits of lemon
  • अपचन किंवा अजीर्ण झाले असल्यास लिंबू यावर खूप उपयुक्त आहे. लिंबू आडवे कापून त्यावर सुंठ किंवा मीठ घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि सातत्याने त्याचे चाटण करावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी आदी त्रास कमी होतात.
  • पोट दुखत असल्यास लिंबाच्या रसात साखर घालून त्याचे सेवन करावे. त्यामुळे पोटदुखी पासून आराम मिळतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -