घरलाईफस्टाईलघरात ही झाडं लावल्यास हवा होते नैसर्गिकरित्या शुद्ध!

घरात ही झाडं लावल्यास हवा होते नैसर्गिकरित्या शुद्ध!

Subscribe

दूषित हवेत श्वास घेतल्याने अनेक आजार होतात. उत्तम आरोग्यासाठी चांगल्या आहारासोबतच शुद्ध हवेचीही आवश्यकता असते. म्हणून आपल्या घराभोवती झाडे लावणे गरजेचे आहे. जागेच्या कमतरतेमुळे शहरात घराभोवती जास्त झाडे लावणे शक्य नसते. परंतु घरातच अशा काही वनस्पती लावता येतात ज्यांच्यामुळे अनेक रोगांपासून बचाव होईल.

तुळस- भारतीय समाजात तुळशीला एवढे मनाचे स्थान देण्याचे कारण ही सहज प्राप्त होणारी परंतु उच्च कोटीचे औषधी गुणधर्म असणारी व एकाचवेळी अनेक रोगांचे निर्मूलन करणारी वनस्पती आहे. ती आपल्या उच्छ्वासातून जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते त्यामुळे हवा शुद्ध होते. तिचे पान, खोड बी, सर्वच औषधी आहे. तुळस पूजनीय वनस्पती असून तुळशीमुळे सभोवतालचे वातावरण स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते.

स्पाईडर प्लान्ट – हे देखील घरगुती आणि हवा शुद्ध करणारं एक रोपटं आहे. याच्या वाढीसाठी थेट सूर्यप्रकाशाची गरज नसते.

- Advertisement -

लीली – हे झाड घरी लावल्याने घरातील हवा शुद्ध होते. यामुळे शरीर रोगांपासून दूर राहण्यास मदत होते. लीलीची फुले दिसायलाही सुंदर असतात.

बोस्टन फर्न – दिसायला आकर्षक असणारी ही वनस्पती हवेतील प्रदूषणही कमी करण्यास मदत करतात. मात्र ते विकत घेण्यापूर्वी किती आणि कसे पाणी घालावे याबाबत माहिती करून घ्या. अन्यथा ते अकाली कोमेजून सुकून जाण्याची शक्यता असते.

- Advertisement -

कोरफड – सौंदर्य सुधारण्यासाठी कोरफड जसे फायदेशीर ठरते तसेच वातावरणही शुद्ध ठेवण्यासाठी मदत करते. कोरफडाला नेहमी पाणी घालण्याचीही गरज नसते. त्यामुळे त्याचा सांभाळ करण्यासाठी फारसे कष्ट लागत नाहीत.

मनी प्लान्ट – घरात मनी प्लान्ट ठेवणे फारसे खर्चिक नसते. यामुळे हवेतील प्रदूषक कमी होण्यासाठी मदत होते.

स्नेक प्लान्ट – रात्रीच्या वेळी यामधून ऑक्सिजन बाहेर पडतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या कार्बन डायऑक्साईड कमी करण्यास त्याची मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -