आरोग्यदायी राजगिरा

Mumbai
rajgira

‘राजगिरा’…हा खास करुन आपल्याला नवरात्री, एकादशी अशा उपवासांना आठवतो. या अगदी छोट्याशा दिसणार्‍या राजगिर्‍याचे आरोग्यदायी फायदे जर तुम्हाला माहीत झालेत तर तुम्ही उपवासा व्यतिरिक्तसुद्धा हमखास याचा आहारात समावेश कराल.राजगिरा ही अत्यंत गुणकारी वनस्पती असून जागतिक दर्जावर सुपरफूड म्हणून घोषित झाला आहे. राजगीर्‍यास रामदाना,अमरनाथ म्हणूनही ओळखले जाते.

राजगिर्‍यामध्ये कॅलरिज, कार्बोदके, प्रोटिन,आयरन,फॅट,फायबर, कॅल्शिअम स्टार्च ही पोषणमूल्ये आहेत.

बी१,बी५, व्हिटामिन सी, बी२, बी६, व्हिटामीन ई, बी३, बी ९ ही जीवनसत्वे आहेत.आता आपल्या लक्षात आले असेलच की राजगिरा ऊपवासाला का खातात? राजगिरा खाल्यास आपल्या शरिराला जवळपास सर्व आहारसत्वे मिळतात.

  • राजगिर्‍यायत कॅल्शिअम भरपूर असल्याने व लायसीन हे कॅल्शिअम शोषणास मदत करणारे व्हिटामिन असल्याने हाडे मजबूत होतात.
  • व्हिटामिन सी भरपूर मात्रेत असल्याने त्वचा, केस यासाठी ऊपयुक्त आहे. हिरड्याच्या विकारात ऊपयुक्त ठरते.
  • राजगिर्‍यातील प्रोटिनमध्ये इन्सुलिनवर नियंत्रण राखण्याचा विशेष गुणधर्म आढळतो. त्यामुळे डायबेटिकच्या रुग्णांमध्ये ऊपयुक्त ठरते.
  • राजगिरा ग्लुटेन फ्रि फायबरने युक्त आहे. त्यामुळे वजन कमी करताना उपयुक्त ठरतो.
  • मॅग्नेशिअम अधिक असल्याने मायग्रेनमध्येही ऊपयुक्त ठरते.
  • यातील बायोअ‍ॅक्टीव्ह कंपाऊंड्स हे अँटिअ‍ॅलर्जीक असतात.
  • फायबर्स आणि अन सॅच्युरेटेड फॅट्स असल्यामुळे रक्तवाहिन्यातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. हृदयाचे स्वास्थ्य राखते.

राजगिर्‍याचे गुणधर्म –आयुर्वेदामध्ये राजगिर्‍याला रूचीवर्धक, रक्तशोधक, स्तन्यवर्धक, मल:सारक म्हटले आहे.

‘रूचीवर्धक’ – त्यामुळे पचनव्याधीनंतर येणारा nausea कमी करण्यास मदत होते.

रक्तशोधक – त्यामुळे रक्तपित्त, त्वचा विकार, यात ऊपयुक्त ठरतो.

स्तन्यवर्धक- हा राजगिर्‍याचा गुणधर्म सांगितला आहे. म्हणजेच मातृत्वामध्ये स्तनदुग्धाची वृद्धी याच्या नियमित सेवनाने होते.

मल:सारक – हा राजगीर्‍याचा गुण बद्धकोष्ठ, संग्रहणी या व्याधीत उपयुक्त ठरतो.

तसेच स्थौल्य कमी करण्यासाठी आयुर्वेदात रोज राजगिर्‍याचे सेवन सांगितले आहे. केस गळणे, केस पांढरे होणे हे विकार राजगिरा सेवनाने टळतात.

हे सर्व गुणधर्म राजगिर्‍याची पाने व बियांमध्ये असतात. त्यामुळे राजगिर्‍याच्या पानांची भाजी,रस आहारात समाविष्ट करावा.तसेच राजगिरा हा लाडू,पराठे,थालिपीठ, शिरा, खीर अशा अनेक स्वरूपात बनवता येतो.आठवड्यातून एकतरी नाष्ता राजगिर्‍याचा खावा. चॉकलेट्सची जागा राजगिर्‍याच्या लाडवांनी किंवा चिक्कीने घेतली तर ऊत्तमच!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here