घरलाईफस्टाईलतुळस घालून करा दुधाचे सेवन

तुळस घालून करा दुधाचे सेवन

Subscribe

तुळशी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती असल्याने याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येऊ शकते. तुळशीमध्ये जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषके आहेत याचे तेल एक जैवप्रतिरोधी आणि प्रतिरोधी मानले जाते त्यामुळे याचा वापर विविध आजारांवरही केला जातो. सर्दी खोकला ताप दातदुखी श्वासारोध, दमा, फुफ्फुसांचे रोग, ह्नदयाचे विकार, या सर्वांमध्ये तुळस वापरली जाते.

पण, हीच तुळस जर तुम्ही दुधात टाकून त्याचे सेवन केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. कारण दुधाचे पोषण हे अमृतासारखेच आहे आणि तुळस औषध म्हणून वापरली जाते. जे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेला वाढवून बऱ्याचश्या आजारापासून आपल्याला वाचवते. या दोघांना मिसळून दिल्यावर पोषणासह आरोग्य आणि त्याचाशी निगडित बरेच फायदे मिळू शकतात. आता जेव्हा पण आपण दूध प्याल त्याच्यात तुळशीचे पान नक्की घाला आणि फायदे मिळवा.

- Advertisement -

दम्याचा त्रास

दम्याच्या रुग्णांसाठी हा उपाय फायदेशीर आहे. विशेषतः हवामानात होण्याऱ्या बदलावामुळे श्वास संबंधी त्रासापासून वाचण्यासाठी दूध आणि तुळशीचे हे मिश्रण खूप उपयुक्त आहे.

डोके दुखी

डोकं दुखी किंवा मायग्रेनचा त्रास असल्यास हा उपाय देखील आपल्याला आराम देईल. जेव्हा आपणास मायग्रेनचा त्रास होत असेल आपण याचे सेवन करू शकता. दररोजच्या सेवनाने आपल्याला हा त्रास दूर करता येऊ शकतो.

- Advertisement -

तणाव होतो दूर

जर का ताण घेणं आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला असेल तर दुधामध्ये तुळशीची पानं उकळून प्यावे. आपला तणाव दूर होऊन तणावाची समस्याच नाहीशी होईल.

हृदयाची समस्या

हृदयाच्या समस्येसाठी देखील फायदेशीर आहे. सकाळी अनोश्यापोटी या दूध प्यायल्याने हृदयाशी निगडित आजारांमध्ये फायदा होतो. या व्यतिरिक्त मूत्रपिंडात होणाऱ्या मुतखड्यांवर फायदेशीर आहे.

कर्करोगापासून बचाव

तुळशीमध्ये कॅन्सर रोगाच्या पेशीविरुद्ध लढण्याचा गुणधर्म असतो, म्हणून ह्याचे सेवन आपल्याला कर्करोगापासून वाचवू शकतो. याचा व्यतिरिक्त हिवाळ्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील हा एक प्रभावी उपाय असल्याचे सिद्ध होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -